सगळ्यांनाच वाटते की ,आपला चेहरा एकदम सुंदर आकर्षक असावा . पण काहींच्या चेहऱ्यावर पिंपल्स नावाचा ग्रहण लागलेल आपल्याला दिसते, पिंपल्स हे बहुतेक लोकांना होतात चेहऱ्यावरील पिंपल्स ला कसे ? आटोक्यात आणायचे हे आपण बघू.
आपल्या चेहऱ्यावर सीबम हा एक प्रकार च्या तैलिय ग्रंथी असतात, त्यामुळे पिंपल्स स्त्री-पुरुषांना तसेच वयात येणार्या मुला-मुलींना ही होतात. पिंपल अनेक कारणांमुळे होतात , जसे की स्त्रियांना अनियमित मासिक धर्म तर काही स्त्रियांना ‘पीसीओडी’ म्हणजे ओवरीज मध्ये गाठी झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, काहींना बाहेरील धूळ मुळेही पिंपल्स येतात, तसेच काहींनी चुकीचे फेअरनेस-क्रिम वापरल्यामुळे सुद्धा त्यांना पिंपल्सची समस्या होऊ शकते, कारण फेअरनेस क्रीम मुळे चेहऱ्यावरील रोमछिद्रे बंद पडतात त्यांनी आपल्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या वाढते. कधीकधी ज्यांच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल, तर त्यांच्याही चेहऱ्यावर पिंपल्स होतात , त्यात जर काही जणांनी पिंपल्स आल्यावर त्या फोडल्या तर त्या पिंपल्स फोडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात तर कोणाच्या चेहऱ्यावर पिंपल्स आल्याने खड्डे देखील पडतात, अशी अनेक पिंपल्स येण्याची कारणे आहेत मग त्या पिंपल्स जाण्यासाठी व चेहरा डाग विरहित करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का ?
चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी काही घरगुती उपाय :
चला मग जाणून घेऊया की पिंपल जाण्यासाठी काही घरगुती उपाय –
पिंपल्स जाण्यासाठी मसूर च्या डाळीचा लेप लावा :
हो ,खरंच मसुरची दाळ ही पिंपल्स घालवण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही –
- तुम्ही दोन ते तीन चमचे मसुरची डाळ पंधरा मिनिट भिजवू द्या.
- भिजल्यानंतर ती वाटून घ्या.
- त्यात थोडेसे मध व चिमूटभर हळद घाला.
- तो लेप तुम्ही 20 ते 25 मिनिटे चेहर्यावर लावा.
- लेप सुकल्यानंतर अलगत काढा मग चेहरा धुवा.
तुम्हाला असे हप्त्यातून दोन ते तीन दा करायचे आहे त्याने तुमचे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होताना दिसतील तसेच , तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तेसुद्धा कमी होऊन तुमचा रंग उजळेल.
कोरफड वापरून बघा :
कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफडीचा वापर बहुतेक आजारांवर रामबाण उपाय आहे, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफडचा जेल किंवा कोरफडचा गर काढून लावू शकतात. कोरफड ने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. तसेच चेहऱ्यावरचे काळे डाग सुद्धा जातात, जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तुम्ही –
- कोरफडीचा गर काढून केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना लावा.
- अर्ध्या तासानंतर तुम्ही केस धुवा त्याने तुमच्या केसांना चमक येईल, शिवाय कोंडाही कमी होईल.
केसांतील कोंडा कमी झाला तर तुमचे चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या दूर होईल, हा उपाय तुम्ही हप्त्यातून दोनदा नक्की करून बघा.
हळद वापरून बघा :
हो, खरंच हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिया गुणधर्म असतात, त्यासाठी तुम्ही एक कप गरम दुधात अर्धा चमचा हळद टाका हे हळदीचे तुम्ही जर सकाळ-संध्याकाळ घेतले तर तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होईल .
तसेच तुम्ही रात्री झोपताना दुधाची साय एक चिमटी हळद यांचे मिश्रण चेहऱ्याला लावले तर पिंपल च्या समस्या देखील दूर होतील शिवाय चेहरा उजळेल.
पपईचा गर लावून बघा :
हो पपईमध्ये अँटी-ऑक्सीडेंट व विटामिन ची मात्रा असते त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. तुम्ही पिकलेल्या पपईचा गर चेहर्यावर लावा , पपई चा गर दहा ते पंधरा मिनिटं नंतर धुवून टाका, त्यामुळे तुमचे चेहऱ्यावरील डाग जातात तसेच तुमचा चेहरा मऊ आणि मुलायम होतो हे नक्की करून बघा.
चंदन व मुलतानी मातीचा लेप लावून बघा :
तुम्ही चंदन पावडर एक चमचा +मुलतानी माती एक चमचा+ हळद +दूध+ मध याची पेस्ट बनवून 15 ते 20 मिनिटे तुमच्या चेहऱ्यावर लावा, तो लेप सुकल्यानंतर धुऊन टाका या पॅक ने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन डागही कमी होतात.
लिंबू व मध वापरून बघा :
लिंबू व मध याच्या वापराने तुमचे चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग ,वांग चे डाग ,मानेवरील काळसरपणा , हातापायाची ढोपर जर काळवंडले असतील त्यावर तुम्ही अर्ध्या निंबाच्या रसात चार ते पाच मधाचे थेंब टाकून त्या ठिकाणी लावा, असे हप्त्यातून तीन ते चार वेळा केल्यास तुमचे पिंपल्स व ते काळे डागही कमी होतील तुम्हाला फरक नक्की हा प्रयोग तुम्ही करून बघा.
चणा डाळीचे पीठ वापरून बघा :
तुम्ही दोन ते तीन चमचे चनाडाळी चे पीठ+ दूध +हळद +मध +लिंबाचा रस हे मिश्रण करून तुमच्या चेहऱ्यावर 20 ते 25 मिनिटे लावा , त्यानेही तुमचा चेहरा उजळेल व पिंपल्स आणि डाग वीरहित होईल.
बर्फाचा फेसपॅक वापरावा :
तुम्ही जर कोणताही मेकअप केला असेल तो धुतल्यानंतर तुम्ही बर्फाचा पॅक (ICE) चेहऱ्यावर लावा कारण बर्फाने तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रे उघडतात शिवाय तुमच्या चेहर्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात, ज्यांच्याकडे बर्फाच्या पॅक नसेल त्यांनी दिवसातून सात ते आठ वेळा चेहरा थंड पाण्याने धुवा हा उपाय बिना खर्चिक आणि साधा सोपा आहे हा तुम्ही नक्की करून बघा.
अशी अनेक घरगुती उपचार आहेत, तुम्ही करून बघा ,तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स व चेहऱ्यावरील वांगाचे डाग ,काळे डाग ,सुरकुत्या, असतील तर हा घरगुती उपचार करून बघा, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आवडेल आणि जर ज्यांना हे उपचार करूनही फरक जाणवत नसेल त्यांनी तज्ञ डॉक्टर कडे दाखवा, तसेच ज्यांना अजून काही शंका असतील त्यांनी आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.

Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.