कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे नक्की कोण कोणते? चला तर मग जाणून घेऊया ! 

कडू लिंबाच्या पानाचे फायदे

कडूलिंबाचे झाड हे सगळ्यांनीच बघितले असेल, कडुनिंबाचे झाड हे नैसर्गिक रित्या उगवते. या झाडाची पाने तसेच, फळे, या झाडाची मुळे तसेच या झाडाची साली आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कडूलिंबाच्या झाडा मध्ये बहुगुणी असे तत्व असतात. कडूलिंबाचे पान खायला कडू असतात. त्यामुळे त्यांना कडुलिंब असे म्हणतात. कडूलिंबा मुळे प्रदूषणही होत नाही. तसेच मराठमोळ्या सणांमध्ये कडुलिंबाचे फार महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस मध्ये गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानांची डहळी कलशावर  लावून गुढीपाडवा पुजला जातो. तसेच त्या दिवशी कडुनिंबाची पाने आणि गूळ याचे चाटण केले जाते, ते आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते. तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही कडूलिंबाचे पाने फार महत्त्वाची असतात. कडुलिंबाच्या पानांपासून दंतमंजन बनवले जाते. तसेच साबण, शाम्पू, फेसपॅक तसेच कडुलिंबाचा तेलही बनवले जाते. या बहुगुणी झाडांचे अजून भरपूर काही महत्त्व आहे.

कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे :

चला, तर मग जाणून घेऊया, की कडूलिंबाच्या पानां पासून आपल्या आरोग्याला कोणकोणते फायदे होतात.

मधुमेह रोखण्यास मदत करतो :

हो, खरंच तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण कडूलिंबाच्या पानांचे उपयोग डायबेटिस अर्थात मधुमेह रोखण्यासाठी फार फायदेशीर असतो. कडुलिंबाचे पाने हे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणतात. मधुमेही लोकांनीं जर रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ली तर, त्यांची लवकरात लवकर मधुमेहापासून सुटका होते, करून बघा, अगदी साधा सोपा उपाय आहे.

फंगल इन्फेक्शन वर फार गुणकारी आहे

कडूलिंबाला गावठी वनौषधी असे म्हणतात. कडू लिंबाचे पान दिसायला छोटी पण फार गुणकारी असतात, तसे त्याचे फळे फार गुणकारी असतात. जर कोणाच्या अंगाला खाज खुजली किंवा पिंपल्स झाले असतील, त्यांनी कडूलिंबाचे पाने गरम पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ केली, तर त्यांना लवकरात लवकर फायदा होईल. तसेच कडुलिंबाची पेस्ट करून तुम्ही  फंगल इन्फेक्शन च्या जागीही लावू शकतात, कारण की कडूलिंबाचे पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटीफंगल आणि ऑंटी पॅरासिटीकानासारखे यासारखे गुण असतात. जे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात.

कडुलिंबाची पाने चेहरा उजळण्यासाठी फार फायदेशीर असतात

कडुलिंबाची पाने खरच, तुमच्या चेहऱ्यासाठी फार फायदेशीर असतात. तुम्ही कडुलिंबाच्या पानांनी फेसपॅक बनवून चेह-याला लावू शकतात. तुम्ही कडू लिंबाच्या पानांचा फेसपॅक जर चेहऱ्याला लावला तर, तुमच्या त्वचेवरील काळे डाग तसेच वांग चे डाग कमी होण्यास मदत मिळते.  तुमचा चेहरा ही उजळतो हा फेसपॅक कसा बनवावा, तर त्यासाठी तुम्ही कढीलिंबाची ताजी आठ ते दहा पाने घ्या, ती स्वच्छ धुवा, त्यानंतर तुम्ही ती मिक्सरमध्ये वाटून, त्यात एक चमचा गुलाबजल+ एक चमचा मुलतानी माती + थोडसे मध घालून हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा, आणि तो पॅक पंधरा ते वीस मिनिटानंतर धूवा. बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

केसांसाठी पोषक तत्व आहे कडूलिंबाची पाने

कडुलिंबाची पाने केसांसाठी फायदेशीर ठरतात. वातावरणातील बदल तसेच, अवेळी खानपान मुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, तसेच केसांवरही होतो. त्यामुळे आपले केस रुक्ष होतात, गळतात, केसांमध्ये कोंडा होतो. त्यासाठी कडुलिंबाची पाने आपल्या केसांसाठी फार फायदेशीर असतात. तसेच कोणाला केसांमध्ये फंगल इन्फेक्शन होते, त्यासाठी कडुलिंबाची पाने फार फायदेशीर असतात, त्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने खोबर्याच्या तेलात उकळून, ते तेल तुम्ही रात्री केसांना लावून, सकाळी कोमट पाण्याने धुवा. त्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तसेच तुम्ही कडुलिंबाची पेस्ट करून तुमच्या डोक्याला अर्धा तास लावा. त्याने तुमचे केसही मजबूत होतील, तसेच केसांमध्ये उवा असल्यास ते हि जातील. आणि फंगल इन्फेक्शन वर ही लवकरात लवकर आराम मिळेल, आणि केस वाढण्यास मदत मिळेल.

कडूलिंबाची काडी दातांसाठी खूप फायदेशीर ठरते

हो, तुम्हाला जाणून खरंच आश्चर्य वाटेल. पण  कडूलिंबा मध्ये फंगस आणि अंटीबॅक्टरियल गुण असतात. ज्या लोकांना हिरड्या दुखणे चा त्रास असेल किंवा दातांतुन रक्त येत असेल, दातांना कीड लागली असेल, त्यांनी कडूलिंबाची काडी फार फायदेशीर ठरेल. तुम्ही कडू लिंबाची काडी दंत कांती साठी वापरू शकतात. कडुलिंबाची छोटी काडी तोडून तिला ब्रश  केल्यासारखे दातांवर फिरवा तुमचे त्याने दात आणि हिरड्या मजबूत होतील. तसेच कडूलिंबाच्या पानांच्या दंतकांती कोलगेट त्याच्यात वापर केला जातो.

पोटाच्या समस्यांवर कडूलिंबापासून आराम मिळतो

अनेक जणांना पोट साफ न होणे, पोट दुखणे असे समस्या असतात. पित्त होणे ,अपचन होणे त्यासाठी जर तुम्ही कडूलिंबाचा वापर केला, तर फार फायदेशीर होईल. तुम्ही कडू लिंबाची साल त्यात मिरीपूड थोड सुंठ हे मिसळून  ते पाण्यासोबत घ्या. असे तीन चार दिवसात तुम्हाला पोटावर फरक जाणवेल, तसेच तुमच्या पोटात कृमी, जंत झाले असेल, त्यावर ही तुम्हाला फरक जाणवेल.

कडू लिंबाचे पाने घरात मच्छर यांचा शिरकाव झाल्यास उपाय देखील करतात

आता हे काय नवीन, तर खरंच घरात किडेमकोडे, मच्छर जास्त प्रमाणात झाले असल्यास, तुम्ही लोखंडाच्या कढईत 20 ते 25 पाने जाळून त्याची घरात दारं-खिडक्या बंद करून, धूर करा. त्याने सगळे मच्छर  मरून जातील, आणि घरात एक प्रसन्न वातावरण राहील.

चला, तर आज आम्ही तुम्हाला कडू लिंबाचे पान, साल, व डहळी यांच्या विषयी भरपूर माहिती तुम्हाला दिली आहे, ती आयुर्वेदात कशी वापरली जाते, तेही सांगितले आहे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

धन्यवाद


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *