जास्त चहा पिण्याचे नुकसान कोणते ? नक्की जाणून घ्या


जगभरात बहुतांश लोकांची दिवसाची सुरुवात ही चहा या पेयाने सुरू होते. जर आपण बघितले तर काही मोजक्या लोकांना सोडून जास्तीत जास्त लोक चहा या पेयाचे सेवन करतात. त्याचबरोबर काही लोकांना जर सकाळी चहा मिळाला नाही तर त्यांच्या दिवसाची सुरूवात नीट झालीच नाही असेही त्यांना वाटते किंवा त्यांचा दिवस चांगला जात नाही. पण जर तुम्ही दिवसातून एक वेळा चहाचे सेवन करत असाल तर काही हरकत नाही किंवा ते तुमच्या शरीरास गुणकारी ठरते.

कारण चहा या पेयामध्ये मध्ये कैफीन हा पदार्थ असल्यामुळे तो शरीरास गुणकारी ठरतो. पण जर तुम्ही दिवसातून चार-पाच वेळा चहाचे सेवन करत असाल, तर ते तुमच्या शरीरास खूप हानिकारक आहे. अधिक चहा पिणे कधीही टाळायला हवे. काही जणांना चहाचे सेवन करायला इतके आवडते की ते चहा शिवाय राहूच शकत नाही.

काही जण स्वतःला झालेला आनंद चहा पिऊन साजरा करतात. पण त्यांना अधिक चहा पिल्याने कोणकोणते नुकसान होतात ? आणि अधिक चहा पिल्याने शरीरास कोणकोणत्या गोष्टी हानिकारक ठरतात ? या काही गोष्टी माहीत नसल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना ते बळी पडतात.

काही लोक तर सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पितात म्हणजेच बेड टी घेतात. तर काही लोक उपाशीपोटी चहाचे सेवन करतात. काही लोकांनी तर चहाला अमृत अशी उपमा दिली आहे. तर काही लोकांमध्ये चहा चांगली की कॉफी या संदर्भात चर्चेचा विषय निर्माण होतो.

सकाळी उठल्यावर चहा पिणे हे शरीरास उत्तम तर आहेच. पण त्याच बरोबर जर आपण जास्त चहाचे सेवन केले तर ते आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.त्यामुळे मित्रांनो आज आपण बघणार आहोत जास्त किंवा अधिक प्रमाणात चहा पिल्याने आपल्या शरीरास कोणकोणते नुकसान होऊ शकतात ? चला तर मग बघुया !

कमी प्रमाणात चहा पिण्याचे फायदे :-

आता आपण जाणून घेऊ जर तुम्हाला चहा शिवाय मन लागत नसेल आणि तरी तुम्हाला त्या पासून फायदे हि मिळवायचे असतील तर आपण साखरे चा चहा पिण्या ऐवजी गुळाचा चाह प्यायलो, तर आपल्याला त्याचे खूप फायदे मिळू शकतात. जसे कि –

ताजे व फ्रेश वाटते :-

आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपण बघतो की वाहनचालक ,नोकरी करणारी माणसे आणि त्याचबरोबर असे वेगवेगळे लोक आपल्या जिवनातील थोडा वेळ चहासाठी देतात. चहामध्ये कैफीन हा पदार्थ आपल्या शरीरास गुणकारी ठरतो. चहाचे थोडे सेवन केल्यामुळे आपल्याला आपली कामे करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे फ्रेश किंवा ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. चहा मध्ये गुळ असल्याने अधिक ताजे तवाने वाटते.

ब्लॅक-टी पिल्याने होणारे फायदे:-

मित्रांनो जर आपण जर दुधाचा चहा ऐवजी ब्लॅक-टी या चहाचे सेवन केले तर आपल्याला व आपल्या शरीरास हे गुणकारी ठरते किंवा लाभदायक ठरते.त्याचबरोबर जर आपण रोज सकाळी ब्लॅक- टी चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील सौंदर्य तेजस्वी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर सौंदर्याच्या,त्वचेच्या काही समस्या दूर होतात.

बऱ्याच लोकांची पुरेशी झोप न झाल्यामुळे त्यांचे डोळे सुजतात व त्यांचा चेहरा विचित्र दिसायला लागतो.जर तुम्हाला डोळ्याखालची सूज घालवायची असेल तर ब्लॅक-टी हा उत्तम पर्याय आहे. ब्लॅक-टी मध्ये असणारा एंटीऑक्सीडेंट मुळे शरीराच्या बहुतांश समस्यांचा नाश होतो. त्यामुळे दुधाचा चहा पिण्यापेक्षा ब्लॅक-टी पीने हा उत्तम पर्याय आहे.

शरीराला तत्पर बनवतो :-

आपण जर आपल्या दैनंदिन दिवसातला थोडासा वेळ चहाचे सेवन करण्यासाठी काढला. तर थोडाशा चहाने आपल्या शरीरास भरपूर फायदे होऊ शकतात, जसे की आपली एकाग्रता वाढते. त्याचबरोबर शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी मदतीस गुणकारी ठरते. त्यामुळे कमी प्रमाणात गुळाच्या चहाचे सेवन केलेले केव्हाही उत्तम ठरते.

जास्त चहा प्यायल्याने होणारे नुकसान:-

वरील भागात आपण बघितले कमी प्रमाणात चहा पिल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणते फायदे होतात ? त्याचबरोबर आपण आता बघणार आहोत, अधिक प्रमाणात चहा पिल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या आजारांना किंवा समस्यांना सामोरे जावे लागते ?

ऍसिडिटी होते :-

जर आपण अधिक प्रमाणात म्हणजे दिवसातून जर आपण चार-पाच वेळा चहाचे सेवन केले, तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. जास्त चहा पिल्यामुळे आपल्याला ऍसिडिटीसारखा त्रास निर्माण होऊ शकतो. अधिक ऍसिडिटी निर्माण झाल्यामुळे आपल्या शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शरीरात पुरेशी ऊर्जा राहत नाही आणि कोणतेही काम करण्यासाठी मन लागत नाही. खूप लोकांना ऍसिडिटी चा त्रास होत असतो आणि त्यांना जाणवतच नाही कि ऍसिडिटी होण्याचे कारण हे चहा आहे.

रात्री झोप लागत नाही :-

जर तुम्ही चहाचे अधिक प्रमाणात सेवन करत असाल तर त्यामुळे आपल्याला निद्रानाश होणे अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपण अधिक चहा पिल्यामुळे आपल्या शरीरात कैफिनचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्यामुळे आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही व त्यामुळे आपल्याला वेगवेगळया झोपेच्या गोळ्या घ्यावे लागतात आणि त्यामुळे आपल्या शरीरास अधिक चहा पिणे हे हानिकारक ठरू शकते.

भूक लागत नाही :-

आपण जर अधिक प्रमाणात चहाचे सेवन केल तर आपल्याला जास्त भूक लागत नाही,कारण आपण जास्त चहा पिल्यामुळे आपली जेवणाची इच्छा नष्ट होते व त्यामुळे आपल्या नीट भूकही लागत नाही. तर कधी कधी आपण अधिक चहा पिल्यामुळे आपण जेवण करणे ही टाळतो.त्यामुळे अधिक प्रमाणात चहा पिणे नेहमी टाळावे.

तर मित्रांनो आज आपण बघितले अधिक प्रमाणात चहा पिल्यामुळे आपल्या मानवी शरीराला कोणकोणते नुकसान होऊ शकतात? जर तुम्हाला या संदर्भात अजून माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *