नमस्कार मित्रानो आयुर्वेदिक उपचार मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांच्या वापरामुळे आपण घर च्या घरी एक स्वस्थ आणि शांत जीवन जगू शकतात . बहुतेक रोगांचे मूळ मनात असते. यासाठी मन नेहमी शांत आणि निर्मल असायला पाहिजे. काही व्यक्ती असे काम करता की त्यांची जेवणाची वेळ निश्चित नसते आणि ते विश्रांती ही नीट करत नाही. त्यामुळे मानसिक ताण तणाव वाढतो.
अनेकवेळा करावे लागणारे काम आपल्या मनाला आवडेल असे नसते, सतत वरिष्ठांच्या दबाव खाली काम करावे लागते. काम ठराविक वेळेत करून द्यावे लागते यामुळे मानसिक ताण तणाव वाढतो.
मानसिक तनाव मुळे रक्तदाब वाढतो ते तर सर्वांना माहितीच आहे पण अजून त्यामुळे मधुमेह, त्वचारोग, अति लठ्ठपणा, ऍसिडिटी, निद्रानाश असे आजार होतात यासाठी सर्व गोष्टी वेळेवर पूर्ण कराव्या म्हणजे आजार दूरच राहतील.
मानसिक ताण तणाव सामान्य लक्षणे:
पोट बिघडणे, कामात उत्साह न वाटणे, कामात चूक होणे, चीड चीड होणे, स्मरणशक्ती कमी होणे, त्वचारोग असल्यास तो वाढणे, छातीत धडधडणे, स्वस्थ झोप न लागणे इत्यादी मानसिक तणावाची लक्षणे आहेत.
मानसिक ताण तणाव उपाय:
रोज सकाळी व्यायाम व योग करावा.
8-15 दिवसातून एक तरी सुट्टी घ्यावी.
आपल्याला जमेल तेवढेच काम करावे.
काम करण्याची पद्धत बदलावी. काम आनंद घेऊन करावे.
कुटुंब व लहान मुले यांच्याबरोबर थोडा वेळ घालवावा.
रोज सकाळी 20-25 मिनिट चालावे.
देवावर श्रद्धा ठेवल्यानेही मानसिक ताण कमी होतो.
सकाळी लिंबू सरबत, गुलकंद वैगैरे व रात्री झोपण्याच्या आधी अविपटीकार चूर्ण सेवन करावे.
सकाळी ध्यान करावे.
नेहमी डोकं शांत ठेवून काम करावे.
दररोज सॅन ब्राम्ही आहारामध्ये ठेवावे.
आठवड्यातून एकदा योगसारक सारखे चूर्ण घेऊन पोउत साफ करावे.
वर्षातून एकदा तरी मित्र किव्वा कुटुंबातील सदस्यांसोबत सहलीला जावे.
याशिवाय तुम्ही औषध घेऊन सुद्धा ताण कमी करू शकतात. मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी खालील दिलेले औषध घ्यावे-
Manasik tanaw