पाळी येण्यासाठी घरगुती उपचार कोण कोणते आहे ? ते जाणून घेऊया ! 

पाळी येण्यासाठी घरगुती उपचार

आजकालच्या  पिढीतील तरुणींना व स्त्रियांना मासिक पाळीच्या समस्याना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी ही महिलांना लावलेली नैसर्गिक देणगी आहे, मासिक पाळी म्हणजे स्त्रियांच्या  अंडाशयातून  स्त्री बीज फुटणे होय. पाळी ही मुली 12 ते 13 वर्षाच्या झाल्या की सुरू होते, 

मासिक धर्मात शरीरातील अशुद्ध रक्त हे पाळी द्वारे शरीराबाहेर टाकले जाते. मासिक पाळी चे कालचक्र हे 28 दिवसांचे असते , तसेच ते जास्तीत जास्त 28 ते 35 दिवसाचे असते. प्रत्येक महिन्याला चार ते पाच दिवस मासिक पाळी येते. पाळी जर एक ते दीड महिन्याच्या वर गेली तर ती धोक्याची घंटा सुद्धा असते, मासिक पाळी जर उशिराने आली तर त्या काळातील स्त्रियांची चिडचिड ,डोके दुखी ,कंबर दुखी ,पोट दुखी अशी अनेक समस्यांना स्त्रियांना तोंड द्यावे लागते.तसेच पाळी न  येण्याची अनेक कारणे आहेत ,जसे की गर्भधारणा , गोळ्यांचे अतिसेवन, आहारातील बदल, मानसिक ताणतणाव   गर्भनिरोधक गोळ्या, बदलती जीवनशैली ,बाहेरील खाद्यपदार्थ ,थायरॉईड ,वजन वाढीमुळे, पीसीओडी म्हणजे गर्भपिशवीतील गाठी ,अति थकवा, जास्ती व्यायाम तसेच काही दीर्घ आजाराने सुद्धा मासिक पाळीवर परिणाम होतो .

मासिक पाळी येण्यासाठी काही घरगुती उपचार :

मासिक पाळी येणे म्हणजे स्त्रियांचे उत्तम आरोग्य व  निरोगी असतं .मग मासिक पाळी आली नाही ,तर ती येण्यासाठी कोणकोणते घरगुती उपचार आहे .आपण काय करायला हवे ते आज आपण जाणून घेऊया. 

चला मग जाणून घेऊया, मासिकपाळी येण्यासाठी काही घरगुती उपचार ! 

गुळाचा वापर करून बघा :

गुळ हा गरम असतो ,  त्यासाठी तुम्ही एक चमचा गुळ+ एक चमचा काळे तीळ+ एक चमचा ओवा हे मिश्रण एक ग्लास पाण्यात चांगले  उकळून घ्या. त्यानंतर ते पाणी कोमट झाल्यावर सकाळी उपाशी पोटी प्या, या पाण्याने तुमच्या शरीरात एक प्रकारचा रसधातू तयार होतो , त्याने तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होते.तसेच तुम्ही गुळाचा चहा देखील पिऊ शकतात मात्र ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, त्यांनी गुळाचे सेवन जास्त करू नये.

हळद वापरून बघा :

हो खरंच , हळद ही खूप गुणकारी औषधी आहे. हळद ही उष्ण असते ,त्यामुळे तुम्ही दुधात एक चमचा हळद टाकून नियमित पिऊ शकतात.तसेच ज्यांना दूध आवडत नाही ,त्यांनी कोमट पाण्यात  हळदीची पूड टाकून पिऊ शकतात.हळद हे अँटीसेफ्टीक चे काम करते ,म्हणून हळद ही पाळी येण्यासाठी खूप लाभकारी आहे.तसेच हळद रोजच्या आहारात सेवन केल्याने तुमचे रक्त शुद्ध होते.

पपई खाऊन बघा :

पपई खरंच पाळी येण्यासाठी लाभकारी आहे.पपई ही उष्ण असते, तसेच पपई पीरियड्स जर आली नाही तर वेळेच्या आधी आणण्याची प्रक्रिया देखील करते. पपई खाल्ल्याने महिलांच्या गर्भात रक्ताचे संचलन होते ,त्यामुळे पाळी लवकर येते .पण ज्या महिला गर्भवती आहे त्यांनी पपईचे सेवन करू नये.कारण पपई ने गर्भपात होण्याची शक्यता असते.

अननस खा :

अननस हे शरीरातील उष्णता  वाढवण्याचे काम करते ,तसेच ते फळ चांगले आहे.जर तुम्ही अननस ज्यूस किंवा अननस खाल्ले तर तुमची पाळी लवकर येण्याची मदत होते.

नियमित कारल्याचे सेवन करा :

कारले सुद्धा उष्ण असते, तुम्ही आठवड्यातून तीन ते चार दा कारल्याची भाजी खाल्ल्याने तुमच्या पीरियड्स च्या समस्या देखील दूर होतात .तसेच तुम्ही कारल्याचा रस ही पिऊ शकतात ,त्यासाठी तुम्ही कारल्याचा रस +अर्धा चमचा मीठ हे मिक्स करून उपाशीपोटी पिऊ शकतात. त्याने तुमची पाळी येण्यास मदत होते. 

आल्याचा चहा प्या :

तुम्ही नियमित अद्रक चा चहा पिऊ शकतात. कारण आद्रक हे गरम आहे, तसेच जर तुम्ही अद्रक चा रस एक चमचा आणि मध एक चमचा नियमित सेवन केलं तर तुमची पाळी लवकर येण्याची मदत होते नंतर अंगावर ही व्यवस्थित जाते. 

पिंपळाच्या पानांचा काढा पिऊन बघा :

ज्यांना पीसीओडी म्हणजेच गर्भपिशवीत गाठींचा त्रास आहे किंवा ज्यांची वेळी तीन ते चार महिन्यांनी येते अशा महिलांनी पिंपळाची दहा ते पंधरा  पाने घेऊन ती पाणी तीन ग्लास पाण्यात उकळायला ठेवा ते पाणी एक ग्लास होईपर्यंत आठवून कोमट झाल्यावर उपाशीपोटी घेतल्यास तुमच्या पीसीओडी च्या गाठी हळूहळू कमी होतात , आणि तुमचे पीरियड्स रेगुलर होण्यास मदत होते. 

व्यायाम करा नियमित चालत जा :

तुम्ही हा एकदम सोपा उपाय आहे, जर तुम्ही नियमित व्यायाम तसेच कमीत कमी एक किलोमीटर चालले ,तर तुमच्या पाळीच्या काय तर अजून काही शारीरिक तक्रारी असतील, त्या सुद्धा दूर होतील. खरंच हा उपाय करून बघा खरंच लाभदायी आहे. 

     आज आम्ही तुम्हाला पाळी येण्यासाठी अनेक घरगुती उपचार सांगितले आहेत . आमची आशा आहे की तुम्हाला उपयोगी ठरतील. तसेच तुम्हाला जर हे उपचार करून फरक जाणवत नसेल, तर तुम्ही स्त्रीरोग तज्ञ कडे दाखवू शकतात ,आणि या घरगुती तुम्हाला कशाची ऍलर्जी असेल, तर तुम्ही कोणतेही उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांना विचारा, तसेच तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *