बऱ्याचदा आपल्या हाताची व पायाची आग होते. तसेच आज-काल हे खूप लोकांमध्ये आढळून येते. आपल्या हाताची व तळपायाची आग होणे मध्ये अचानक सुरू होते, तसेच खाज येऊ लागते. काही लोकांच्या हातावर आग होते. तर काही लोकांच्या तळ हातावर आणि पायावर दोन्ही ठिकाणी आग होते.
बरेचदा असे दिसून येते की पुरेसा रक्त पुरवठा न झाल्यामुळे हा विकार आढळून येतो. तसेच याला पित्ताचा विकार ही असे म्हणतात. आणि मग यामध्ये तळहात व तळपाय यांची आग होते.
आज काल आपण खूप काही वजनदार वस्तू उचलतो किंवा बरीच काम एकाच वेळेस करतो, त्यामध्ये आपला हात व पाय या दोघांचा खूप वापर होतो अशावेळी खूप वेळा आपल्या हात पायांना पुरेशा रक्त पुरवठा न झाल्यामुळे हाता पायाची आग होते. हे जास्त करून 40 व त्यावरील वयोगटाच्या माणसांमध्ये आढळून येते. जसे जसे वय वाढत जाते तसे तसे आपल्या शरीराची झीज होत असते.
हाताची व तळ पायाची आग होण्याची प्रमुख कारणे कोणती ?
तळ हात व पाय यामध्ये आग होण्याची बरीचशी कारणे आहे. तसेच या कारणांमुळे आपल्या हात व पाय या मध्ये आग होते तसेच त्याची कारणे कोणती ती आपण बघणार आहोत चला तर जाणून घेऊया.
- खूप तिखट तसेच उष्ण पदार्थांचं सेवन केल्याने
- खूप आंबट खारट पदार्थांचे सेवन केल्याने
- रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने
- प्रखर ऊन प्रकाशामध्ये काम करणे केल्याने
- मधुमेह असणे
- कमी प्रमाणात मधील पाणी पिणे
- अनवाणी पायाने चालणे
- खूप औषधांचे सेवन करू नये
- उच्च रक्तदाब असणे
- तसेच इतर वेगवेगळे आजार असणे
पायाची हाताची आग कमी करायचे घरगुती उपाय :
जर तुमच्या तळहात व तळपायाची आग होते त्याची कारणे बघितली आता आपण जाणून घेणार आहोत तळपायाची आग होते त्याच्यावर उपचार.
तळ हाताची व तळपायाची आग आपल्याला घरगुती उपायाने कशी घालता येईल ते बघूया :
गुलकंद, पाणी व ताक याने तुमच्या तळ हाताची व पायाची आग मिटवा :
- जर तुम्ही रोज सकाळी अथवा संध्याकाळी गुलकंदाचे सेवन केले तर तुमची तळपायाची व तळ हाताची आग कमी होण्यास मदत होईल.
- तसेच तुम्ही दिवसभरामध्ये शक्य तेवढे पाणी पिले पाहिजे. साधारणता आपण दिवसांमध्ये चार ते पाच लिटर पाणी पिले पाहिजे.
- तसेच तुम्ही रोज जेवण झाल्यानंतर थंड ताक पिले पाहिजे. याने तुमच्या हातावर व पायावर खूप फरक पडेल.
कोरफड ने होईल हातापायांची समस्या दूर :
- सर्वप्रथम म्हणजे आपण एका पराती मधे किंवा ताटामध्ये कोरफड चा गर घ्यावा.
- तो एका भांड्यामध्ये टाकावा त्यानंतर आपण एका ठिकाणी बसून या भांड्यामध्ये आपले तळपाय व तळहात त्यामध्ये ठेवावे.
- साधारणत अर्धा तास ते 45 मिनिटं आपण त्यात ठेवावे.
- याने तुमच्या हाता पायाची समस्या दूर होईल. कारण अलोवेरा मध्ये खूप औषधी गुणसूत्रे असतात. जे तुमच्या शरीरासाठी त्वचेसाठी खूप गुणकारी ठरतात.
- हा उपाय तुम्ही करून बघितल्याने तुमच्या हाता-पायावर होणारी आग कमी होताना नक्कीच फरक दिसून येईल.
गुलाब जल व कोरफड याने करा तुमच्या पायात समस्या दूर :
- गुलाब जल आणि कोरफड हे दोघांचे आपण समान भाग मिश्रण एका भांड्यामध्ये घ्यावे.
- यानंतर ते मिश्रण आपल्या हातापायावर लावावे जेणेकरून आपल्या हातापायाची आग लवकरात लवकर थांबेल.
- याने तुमच्या हातापायाची समस्या लवकरात लवकर दूर होईल. तसेच तुम्हाला काही दिवसांमध्ये याचा फरक दिसून येईल.
नारळाचे तेलाने पायाची आगेची समस्या दूर करा :
सर्वप्रथम आपण झाडावरचे नारळाचे मलई काढून त्याचे तेल करून घ्यावे. नंतर ते तेल रोज रात्री आपल्या पायांना त्या तेलाची मालिश करून घ्यावी. याने तुमच्या पायातील आग कमी होईल. तसेच तुमची त्वचा ही गुटगुटीत होईल. तसेच तुम्ही बाकीचेही उपाय करू शकतात जसे की
- चंदन
- गुलकंद
- मध
- नागरमोथा
- गुलाबाच्या पाकळ्या
हे सर्व तुम्ही एका कपामध्ये भिजत घालून रोज रात्री तो हातावर व पायावर लावावे. हे तुम्ही साधारणत दोन ते तीन दिवस करावे याने तुमच्या तर हातावर व पायावर लगेच फरक दिसून येईल. तसेच तुमच्या आता पायाच्या समस्याही नाहीस्या होतील.
तर आपण आज बघितली की तळ हातावर किंवा पायावर होणारी आग त्याचे कारणे कोणती. तसेच त्याचे घरगुती उपाय कोणते. हे जर उपाय तुम्ही करून बघितले तर तुम्हाला तुमच्या हाता पायाला फरक जाणवेल तसेच तुमच्या हातापायाच्या समस्या नाहीसे होतील. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घ्यावा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.