वेलदोडे (वेलची) खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

वेलदोडे (वेलची) खाण्याचे फायदे

वेलदोडे म्हणजे वेलची. वेलची ही आपल्या सगळ्यांच्याच माहिती आहे. वेलची चा उपयोग अनेक पदार्थांमध्ये त्यांची चव वाढविण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर बरेच वेळा वेलची चा उपयोग माउथ फ्रेशनर साठी सुद्धा केला जातो. वेलची चे दोन प्रकार असतात या दोन्ही वेळच्या प्रकारांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वेलची चा पहिला प्रकार मोठी वेलची आणि दुसरा प्रकार लहान वेलची.

मोठी वेलची ही काळ्या रंगाची असते. तसेच लहान वेलची ही हिरव्या रंगाची असते. मोठी वेलची ही मसाल्याचे पदार्थ बनवण्यास जसे की गरम मसाला बनवण्यासाठी मोठ्या वेलचीचा वापर केला जातो. तर त्याच बरोबर लहान वेलची ही माउथ फ्रेशनर बनवण्यासाठी वापरली जाते. वेलची मध्ये विटामिन सी, लोह आणि असे वेगवेगळे प्रकारचे पोषकतत्वे असतात. आपल्या आयुर्वेदानुसार हे वेलची वेगवेगळ्या कामांसाठी उपयुक्त आहे असे दर्शविले आहे.

अनेक वेळा गोड पदार्थांना चांगली चव येण्यासाठी वेलदोडे चा वापर केला जातो. त्याच बरोबर काही पदार्थांना चांगला सुगंध येण्यासाठी सुद्धा वेलची चा उपयोग केला जातो. वेलची ही आपल्या रक्तातील लाल पेशी वाढवण्यासाठी मदत करते. बऱ्याच जणांना माहिती नसेल पण वेलची ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. अनेक समस्यांवर उपाय म्हणून वेलचीचा उपयोग केला जातो.

वेलची खाल्ल्यामुळे पोट फुगणे ,जळजळ होणे अशा समस्या उद्भवत नाही. वेलचीला स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणून सुद्धा घोषित केले आहे. जेवणात चिमुटभर वेलची ही एक महत्त्वाची भूमिका बजावते. रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उपाशी पोटी वेलची खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.

जर तुम्हाला थकवा आला असेल तर वेलचीचा चहा पिल्याने तुमचा थकवा नाहीसा होईल आणि शरीरात नवी ऊर्जा निर्माण होईल. वेलची ही अत्यंत गुणकारी आहे. छोटीशी वेलची मोठमोठे आपल्या शरीरास फायदे देते.

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात? चला तर मग बघूया!

वेलदोडे खाण्याचे शरीराला होणारे  फायदे :-

वरील भागात आपण वेलची म्हणजे काय आणि वेलची चे गुणधर्म कोणते? हे आपण बघितले आता आपण बघणार आहोत वेलची खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात कोण कोणते फायदे होऊ शकतात?

●वेलदोडे मुळे पचनक्रिया सुधारते :-

अनेक वेळा बाहेर फास्ट फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे किंवा मग सतत अवेळी झालेल्या जेवणामुळे आपल्याला अपचनाचा त्रास निर्माण होतो. पोट फुगणे, जळजळ होणे अशा समस्या यामुळे निर्माण होतात. या अपचनाच्या त्रासापासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल, तर वेलची चे नियमितपणे सेवन करा. एक ते दोन वेलची आणि लवंग यांची पावडर करून रोज रात्री झोपण्यापूर्वी ह्या पावडर चे सेवन करा. यामुळे सुधारण्यास मदत करेल आणि अपचनाची समस्या उद्भवणार नाही.

● भूक लागण्यास मदत मिळते :-

काही वेळेस कामाच्या दबावामुळे किंवा मग बऱ्याच लोकांना भूक न लागणे अशा समस्या असतात. भूक न लागण्याचे मुख्य कारण म्हणजे अपचन किंवा पोट फुगणे असते. वेलची चे नियमित प्रमाणे सेवन केल्यामुळे अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवत नाही आणि जास्त भूक लागण्यासाठी सुद्धा मदत मिळते.

● थकवा दूर करते :-

अनेकदा दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या कामांसाठी धावपळ करत असतो. ही धावपळ करताना आपल्या शरीराला अनेक वेळा थकवा जाणवतो आणि कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा राहत नाही. हा थकवा घालवण्यासाठी चहा मध्ये एक-दोन वेलचीचे तुकडे बारीक करून टाका. यामुळे तुमच्या शरीरात नवी ऊर्जा निर्माण होईल व सर्व थकवा दूर होईल.

●श्वास घेण्यास मदत मिळते :-

हिवाळ्यात अनेक वेळा थंडी मुळे आपल्याला सर्दी होते. ज्यामुळे आपले नाक बंद होते आणि आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही. जर तुम्हाला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर वेलची चे चार ते पाच तुकडे गरम पाण्यात उकडून गरम पाणी प्यावे. असे केल्यामुळे तुम्हाला मोकळा श्वास घेण्यास मदत मिळेल आणि सर्दी पासून आराम मिळेल.

● रक्तदाब नियंत्रित करते :-

बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात आपल्या शरीरातील रक्तदाब अनियंत्रित होतो. हा रक्तदाब नियंत्रित न झाल्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो आणि आज बरोबर श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. हा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वेलची उपयुक्त ठरते. रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडे पावडर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित होते. त्याचबरोबर आपल्या रक्तातील लाल पेशी सुद्धा वाढतात.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले वेलदोडे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणते फायदे होतात ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *