उन्हाळी लागणे कारणे आणि घरगुती उपाय जाणून घ्या

उन्हाळी लागणे कारणे आणि घरगुती उपाय

अनेक वेळा तापमानात होणारे बदल किंवा बदलणारे ऋतू यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या समस्या उद्भवतात किंवा निर्माण होतात. यामधील उन्हाळा ऋतु मध्ये आपल्याला अतिप्रमाणात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उन्हाळा या ऋतूमध्ये तापमान अधिक वाढते. त्यामुळे असे तापमान आपल्या शरीराला सहन होत नाही आणि वेगवेगळे समस्या किंवा आजार होण्यास सुरुवात होते. त्यासाठी उन्हाळी लागणे कारणे आणि घरगुती उपाय जाणून घेऊया.

या उन्हाळ्यात अनेक वेळा सतत होणारी समस्या म्हणजे उन्हाळी लागणे. अनेक वेळा अति प्रमाणात उन्हात बाहेर फिरल्यामुळे किंवा तापमानात झालेला बदल सहन न झाल्यामुळे उन्हाळी लागणे अशा समस्या आपल्याला निर्माण होत असतात.

उन्हाळी लागणे म्हणजेच लघवी करताना जळजळ होणे. त्याच बरोबर अस्वस्थ वाटणे अशा समस्या होतात. उन्हाळ्यात अति प्रमाणात आपल्या शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे आपल्या शरीरात आवश्‍यक असणारे क्षारांचे प्रमाण कमी होते. यामुळे उन्हाळी लागणे अशा समस्या आपल्याला वारंवार होत असतात.

आपल्या प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते. काही जनांना हेच तापमानात होणारे बदल सहन होतात तर बऱ्याच लोकांना तापमानात होणाऱ्या कोणताही बदल सहन होत नाही. उन्हाळी लागल्यामुळे आपल्याला लघवी करताना त्रास होणे सुरुवात होते आणि आपल्याला अस्वस्थ वाटते.

उन्हाळी लागण्याची कारणे :-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नाही लागण्याची कारणे कोणकोणते आहेत ? त्याचबरोबर उन्हाळी लागू नये, यासाठी घरगुती व प्रभावशाली उपाय कोणकोणते आहे ? चला तर मग बघूया!

१. तापमानात होणारे वेगवेगळे बदल :-

अनेक वेळा तापमानात होणारे बदल हे उन्हाळी लागणे या समस्या साठी कारणीभूत ठरतात. अनेक वेळा तापमानात होणारे बदल हे आपल्या शरीराला सहन होत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण अति प्रमाणात वाढते. त्याचबरोबर शरीराचे नियंत्रण बिघडते. त्यामुळे आपल्याला उन्हाळी लागणे अशा समस्या उद्भवत असतात.

२. क्षार कमी होणे :-

अनेक वेळा उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची अतिप्रमाणात कमतरता भासते. पाण्यामध्ये उपलब्ध असलेले क्षार आपले शरीर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असते. पण हेच आपल्या शरीरातील क्षार कमी झाल्यामुळे आपल्याला उन्हाळी लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे आपल्याला लघवी करताना जळजळ होणे किंवा त्रास होणे अशा समस्या उद्भवतात.

३. शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढणे :-

उन्हाळ्यात अति प्रमाणात तापमान बदल होत असतात. त्यामुळे तापमान अधिक प्रमाणात वाढते या वाढलेल्या तापमानामुळे आपल्या शरीरातील असणारी उष्णता सुद्धा वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण अति प्रमाणात वाढते आणि आपल्याला उन्हाळी लागणे अशा समस्या निर्माण होतात

उन्हाळी लागू नये यासाठी घरगुती उपाय :-

वरील भागात आपण बघितले उन्हाळी लागण्याची कारणे कोणकोणते आहेत? आता आपण बघणार आहोत पुन्हा लागू नये यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो ?

● लिंबू सरबत घ्यावे :-

लिंबू मध्ये नायट्रिक ऍसिडचे प्रमाण अति प्रमाणात असते.आपल्या शरीरातील कमी झालेले क्षार हे वाढण्यासाठी लिंबू सरबत आपल्याला मदत करू शकते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झाले आहे. या क्षारांचे प्रमाण पुन्हा वाढवण्यासाठी लिंबू सरबत आपल्याला मदत करते. हे लिंबू पाणी दिवसातून दोन वेळा घ्यावे. असे पाच ते दहा दिवस केल्यामुळे तुम्हाला उन्हाळी लागणे या समस्येपासून आराम मिळू शकतो.

● अधिक प्रमाणात पाणी प्यावे :-

उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात अनेक बदल होत असतात. या बदलामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा आपल्याला अति प्रमाणात भासते. शरीरात असणारी पाण्याची कमतरता घालवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही अति प्रमाणात पाणी प्यावे. ज्यामुळे आपल्या शरीराला डीहायड्रेशन अशा समस्या पासून धोका निर्माण होणार नाही.

● रात्री हळदीचे दूध प्यावे :-

आपल्या शरीरात होणाऱ्या तापमानातील वेगवेगळे बदल यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. ही उष्णता भरून काढण्यासाठी रोज रात्री हळदीचे दूध प्यावे. असे दहा ते पंधरा दिवस केल्यामुळे तुम्हाला उन्हाळी लागणे अशा समस्या पासून आराम मिळण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. हळदी मध्ये असेल आणि सर्व गुणधर्म या उन्हाळी लागणे अशा समस्या पासून आराम मिळू शकते.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले उन्हाळी लागण्याची कारणे कोणती? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *