मुळव्याध वर घरगुती उपचार नक्की कोण कोणते ? ते जाणून घेऊया ! 

मुळव्याध वर घरगुती उपचार

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी खाणं पणामुळे, जास्ती गरम, मसालेदार पदार्थ, खाल्ल्यामुळे अनेक जणांना मूळव्याधाचा त्रास होऊ लागतो. मुळव्याध म्हणजे नक्की काय, त्याचे त्रास कोणकोणते हे आपण आज जाणून घेऊया? मूळव्याधीमध्ये तीन प्रकार असतात. मुळव्याध, फिशर , भगंदर हे तीन प्रकार आहे. मुळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेल्या शिरांना सूज येणे, त्या जागेवर शौचाच्या वेळेस वेदना होणे, रक्त पडणे, खाज येणे अशी लक्षणे जाणवतात. आपल्या गुदद्वाराच्या आजूबाजूला जे रक्तवाहिनी असतात, त्यातून रक्त येते, त्या फार ठणकतात खूप दुखते, रक्तस्राव होतो. मग रक्तस्राव ची कमतरता मुळे आपल्याल ॲनिमिया होतो, त्यासाठी आपण वेळीच उपचार केले पाहिजे. जर आपण वेळीच उपचार नाही केला, तर आपल्याला खूप त्रास होतो, कधी कधी आपल्याला शस्त्रक्रिया सुद्धा करून आलेला कोंब, मोड काढून टाकला जातो. पण तरीसुद्धा त्याचा पुन्हा पुन्हा त्रास होण्याची शक्यता असते.

त्यासाठी आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. फायबर युक्त पदार्थ खाल्ले पाहिजे, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, विविध फळे, आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. मुळव्याध असल्यास आपण कोण कोणती भाजी घ्यावी ? मुळव्याध वर घरगुती उपचार काय करावे ? हे आपण जाणून घेऊया ! 

चला, तर मग आज आपण जाणून घेऊया की मुळव्याध मध्ये कोणते कोणते आहार घ्यावे व मुळव्याध वर घरगुती उपचार कोणते घ्यावेत ? 

मुळव्याध असल्यास कोणते घरगुती आहार घ्यावे ?

मुळव्याध मध्ये आहारात ज्वारीची भाकरी, कुळीथ, जुने तांदूळ तसेच तूर ,मूग, चणे अशी कडधान्ये आपल्या आहारात घ्यावी. तसेच भाज्यांमध्ये तूम्ही दुधी, वांगी,परवळ,घोळ, शेपू, सुरण-कंदमूळ, भेंडी, पत्ताकोबी, फुलकोबी ,पालक, वांगी ,तोंडली अशा भाज्यांचा तुम्ही समावेश करा .

मूळव्याधीमध्ये कंदमूळ च्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात, त्या फार उपयोगी असतात. तसेच तुम्ही तुप ,ताक ,लोणी, दही यांचा ही समावेश करू शकतात. तसेच फळांमध्ये तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, अंजीर, पेरू ,केळी ,द्राक्षे ,डाळिंब ही फळे खाऊ शकतात. तसेच आपण दिवसातून कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यायला हवे . जास्ती पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील विषद्रव्ये लघवीवाटे बाहेर निघून जातात आणि आपल्याला शौचास त्रास होत नाही. 

कागदी लिंबू वापरून बघा :

हो, मुळव्याध साठी कागदी लिंबू फार उपयोगी आहे. त्यासाठी तुम्ही एक कागदी मधोमध अर्धा कापून त्या लिंबू वर तुम्ही त्यात पाच ग्रॅम कात बारीक वाटून त्या नींबू मध्ये भरा, आणि तो नींबू रात्रभर तसंच ठेवा, सकाळी दोन तुकडे कापून चोखा, त्याने गुदद्वारातून येणाऱ्या रक्तस्राव बंद होण्यास मदत होईल. हा उपाय फार उत्तम आहे. तुम्ही 14 ते 15 दिवस हा उपाय करून बघा. तसेच तुम्ही निंबू कापून त्यात सैंधव मीठ टाकून सुद्धा चाखू शकतात. त्यांनी हे रक्त वाहणे थांबते. 

जिरे पूड वापरून बघा :

जिरेपूड हे फार आरोग्यदायी आहे. तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूड एक ग्लास पाण्यात टाकून ते पाणी तुम्ही सकाळी अनशापोटी प्या. त्याने तुमच्या मुळव्याधीवर तुम्हाला आराम मिळेल व तुम्हाला शौचास ही त्रास होणार नाही, तसेच तुम्ही जिऱ्याचे खडीसाखर सोबत सेवन करू शकतात. तुम्हाला मूळव्याधीचे अधिक वेदना होत असतील, तर तुम्ही जिरे- मिरे यांचे चूर्ण सुद्धा मधात एकत्र करून दिवसातून तीन ते चार वेळा घेऊ शकतात, त्यांनी तुम्हाला फरक नक्की जाणवेल. 

 बडीशोप वापरून बघा :

बडीशोप ही जेवणानंतर एक चम्मच नियमित आहारात घ्या, बडीशोप अन्न पाचक करण्याचे काम करते, तुम्हाला मूळव्याधीतून रक्‍त जात असेल, तर बडीशोप व खडीसाखरेचे समप्रमाणात मिक्स करून ते चूर्ण तुम्ही दुधा सोबत घेतल्यास तुम्हाला मूळव्याधीमध्ये लाभ मिळतो . तसेच तुम्ही रक्त वाहणाऱ्या मूळव्याधीमध्ये बडीशोप जिरे धने समप्रमाणात एकत्र करून त्याच्या काढा बनवून त्यात एक चमचा गाईचे तूप टाकून ते पिल्याने तुमचे वाहणारे रक्त थांबते. 

गुलकंद खात जा :

गुलकंद हा थंड पदार्थ आहे. तुम्ही तुमच्या आहारात गुलाबाचे गुलकंद खाण्यास सुरुवात करा, त्याने तुम्हाला नक्की फरक जाणवेल, तसेच तुम्ही गुलाबाच्या पंधरा ते वीस पाकळ्या पाण्यात टाकून ठेवावे ते पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पिल्यास ही तुम्हाला मुळव्याधीचा त्रास कमी होईल. 

सुरणकंदमूळ चा आहारात समावेश करावा :

हो, सुरण फार बहुगुणी आहे. तुम्ही सुरणाचा कंद आणून, त्याची साल काढून त्याच्या गोल गोल चकत्या कापून त्याच्या त्या साजूक तुपात भाजून खाव्यात. पण त्यात मीठ मसाला काही टाकू नये हे फार उपयोगी आहे त्याने तुम्हाला मूळव्याधीमध्ये आराम जाणवेल.

 जाणून घ्या : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय खावे ? जाणून घ्या

त्रिफळा चूर्ण घ्या :

त्रिफळा चूर्ण हरड बहेडा आणि आवळा यांचे मिश्रण आहे, त्याने आपले पोट साफ होण्यास मदत मिळते, तसेच ते आपलं रक्त शुद्ध ही करतात. त्यासाठी तुम्ही सकाळी उपाशीपोटी त्रिफळाचूर्ण घ्या, त्याने तुम्हाला शौचास त्रास होणार नाही. तसेच तुम्ही त्रिफळाचूर्ण यामध्ये थोडे हिंग टाकून ते पाणी पिल्यास ही तुम्हाला अधिक फायदा होईल, तुम्ही हे चूर्ण नेहमी सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. 

आज आम्ही आमच्याकडून तुम्हाला मुळव्याधीवर बरेच काही घरगुती उपचार सांगितलेले आहेत. तसेच तुम्हाला आम्ही सांगितलेल्या उपचारांमध्ये काही शंकाकुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही हे घरगुती उपचार करताना डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. 

धन्यवाद


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *