भूक वाढीसाठी उपाय
भूक न लागणे किंवा भूक वाढीसाठी उपाय मध्ये आपण आज आपल्याला काही अश्या घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण कुठलेही टोनिक औषध गोळ्या न खाता भूक वाढवू शकतो.
बऱ्याचदा आपल्याला भूक लागत नाही. आणि जेवण अपूर्ण होऊन अशक्त पणा येतो. अश्या वेडेस दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी योग्य उपचार करावा.
भूक न लागणे ची लक्षणे:
खायची इच्छा न होणे, तोंडाला चव नसणे, थोडं खाऊन ही पोट जड होणे व भूक न लागणे.
भूक वाढीसाठी काय खावे:
साळीच्या लाह्या, मेथी, कारले, मूग, पपई, डाळिंब, आवळा, लिंबू, ताक, आले, पुदिना, कोथिंबीर, कुळीथ, तूप, मसाल्याचे पदार्थ इत्यादी पदार्थ खावे.
भूक वाढीसाठी काय खाऊ नये:
चणे, उडीद, चवडी, पावटा, केळे, दही, चीज, सीताफळ, साबुदाणा, रताडे, थंड पाणी, तळलेले पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ खाल्ल्यास पोट जड होते आणि भूक मिटते. काही खायची इच्छा नाही होत.
भूक वाढीसाठी उपाय :
- एक चमचा आले लिंबाच्या रसात चिमूटभर हिंग व सैंधव टाकून जेवणाच्या आधी चाटून खाल्ल्यास भूक चांगली लागते.
- जेवताना भाताच्या पहिल्या घास बरोबर हिंग, मिरे, जिरे, ओवा, व सैंधव एकत्र करून केलेले चुरन पाव चमचा घ्यावे.
- रोज जेवताना पाव लिंबू खाल्ल्यास जेवण पचते व भूक लागते.
- तीव्र आचेवर बऱ्याच वेळ उकळलेले पाणी प्यावे. गरम पाणी पिणे अधिक फायद्याचे ठरते.
- जेवणाआधी आल्याच्या छोटा तुकडा किंचित सैंधव घालून खवा घेतल्याने भूक वाढते.
- जेवणात पुदिना, आले, लसूण, यांची चटणी खाल्ल्यास तोंडाला चव येते आणि भूक लागते. आणि जेवणात वाढ होते.
- तोंड कडू होऊन खायची इच्छा होत नसल्यास तीन चार आमसुले एक कप पाण्यात 10-15 भिजत घालावी व नंतर कुसकरून गाळून घ्यावे. या पाण्यात चिमूटभर जिरेपूड टाकून घोट घोट घ्यावे.
- भूक न लागणे हे पचन शक्ती मंद झाल्याचे लक्षण आहे. त्यामुडे फुलका, भाजी, ताक, असा साधा आहार घ्यावा.
- जेवण नंतर एक वाटी ताक चिमूटभर हिंग, जिरे, व सिंधव टाकून पिल्याने खाल्लेल लवकर पचते आणि आपली भूक वाढीसाठी मदत होते.
- जेवणा आधी पाणी पिणे टाळावे, दिवस झोपू नये, नियमित व्यायाम करावा.
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
मूळव्याध घरगुती उपचार उपाय मराठी मध्ये
मानसिक ताण तणाव कमी करण्याचे उपाय
अपचन घरगुती उपाय मराठी मध्ये