सगळ्यांना नीटनेटके सौंदर्य युक्त राहायला आवडते आपल्या शरीराची आपण खूप काळजी घेतो पण पायांचे काय ? आपण पायांकडे लक्ष देत नाही. उन्हाळ्यामध्ये व हिवाळ्यामध्ये पायांच्या भेगा व तळे अधिक जातात त्यामुळे चालायला सुद्धा खूप त्रास होतो. पायाच्या तळव्याला जर भेगा पडले असतील तर तुम्हाला त्यामध्ये इतर इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. पायाच्या भेगा बुजवण्यासाठी आयुर्वेदामध्ये भरपूर उपाय दिलेले आहेत पण त्यातले काही निवडक उपाय आम्ही आपल्याला देणार आहोत.
पायाची आग होणे, पाय जळजळणे अशा तक्रारींना सामोरे जावे लागते. आपण सुरुवातीला त्याकडे लक्ष देत नाही पण नंतर मात्र आपल्याला उपाय करावाच लागतो. उतारवयात पायाला भेगा पडण्यामध्ये प्रमुख कारण आहे.
तसेच लोकांना सुरुवातीला त्रास होत नाही पण नंतर नंतर खूप त्रास होतो. किती भेगा पडल्या असल्या तरी आता काळजी करू नका आता काळजीचे कारण नाही कारण आता आम्ही सांगणार आहोत की तुमच्या घरच्या घरी मोफत मध्ये तुम्हाला कशाप्रकारे तुमच्या पायांच्या भेगा व तळे कशाप्रकारे घालवता येतील व भरता येतील.
चला तर मग पाहूया.
पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा जाण्यासाठी घरगुती उपाय :
जर आपल्याला घरच्या घरी पायातील भेगा घालवायचे असतील तर आपण काही सोपे घरगुती उपाय करू शकतो जसे की –
मुलतानी वापरून पायाच्या भेगा दूर करा :
- सर्वात आधी मुलतानी माती घ्यावी, ती सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे.
- शक्यतो मुलतानी माती थंड करुन घ्यावी, कारण ती थोडी थंड असल्याने पाय थोडे मऊ राहतील.
- त्यानंतर ती मुलतानी माती का थोडी थोडी करून पाहायला लावावी, मुलतानी मातीचे खूप गुणकारी ठरते व त्याचे खूप औषधी उपयोग आहेत.
- अर्ध्या तासानंतर पाय धुऊन घ्यावे.
- त्यानंतर थोडी मुलतानी माती हळद आणि तेल द्यावे नंतर ते मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे व ते दहा मिनिटात ते 20 मिनिटात ते असेच ठेवावे, त्यानंतर त्या मिश्रणाचा पायाला लेप लावावा.
- तो लेप 2 ते 3 तास राहू द्यावा, दोन ते तीन तासानंतर तो लेप गरम पाण्याने धुऊन घ्यावा.
- नंतर शेवटच्या म्हणजे हे सगळं झाल्यानंतर थोडं कोमट तेलाने पायाची मालिश करून घ्यावी सर्व शक्यतो रात्री करावे व सकाळी तसेच उठल्यावर अनवाणी गवतावर चालावे.
हे सर्व तीन ते चार दिवस केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक आढळून येईल व तुमच्या पायाच्या भेगा व तडे कमी झालेले असेल.
केळाचा वापर करून पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा घालवा :
केळ खाल्याने जसे आपल्याला बरेच काही फायदे होतात, तसेच याचा वापर तुम्ही पायातील भेगा घालवण्यासाठी सुद्धा करू शकतात, यासाठी-
- सर्वात आधी पायांना कोमट पाण्याने धुऊन घ्या.
- आता तुम्ही पिकलेले केळ तुमच्या पायाच्या तळव्यांना घासावे.
- घासल्याने ते केळ पायातील भेगांमध्ये आत मधे जाईल.
- पंधरा मिनिटांसाठी तुम्हाला हे असेच राहू द्यायचे आहे.
- पंधरा मिनिटानंतर तुम्हाला कोमट पाण्याने तुमचे पाय धुऊन घ्यायचे आहे.
असे जर तुम्ही केले तर तुम्हाला पायातील भेगा कमी होताना जाणवतील.
कडूलिंबाचा वापर करून पायातील भेगा कालवा :
कडुलिंबाचे भरपूर सारे फायदे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही कडूलिंबाचा वापर पायातील भेगा दूर करण्यासाठी सुद्धा करू शकतात, यासाठी तुम्हाला-
- हाताच्या तळव्यात बसतील एवढे कडू लिंबाचे पान घ्यायचे आहेत व त्याची बारीक पेस्ट तुम्हाला मिक्सर मध्ये करायची आहे.
- आता तुम्हाला त्यामध्ये तीन चमचे हळद टाकायची आहे.
- आता या मिश्रणाला दहा मिनिटे तसेच राहू द्यायचे आहे.
- दहा मिनिटांनंतर तुम्हाला ते मिश्रण तुमच्या पायातील भेगा मध्ये लावायचे आहे.
- पंधरा मिनिटाने तुम्हाला कोमट पाण्याने तुमचे पाय चे तळवे साफ करून घ्यायचे आहे.
असे काही दिवस केल्याने तुम्हाला लवकर फरक जाणवेल.
लिंबू चा वापर करून पायाच्या भेगा नाहीश्या करा :
लिंबू चे खूप सारे फायदे तुम्हाला माहिती आहे, पण हे तुम्ही तुमच्या पायातील भेगा घालवण्यासाठी सुद्धा वापरू शकतात. यासाठी तुम्हाला-
- अर्धा बादली कोमट पाणी घ्यायचे आहे.
- त्या पाण्यामध्ये दोन ते तीन लिंबू पिळायचे आहेत.
- आता या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचे पाय दहा ते पंधरा मिनिटं ठेवायची आहेत.
- दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला कोरड्या कापडाने तुमचे पाय पासून घ्यायचे आहे.
हा उपाय पाच – सहा दिवस केल्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल.
मद्याचे पोळ्याचे ताजे मेन वापरून :
तुम्हाला मधाचे खूप सारे फायदे माहिती असतील, पण मधाच्या पोळ्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. यासाठी तुम्हाला-
- तुमचे पाय कोमट पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आहे.
- ताज्या मधाचे पोळे जर तुम्हाला मिळत असेल, तर तुम्हाला त्या पोळ्याचे मेण तयार करून घ्यायचे आहे.
- ते मेण तुम्हाला तुमच्या पायांच्या तळव्यांना मध्ये भरायचे आहे. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल
पायांना तडे नको जायला यासाठी काय काळजी घ्यायला हवी ?
जर तुम्हाला तुमच्या पायांच्या तळव्याला जर तडे जाऊ द्यायचे नसतील, तर तुम्हाला काही छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसे की-
- नेहमीपाय स्वच्छ ठेवावे व आधी मध्ये गरम पाण्याने धुवावे.
- तसेच लक्षात ठेवा हाता पायाला पडलेल्या भेगा लपवणे पेक्षा त्याचे उपचार केले केव्हाही चांगले.
- जर तुमचे पाय सारखे कोरडे पडत असतील व त्यांना तडे पडत असतील तर तुम्ही रात्री झोपताना सुद्धा पायात मोजे घालावे.
- रात्री झोपताना पायांना तेल लावून झोपावे.
- अंघोळ झाल्यानंतर पायांना तेल लावायला हवे.
- रोज रात्री झोपण्याआधी दहा ते पंधरा मिनिटं कोमट पाण्यामध्ये पाणी ठेवावे.
- बाहेर अंगणामध्ये फिरताना नेहमी चप्पल वापरावी.
तर हे होते काही सोपे घरगुती उपाय पायातील तडे घालवण्यासाठी. जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर हि पोस्ट नक्की शेअर करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही उपाय करू नका.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.