थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे कोणते ? नक्की जाणून घ्या


मित्रांनो आज आपण बघणार आहोत थंड पाण्याने अंघोळ केल्याचे फायदे कोणकोणते आहेत ते. आयुर्वेदानुसार माणसाने नेहमी थंड पाण्याने अंघोळ करावे असे दर्शविले आहे. तरीसुद्धा काही लोकांना बाराही महिने गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. पण हे आपल्या शरीराला हानिकारक आहे हे त्यांना माहिती नाही.

काही लोक गरम पाण्याने अंघोळ करणे टाळतात कारण त्यांना थंड पाण्याने अंघोळ केलेले कोणकोणते फायदे होतात, हे माहीत असते. जर आपण गरम पाण्याने आंघोळ केली, तर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात जसे की केस गळणे, टक्कल पडणे, केसांचा कोंडा निर्माण होऊ शकतो. अशा अनेक समस्या गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे होऊ शकतात.

अनेक लोकांना प्रश्न पडलेला असतो की अंघोळ कोणत्या पाण्याने करावी गरम पाण्याने की थंड पाण्याने ? अनेक लोक आंघोळीसाठी एवढे गरम पाणी वापरतात जर तुम्ही त्या पाण्यात तुम्ही बोट टाकली तर तुमची बोट भाजतील. पण एवढे गरम पाणी तुमच्या शरीरास हानीकारक ठरते. जर तुम्ही अति गरम पाण्याने आंघोळ केली तर तुमचा हार्ट रेट कमी होतो मोकळा श्वास घेता येत नाही.

दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनात अनेक काम करण्यासाठी आपण सतत झटत राहतो त्यामुळे आपले शरीर घामाचे होऊन जाते जर तुम्हाला शरीरातील घामपासून सुटका मिळवायचे असेल तर थंड पाण्याने अंघोळ करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे खूप आहे, जसे की आपण रिलॅक्स किंवा निवांत होतो. तसेच थंड पाणी जर तुम्ही आंघोळ केली तर तुमचे सौंदर्य देखील उजळते तसेच आपली स्किन किंवा त्वचा चांगली व टवटवीत राहते. जर आपण थंड पाण्याने आंघोळ केली तर आपले मसल्स रिलॅक्स व्हायला सुरुवात होतात व आपल्या शरीराला थोडासा आराम मिळतो.

चला तर मग आपण आता बघूया, थंड पाण्याने अंघोळ केल्याचे वेगवेगळे उपाय किंवा फायदे…

थंड पाण्याने आंघोळ केल्याचे फायदे :-

आपण बरेचदा लोकांकडून किंवा वेगवेगळी पुस्तके वाचून आपले शरीर निरोगी कसे ठेवले जाईल, याबद्दल माहिती काढत असतो. पण जर तुम्ही दिवसातून फक्त पाच ते दहा मिनिटं थंड पाण्याने आंघोळ केली शरीर निरोगी राहील व तसेच स्वच्छ ही राहील. चला जाणून घेऊया याचे काही फायदे :

थकवा जाण्यास मदत होईल :

अनेकदा दिवसात आपल्याला वेगवेगळी कामे करावी लागतात व ती कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत करत असतो. ते काम पूर्ण करण्यासाठी आपण एवढे गुंतून जातो की आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. नंतर आपल्याला खूप थकवा जाणवतो व स्ट्रेस आल्या सारखा वाटतो. जर तुम्ही हा थकवा घालवण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ केली, तर तुमचा सगळा स्ट्रेस व थकवा दूर होऊन जाईल आणि तुम्ही फ्रेश व्हावं व पुढील येणाऱ्या कामांसाठी तुम्हाला ऊर्जा भेटेल आणि तुम्ही उत्स्फूर्त व्हावं.

रोग प्रतिकार शक्ती वाढते :

तुम्ही हे तर ऐकले असेल थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमचे शरीर निरोगी व स्वच्छ राहते, तसेच आपल्या शरीरातील रक्त पुरवठा ही वाढतो. तसेच आपल्या शरीरा मधील पांढऱ्या पेशी मजबूत होतात.

ताजे व टवटवीत वाटते :

जर आपल्याला कुठलेही एखादे काम करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला शांतता असेल अशा ठिकाणी काम करण्यास आपले मन लागते. पण कधीकधी आपल्याला कामे गोंधळ असलेल्या ठिकाणी करावी लागतात त्यामुळे आपले त्या कामात मन लागत नाही व आपल्याला ते काम एकाग्रतेने करता येत नाही. पण जर तुम्ही रोज सकाळी पाच ते दहा मिनिटं तुम्ही थंड पाण्याने अंघोळ केली, तर तुमची एकाग्रता तर वाढतेच सोबत तुमचा हार्ट रेट ही वाढतो.

तसेच आपला मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला ताजे व टवटवीत वाटते आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रेरणा भेटते. कोणतेही काम सहज करण्याचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास निर्माण होतो.

अंगदु:खी दूर होते :

अति प्रमाणात काम केल्यामुळे कधी कधी आपल्याला अंगदु:खी चा त्रास व्हायला सुरुवात होते व त्याच्या वेदना असह्य होतात. तुम्ही बघितल असेल धावपटू जेव्हा एखाद्या स्पर्धेत भाग घेतात व ती स्पर्धा संपल्यानंतर ते आईस बाथ घेतात.

त्यामुळे त्यांच्या शरीरात नवी ऊर्जा निर्माण होते व त्यांना अंगदु:खीचा त्रास होत नाही. आपल्यालाही जर अंगदु:खीचा त्रास होत असेल, तर आपण रोज थोडावेळ थंड पाण्याने आंघोळ केली तर आपल्याला हा त्रास उद्भवणार नाही. तसेच आपल्याला नवीन काम करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होईल.

वेगवेगळे आजार होत नाही :

जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ केली तर तुमची त्वचा निस्तेज व कोरडी होते. पण जर तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली तर तुमची त्याच्या प्रफुल्लित राहते. तसेच जर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ केली तर तुमचे शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होईल. शरीर थंड राहील व तसेच पिंपल्स व केस गळण्याचे समस्या उद्भवणार नाही.

मित्रांनो आज आपण बघितलं थंड पाण्याने आंघोळ केल्याचे फायदे कोणते व तसेच गरम पाण्याने अंघोळ केल्याचे नुकसान कोणते ? जर तुम्हाला या संदर्भात अजून माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *