सुरमा त्वचा रोग चे काही सोपे घरगुती उपाय जाणून घ्या

आज-काल सुरमा त्वचा रोग हा फार लोकांना होत आहे. याचे कारण म्हणजे बदलते राहणीमान बदलते वातावरण तसेच शरीरातील बदल यामुळेदेखील सुरमा त्वचा रोग होऊ शकतो. कोणालाही आवडणार नाही की त्याच्या चेहऱ्यावर पांढरे पांढरे ठिपके असावे किंवा शरीरावर पांढरे चट्टे असावे कारण चेहऱ्यावर जराशी चट्टे निर्माण झाले तर चेहरा विद्रूप दिसतो.

खूप लोक कोट्यावधी पैसा खर्च करतात सुंदर दिसण्यासाठी किंवा आकर्षक दिसण्यासाठी पण जर आपल्या चेहऱ्यावर सुरमा झाला तर खूप पैसे खर्च करून देखील बरेच वेळेस सुरमा चे डाग जात नाही. शेवटी कोणताच मार्ग भेटत नाही हे डाग घालवण्याचे.

पण काळजी करायचे कारण नाही, जर तुमच्या त्वचेवर सुरमा चे डाग आले असेल तर ते घालवण्यासाठी आम्ही मदत करू. तसेच आम्ही सुरमा त्वचा रोग होण्याचे कारण सांगणार आहोत तसेच त्यावर काही घरगुती उपाय देखील सांगणार आहोत चला तर मग बघुया.

सुरमा त्वचा रोग येण्याची कारणे :

1. शरीरातील बदल
2. त्वचेचे काही इन्फेक्शन किंवा रोग असणे.
3. अति वेळ उन्हामध्ये असणे किंवा खूप घाम असणे.

शरीरातील बदलांमुळे तसेच काही त्वचेचे इन्फेक्शन असेल किंवा रोग असेल त्यामुळे किंवा अतिवेळ उन्हामध्ये काम केल्यामुळे तसेच तुम्हाला जर खूप घाम येत असेल तर सतत घामामध्ये असणे. स्वच्छ कपडे न वापरणे असे अनेक कारणं असू शकतात.

सुरमा त्वचा रोग होण्याचे बरीच अंधश्रद्धा असते. की मांसाहारी जेवण जेवल्यानंतर त्यावर जर दूध पिले तर सुरमा होतो हे साफ खोटं आहे. विज्ञानाने अजून पर्यंत अशी कोणतीही कल्पना सांगितली नाही की मांसाहारी जेवण जेवल्यानंतर त्यावर दूधजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे सुरमा होतो म्हणून अति काळजी करायचे कारण नाही.

सुरमा त्वचा रोगावर उपाय :

आपण सुरमा त्वचा रोग होण्याची कारणे तर बघितली. आता आपण जाणून घेणार आहोत जर आपल्याला सुरमा त्वचा रोग झाला असेल तर त्यावर आपल्याला कोण कोणते घरगुती उपाय करता येईल ? चला तर मग बघुया.

तुळशीच्या पानांचा रस लावा :

तुम्हाला जर सुरमा त्वचा रोग झाला असेल तर त्यावर तुळशीच्या पानांचा रस लावल्यास सुरमा त्वचा रोग लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते. कारण तुळशी ही पूर्वीपासून आयुर्वेदिक मानली जाते तसेच ग्रंथ पुराणामध्ये तुळशीचे अनेक महत्त्व सांगितले गेलेली आहेत. त्याच प्रकारे तुळशीच्या पानांचा आपल्या त्वचेवर किंवा शरीरावर खूप चांगला फायदा होतो.

सर्वप्रथम तुम्हाला जर सुरमाचे टीपके किंवा चट्टे असतील त्यावर दोन तीन तुळशीच्या पानांचा रस लावू शकतात किंवा या भागावर तुळशीचे पान ठेवून हाताने तो भाग चोळू शकता.

जेणेकरून तुळशीच्या पानांचा रस त्या भागाच्या त्वचेवर किंवा त्या चट्ट्यांवर लागेल हा उपाय पंधरा ते वीस दिवस करून बघा. असे केल्यास तुमची सर्व चट्ट्यांपासून किंवा डागा पासून सुटका होऊ शकते.

कोरफडीचा गर लावून बघावा :

सुरमा चे डाग छोटे असतील किंवा कमी प्रमाणामध्ये शरीरावर पसरले असतील तर त्यावर कोरफडीचा गर लावू शकता. कोरफडीचा गर हा खूप आयुर्वेदिक असतो याच प्रमाणे जर तुम्ही तुमच्या सुरमाच्या चट्ट्यांवर किंवा टिपक्या वर लावले तर हळूहळू करून तुमचा सुरमा त्वचा रोग बरा होण्यास मदत होऊ शकतो किंवा पसण्यापेक्षा थांबू शकतो.

कोरफडीचा गर लावताना शक्यतो कोरफडीचा गर हा ताजा असावा याची दक्षता घ्यावी. तसेच कोरफडीचा गर त्वचेवर दहा ते पंधरा मिनिटं राहू द्यावा. तसेच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोरफडीचे पेस्ट बनवून त्यामध्ये तोडेसे गुलाबजल देखील टाकू शकतात.

कडुलिंबाचा पाला देखील लावू शकता :

सुरमा त्वचा रोगावर कडुलिंबाचा पाला लावल्यास सुरमा त्वचा रोग लवकरात लवकर बरे होण्याची देखील शक्यता असते. तुम्ही कडुलिंबाची पावडर देखील लावू शकता जी तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध असेल.

याच प्रमाणे तुम्ही कडुलिंबाचा ताजा पाला देखील सूरमा त्वचारोगावर लावू शकता हा उपाय देखील सतत पंधरा ते वीस दिवस करून बघावा.

तर आज आपण बघितले सुरमा त्वचा रोग येण्याची कारणे कोणती तसेच त्यावर आपण काही घरगुती उपाय देखील बघितले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल. तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Leave a comment