अंडरआर्म्स मधून दुर्गंधी येते का ? वापरा हे सोपे घरगुती उपाय

उन्हाळी दिवसांमध्ये आपल्याला खूप घाम येतो आणि हा घाम जर आपल्या खांद्याच्या बगल मध्ये जर आला, तर त्यामुळे आपल्या बगल चा वास येऊ लागतो. असे खूप सारे लोक आहेत की ज्यांना ही समस्या खूप त्रास देते. जर आपल्या अंडरआर्म्स मधून जर वास येत असेल तर, आपल्या सोबत च्या व्यक्तीला सुद्धा आपल्या सोबत राहायला नाही आवडत. अशावेळेस तुम्हालाही या गोष्टीचे वाईट वाटू लागते.

बऱ्याच वेळा आपण लग्न ठिकाणी किंवा एखाद्या पार्टीला जातो तेव्हा बगल चा वास लपवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे स्प्रे आणि डिओड्रंट वापरतो पण त्यामुळे थोडावेळ हा वास येणे थांबते पण जसजसा वेळ जातो, तसा तसा तुमच्या अंडर आम्स मधून वास यायला सुरुवात होऊन जाते. पण यापेक्षाही सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रात्री झोपतो आणि झोपताना आपल्या शेजारच्या व्यक्तीला आपल्यामुळे जर आपल्या हाताच्या बगल च्या वासामुळे त्रास होत असेल, तर तो आपल्या सोबत झोपायलाही कंटाळा करतो.

त्याकरिता आपण आज जाणून घेऊया की आपल्या अंडरआर्म्स मधून येणारा वास कसा कमी करता येईल, आणि हा वास येण्याचे कारण काय आहे ? हे जाणून घेऊ या.

अंडरआर्म्स मधून वास येण्याची कारणे :

तसे बघायला गेले तर आपल्या काखेतून वास येणे यामागे भरपूर कारणे असू शकतात, पण काही ठळक कारणे आपण जाणून घेऊया –

  • सारखा घाम येत राहणे.
  • तान तनाव घेणे.
  • शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन ची मात्रा वाढणे.
  • बगल मध्ये बॅक्टेरिअल इन्फेक्शन होणे.
  • शरीरामध्ये अमायनो ऍसिड अधिक वाढणे.

इत्यादी प्रकारचे कारण अंडरआर्म्स मधून येणाऱ्या वास चे होऊ शकत. पण जास्त करून जास्त घाम येणे आणि बगल मध्ये बॅक्टेरिया इन्फेक्शन होणे हेच प्रमुख कारण असते. त्याकरिता आपण जाणून घेऊया काही सोपे घरगुती उपाय जे तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळवून देतील.

काखेतील वास घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय :

आता आपण काही घरगुती उपाय जाणून घेऊया जे आपण आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो.

बेकिंग सोडा वापरून :

लागणाऱ्या गोष्टी :

  1. बेकिंग सोडा
  2. लिंबूचा रस

वापरायची पद्धत :

  • यासाठी तुम्हाला एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात एक चमचा लिंबाचा रस एकत्र करायचा आहे.
  • हे मिश्रण एकत्र केल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या आधी वापरायचे आहे.
  • यासाठी आपल्याला हे मिश्रण आपल्या अंडर आम्स मध्ये आपल्या हाताने लावायचे आहे.
  • लावल्यानंतर ३ ते ५ मिनिट राहू देणे व अंघोळ करून घेणे.

बेकिंग सोडा एंटीबॅक्टरियल असल्यामुळे असे 2 ते ३ दिवसा आड केल्याने बगल मधून वास येण्याची समस्या होणार नाही.

लिंबाचा रस वापरून :

लागणाऱ्या गोष्टी :

  1. अर्धा लिंबू
  2. कापूस

वापरायची पद्धत :

  • यासाठी तुम्हाला अर्धा कापला नींबू घ्यायचा आहे आणि त्याला तुमच्या काखेमध्ये घासायचा आहे.
  • जर तुम्हाला लिंबू घासायचा नसेल तर तुम्ही त्या अर्ध्या लिंबाचा रस घेऊन थोडा कापूस घेऊन त्याला लिंबाचा रस मध्ये भिजवून आपल्या काखेमध्ये लावायचा आहे.
  • आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही करू शकतात.

लिंबाच्या रसामध्ये बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला तुमच्या अंडरआर्म्स मधून येणाऱ्या वासा पासून सुटकारा मिळेल.

कोरफड वापरून :

तुम्हाला कोरफडचे बरेच गुण माहिती असणार पण कोरफड चा वापर तुम्ही तुमच्या काखेतील वास कमी करण्यासाठीसुद्धा तुम्ही वापर करू शकतात.

लागणारी सामग्री :

  1. कोरफड चा गर

वापरायची पद्धत :

  • जीवन तुम्ही रात्री झोपायला जातात त्याच्या पंधरा मिनिटे आधी तुम्हाला कोरफडचा गर घेऊन तुमच्या काखेमध्ये लावायचा आहे.
  • हा गर लावण्याआधी तुम्हाला तुमचे बगल ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे.
  • तुम्ही हा घर काखेमध्ये लावल्यानंतर निवांत झोपू शकतात.
  • सकाळी आंघोळ करताना तुम्ही त्याला साफ करून घेणे.

असे नियमित दोन ते तीन दिवस केल्याने तुम्हाला अंडर आम्स मधून येणारी दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

बटाटा चा वापर करून :

लागणाऱ्या गोष्टी :

  1. बटाट्याचे स्लाईस

वापरायची पद्धत :

  • बटाट्याचे बारीक स्लाईसेस करून किंवा बारीक तुकडे करून तुम्ही ते तुमच्या अंडर आम्स मध्ये घासू शकतात.
  • जर तुम्हाला घासायची इच्छा नसेल तर तुम्ही ते स्लाईस तुमच्या अंडर आम्स मध्ये ठेवा.
  • थोड्यावेळाने आंघोळ करून घ्या.

बगलची दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही बटाटा चा वापर करू शकतात. बटाट्यामध्ये एंटीफंगल गुण असल्यामुळे तुम्हाला पाहायला मिळेल.

तुळशी आणि कडुनिंबाचा पाला वापरून :

लागणाऱ्या गोष्टी :

  1. दहा-पंधरा तुळशीचे पान
  2. दहा-पंधरा कडूलिंबा चे पान

वापरायची पद्धत :

  1. यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा तुळशीचे पाने घेऊन त्यात दहा ते पंधरा कडूलिंबा चे पान एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे.
  2. बारीक केल्या नंतर हे मिश्रण तूम्ही गाळून घ्यायचे आहे.
  3. काढून घेतल्या नंतर हे मिश्रण तुमच्या हाताने तुमच्या बगल मध्ये लावायचे आहे.

असे आठवड्यातून तीन वेळा केल्याने कडुलिंबातील आणि तुळशी मधील एंटीबॅक्टरियल गुणधर्म वास कमी करण्यासाठी मदत करतील. त्यासोबत तुम्ही आपल्या डॉक्टर चे मार्गदर्शन घेऊ शकतात. जर तुम्हाला कुठल्याही उपाय मुळे एलर्जी होत असेल तर तो उपाय वापरणे त्वरित थांबवा.

Leave a comment