झोपेच्या गोळ्या जास्त का घेऊ नये ? नक्की वाचा

झोपेच्या गोळ्या

आपले शरीर दिवसभर वेगवेगळे कामे करत असते. त्यामुळे आपले शरीर थकते. त्याचबरोबर आपल्याला थकवा आल्यास सारखे जाणवते हा थकवा दूर करण्यासाठी शरीराला शांत झोप घेणे आवश्यक असते. शरीराला जर शांत झोप मिळाली तर पुढच्या येणाऱ्या कामासाठी शरीरात नवी ऊर्जा निर्माण होते. पण जर माणसाची पुरेशी झोप झाली नसेल, तर त्याच्या डोळ्याखाली डाग सर्कल्स निर्माण होऊ लागतात. अनेक लोकांना शांत झोप लागत नाही आणि शांत झोप लागली म्हणून ते वेगवेगळ्या झोपेच्या गोळ्यांचे सेवन करत असतात. पण ह्याच गोळा त्यांच्या शरीराला हानिकारक ठरू शकतात. काही लोक शांत झोप लवकरात लवकर यावी त्यासाठी अधिक प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतात.

अशा अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे साईड इफेक्ट होऊ शकतात. झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे आपल्याला शांत झोप लागू शकते, पण यामुळे आपल्याला बरेच तोटे सुद्धा होऊ शकतात.

शांत झोप लागावी म्हणून झोपेच्या गोळ्या घेणे चांगला उपाय नाही. या गोळ्यांचे अधिक सेवन केल्यामुळे आपल्या रक्तदाब कमी होऊ लागतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुद्धा शांत झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेणे हे चुकीचे आहे. चांगली झोप लागावी म्हणून वेगवेगळे उपाय केले जाऊ शकतात. पण त्यासाठी झोपेच्या गोळ्या घेणे हा उपाय बरोबर नाही चांगली झोप न झाल्यामुळे आपल्याला डोकेदुखी थकवा असा वेगळा त्रास व्हायला सुरुवात होते.

झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे होणारे नुकसान :-

अनेक लोकांना झोप न लागण्याचे मुख्य कारण म्हणजे कामाचा तणाव. कामाच्या तणावामुळे त्यांना शांत झोप लागत नाही. त्यामुळे ते डॉक्टरांचा सल्ला न घेता अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करतात. त्यामुळे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत, अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणते नुकसान होऊ शकतात ? आणि शांत झोप लागण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो? चला तर मग बघूया !

हृदयविकार होण्याची शक्यता :-

जर तुम्ही अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुम्हाला हृदयविकार यासारखे आजार होण्याची दाट शक्यता आहे. डॉक्टरांच्या मते अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो.

कर्करोग होऊ शकतो :-

झोपेच्या गोळ्यांचा अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे अथवा त्याचा ओव्हरडोस झाल्यामुळे आपल्या शरीराला कर्करोग यासारख्या आजाराचा धोका होऊ शकतो.

अतिप्रमाणात थकवा जाणवतो :-

अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो व कोणतेही काम करण्यासाठी आपल्या शरीरात ऊर्जा राहत नाही. त्यामुळे आपल्याला थकवा त्याच बरोबर ताण-तणाव सुद्धा जाणवतो. त्यामुळे अति प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करणे टाळावे.

रात्री वाईट स्वप्न पडते :-

आपण जर दररोज झोपेच्या गोळ्या चे सेवन करत असाल तर आपल्याला रात्री झोपताना तुम्हाला वेगवेगळे वाईट स्वप्न पडू शकते. त्यामुळे रात्री झोपताना भीती सुद्धा वाटू शकते. त्यामुळे झोपेच्या गोळ्यांचे अधिक प्रमाणात सेवन करू नये.

एलर्जी होणे :-

अधिक प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ऍलर्जी होऊ शकते. ज्यामध्ये त्वचेची एलर्जी होण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्याच बरोबर त्वचा काळी पडू लागते. त्यामुळे झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात घेणे टाळावे.

झोपेसाठी कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकतो :-

आपण आता शांत व लवकर येण्यासाठी काय करायला हवे हे जाणून घेऊयात –

प्राणायाम करून बघा :-

जर तुम्हाला रात्री झोपायच्या गोळ्या न घेता शांत झोप हवी असेल, तर प्राणायाम करून बघा प्राणायाम केल्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते व त्याचबरोबर आपला मेंदू शांत होतो. त्यामुळे प्राणायाम केल्यामुळे आपल्याला गाढ झोप लागू शकते.

जायफळाचा वापर करा :-

जर तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल तर थोड्याशा कोमट दुधामध्ये थोडीशी जायफळाची पावडर मिक्स करून ते कोमट दुध पिऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला झोप लागण्यासाठी मदत होऊ शकते.

मसाज करून बघा :-

रात्री शांत झोप लागण्यासाठी थोडेसे तेल घेऊन आपल्या हाताच्या तळव्यांना आणि पायाच्या तळव्यांना मसाज करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरावर थकवा गेल्यासारखा जाणवेल शांत झोप लागू शकते.

मोबाईलपासून दूर राहा :-

रोज रात्री झोपण्या अगोदर आपण मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे किंवा मोबाईल हाताळू नये व डोळे बंद करून आपल्या श्वासांकडे लक्ष केंद्रित करावे. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी मदत होऊ शकते.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले जास्त झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे कोणकोणते नुकसान होऊ शकतात ? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *