पोट साफ होत नाहीये का ? कारणे व सोपे घरगुती उपाय


आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांनाच बघायला मिळते की प्रत्येक जण आपापल्या जीवनातील त्रासाला तोंड देत आहे. प्रत्येक माणूस आपले पोट भरण्यासाठीच काम करत असतो. तसेच दिवसभर श्रम करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये पण जर आपले पोट साफ होत नसेल  तर मग आपले कुठल्याच कामात लक्ष लागत नाही.

मित्रांनो बरेचदा आपल्याला हा त्रास होतोकी आपले पोट साफ होत नाहीये कारण आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आपण आपल्या तब्येतीकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे आपण कधी बाहेरचे खातो कधी कोणतेही पदार्थ खातो अनियमित आहार घेतो. आपले जर पोट नीट साफ नसेल तर आपले दिवसभरामध्ये कशामध्ये ही लक्ष लागत नाही. तसेच कोणतेही काम नीट पार पडत नाही.

पोट साफ न होने किंवा अपचन होणे. याला तीन गोष्टी कारणीभूत असतात आहार, विहार आणि मन कारण बऱ्याच आपल्या जिभेवर ताबा नसल्यामुळे आपण जे पदार्थ शरीराला नको आहेत अथवा फार गरजेचे नाही ते पदार्थ खातो  म्हणून आपली पचनक्रिया बिघडते मग आपल्याला अपचन, पोट साफ न होणे असे त्रास उद्भवतात.

तर आपण आज बघणार आहोत जर आपले पोट साफ होत नसेल तसेच अपचन ची समस्या येत असेल तर त्याची कारणे कोणती आहे. त्याचबरोबर त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते चला तर मग बघुया.

पोट साफ न होण्याची प्रमुख कारणे :

1. बाहेरचे जास्त खाणे
2. अवेळी जेवण करणे
3. व्यायामाचा अभाव असणे
4. फायबर्स ची कम करतात
5. पुरेशी विश्रांती न घेणे

अशी बरीचशी कारणे आहेत आपले पोट व्यवस्थित साफ न होण्याचे कारण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असतात, त्यानुसार त्या शरीराच्या वेगवेगळ्या गरजा असतात. तसेच आपण रोज घरचे खातो पण एक दोन दिवस बाहेरचे खाल्ले तर लगेच आपल्या पोटावर त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच अवेळी जेवण जेवल्याने त्याचबरोबर आपण पुरेसा व्यायाम करत नाही हालचाल करत नाही. तसेच आपल्या शरीराला गरज असलेले फायबर्स पण घेत नाही अति श्रम करून पुरेशी विश्रांती घेत नाही ही कारणे असू शकतात आपले पोट साफ न होण्याची.

पोट साफ होण्याचे सोपे घरगुती उपाय :

आपले पोट साफ होत नसेल तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये फायबरचे सेवन केले पाहिजे, फायबर मुळे आपले पोट साफ होते. तसेच आपण बघणार आहोत अजून कोण कोणते घरगुती उपाय आहेत पोट खाली होण्याचे चला तर मग जाणून घेऊया.

दही खाणे :

नेहमी दिवसा जेवण झाल्यवर एक वाती दही खायला हवी. दही मध्ये जीवाणु असल्यामुळे ते आपल्या पोट साफ करण्याचे काम करतात. दही खूप पोषक असते आपल्या पोटाचे विकार दूर करण्यासाठी.

लसून करेल पोट साफ :

जर तुमचे पोट साफ होत नसेल आणि तुम्हाला टॉयलेट मध्ये खूप वेळ बसून राहावे लागत असेल, तर तुम्ही दिवसाला एक लसणाची पाकळी भाजून खायची आहे. तुम्हाला चव आवडत नसेल तर तुम्ही मधामध्ये मिसळून सुद्धा घेऊ शकतात. तुम्हाला जर लसणाची एलर्जी असेल तर कृपया हा प्रयोग टाळावा.

सीताफळाचा पाला चाऊन खावा :

आपल्याला जर पोट लवकर साफ होत नसेल. ही समस्या जर आपल्याला असेल तर आपण सिताफळाच्या झाडाचे पान घ्यावे ते पान कवळे ही नको व जास्त निंबर ही नको मध्यम असे हे पान घ्यायचे आहे. सीताफळच्या झाडाचे हे पान तुम्ही रोज सकाळी ब्रश झाल्यानंतर एक पान चावून खावे. सिताफळाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतात. ते तुमचे पोट लवकर साफ होण्यास मदतीची ठरते. आपण दिवसभरातून फक्त एक पान खाल्ल तरी पुरेसे आहे.

ओवा व जिरे घेऊन बघा :

आपण थोडे ओवा व जीरे भाजून घ्यावे, त्यानंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यामध्ये काळे मीठ टाकावे. ओवा व जिरे यांचे चूर्ण बनवून दाताने चावून खावे. रोज जेवण झाल्यावर हे चूर्ण खावे. असे केल्यास तुमच्या पोटाची समस्या दूर होऊ शकते.

कडुलिंब चा रस व आल्याचा रस:

आपण कडुलिंब चा रस पिल्याने आपल्या पोटाचे विकार नाहीसे होतात. तसेच आपण कडुलिंब च्या पानांचा रस करून घ्यावा. त्याचबरोबर तुम्ही त्यामध्ये एक चमचा आल्याचा रस टाकावा, जर तुम्हाला खूप कडू लागत असेल तर एखादा गुळाचा खडा टाकावा. हा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा. असे केल्याने आपले पोट लवकर साफ होण्यास मदत होईल. तसेच तुमच्या सर्व समस्या नाहीसा होण्यास मदत होईल.

योगा व व्यायाम करावा :

आपल्याला अपचनाचा त्रास होतो. कारण आपण पुरेशा प्रमाणामध्ये हालचाल करत नाही. म्हणून आपण रोज योगा केला तर तो रामबाण उपाय आहे. कारण योगाचे खूप महत्त्व आहे. तसेच आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला योगाचा फायदा होतो. आपण जर योगा कराल तर त्यामध्ये पोटाचे आसन मुख्यताहा करावे जसे की नौकासन, धनुरासन असे असं करावे. तसेच तुम्ही जर योगा करत नसेल तर दुसरा प्रकारचा व्यायाम करावा.

तसेच जर तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ दिवसातून एकदा थोडेसे गवतावर चालावे. कारण व्यायाम हा सगळ्यात चांगला उपाय आहे. आपल्या शरीराच्या समस्या सोडवण्याचा व्यायाम हा खूप चांगला पर्याय आहे. असे काही दिवस केल्यास तुमची पोटाचा त्रासापासून सुटका होऊ शकते.

पुरेशी झोप घेणे :

आपल्या शरीराच्या बऱ्याच समस्या आपण झोप न घेतल्यामुळे उद्भवतात. कारण आपण खूप परिश्रम करतो दिवसभर खूप काम करतो. आपले शरीराची धावपळ होते, म्हणून आपण विश्रांती घेतली तर आपल्या शरीराला ताकद मिळते व जोमाने आपण काम करतो. पण जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर त्याचा परिणाम सरळ सरळ आपल्या शरीरावर दिसून येतो. मुख्यताहा त्याचा परिणाम आपल्या पोटावर दिसून येतो म्हणजेच अपचन व पोट साफ न होणे असे त्रास होतात.

अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी नक्की शेअर करा. अधिक त्रास होत असेल पोट साफ होत नसेल तर आपली डॉक्टरांना अवश्य भेटा.


One response to “पोट साफ होत नाहीये का ? कारणे व सोपे घरगुती उपाय”

  1. 1)माझे डोक्यावर चे केस खुप पातळ आहे तसेच केस गळतात पण खूप
    2)माझ्या दाढी चे केस जरा व लाल झाले आहेत
    कृपया ह्या दोन्ही विषयावर योग्य उपाय सुचविण्यात यावा हि नम्र विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *