आपल्या धावपळीच्या जीवनात आपण विविध कामे करत असतो, ही कामे करत असताना आपण आपल्या शरीराकडे पुरेसा प्रमाणात लक्ष देत नाही. पण आपण जर वारंवार आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असाल, तर त्यामुळे आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते किंवा आपल्याला विविध समस्या किंवा आजार उद्भवू शकतात. बऱ्याच लोकांना विविध समस्या उद्भवत असतात त्यामधील एक महत्वपूर्ण समस्या म्हणजे मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन होणे , कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला खाज येणे लाल पुरळ येणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. या समस्या उद्भवण्याची विविध कारणे असू शकतात, जेणे करून आपल्याला अशा समस्या उद्भवू शकतात जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन सारखी समस्या उद्भवली असेल तर या समस्येकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.
जर तुम्ही फंगल इन्फेक्शन होणे या समस्येकडे दुर्लक्ष केले तर, त्याचे नुकसान आपल्या शरीराला होऊ शकते, त्याचबरोबर ही समस्या लवकरात लवकर बरी होऊ शकणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला जर फंगल इन्फेक्शन झाली असेल, तर तुम्ही त्यावर त्वरित उपचार करावे.
मांडी मध्ये फंगल इन्फेक्शन होणे या समस्येवर घरगुती उपाय :-
उन्हाळ्यात त्याच बरोबर पावसाळा ऋतु मध्ये बऱ्याच लोकांना फंगल इन्फेक्शन होणे अशा समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे आपल्या शरीरात अधिक प्रमाणात घाम निर्माण होतो हा घाम जर आपण स्वच्छ पुसला नाही, तर आपल्याला फंगल इन्फेक्शन होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर पावसाळा ऋतु मध्ये बऱ्याच वेळा मुले कपडे सतत घातल्यामुळे देखील फंगल इन्फेक्शन होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
पण आपण हे फंगल इन्फेक्शन वेगवेगळी घरगुती उपाय यांचे वापर करून दूर करू शकतो, त्यामुळे आपण फंगल इन्फेक्शन वर घरगुती उपाय करणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत, की मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन होणे या समस्येवर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ? चला तर मग बघुया !
● कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावावी :-
कडुलिंबाची पाने ही अत्यंत गुणकारी पाने म्हणून ओळखली जातात, कडूलिंबाचा आपण वापर विविध कामासाठी करतो त्याचबरोबर विविध मंगल कार्य देखील कडूलिंब यांचा वापर केला जातो.
आयुर्वेदानुसार कडू लिंबाच्या पानांना एक विशिष्ट दर्जा प्राप्त झाला आहे. कडुलिंबाचे पाने ही एंटी फंगल पाने म्हणून ओळखली जातात. जर तुम्हाला मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन झाले असेल, तर तुम्ही कडू लिंबाच्या पानांचा वापर करून बघावा.
कडूलिंबाची सात ते आठ पाने घेऊन या पानांचा चुरा करावा किंवा त्यांचे बारीक बारीक तुकडे करावे व त्या मध्ये थोडेसे पाणी टाकून ते मिश्रण एकजीव करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
ही पेस्ट मांडणीमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला फंगल इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी लावावी व दहा ते पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने ती जागा धुवून काढावी, असे जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केले तर तुमच्या मांडणी मधील फंगल इन्फेक्शन दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते, त्यामुळे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो.
● एलोवेरा जेल चा वापर करून बघावा :-
एलोवेरा हे देखील आपल्या आयुर्वेदानुसार खूप गुणकारी आहे असे मानले जाते एलोवेरा चा वापर हा विविध फेस वॉश बनवण्यासाठी देखील केला जातो त्याच बरोबर एलोवेरा जेलचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात, जर तुम्हाला मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन झाले असेल, तर तुम्ही त्यावर एलोवेरा जेल चा वापर करावा.
जर तुम्ही एलोवेरा जेल चा वापर केला, त्यामुळे तुमच्या मांडी मधील आलेले फंगल इन्फेक्शन दूर होण्यास मला मदत मिळू शकते. हे तुम्ही दिवसातून दोन वेळा वापर करावा त्याचबरोबर असे जर तुम्ही 15 ते 20 दिवस गेले तर तुम्हाला या समस्येपासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते, त्यामुळे हा एक महत्त्वाचा उपायदेखील मानला जाऊ शकतो.
● ओले कपडे घालणे टाळावे :-
जर तुम्ही सतत ओले कपडे घालत असेल तर त्यामुळे देखील मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन होणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात व त्याचे नुकसान आपल्या शरीराला होऊ शकते, त्यामुळे आपण ओले कपडे घालने हे टाळावे. जेणे करून आपल्याला फंगल इन्फेक्शन त्याचबरोबर खाज व लाल लाल पुरळ येणे अशा समस्या उद्भवणार नाही.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.
आपण आज बघितले की मांडीमध्ये जर फंगल इन्फेक्शन झाले असेल तर या समस्या कोणकोणत्या घरगुती उपाय करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.
One response to “मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन होणे या समस्येवर घरगुती उपाय”
Thank you very much for sharing useful information