भारत प्राचीन वर्षापासून जडीबुटी समृद्ध देश मानला गेला आहे आणि आपल्या देशांमध्ये खूप सारे असे घरगुती उपाय आहेत, जे आपण योग्य पद्धतीने वापरले तर आपल्याला छोट्या छोट्या रोगांपासून सुटकारा मिळू शकतो. निसर्गाने दिलेल्या झाडांच्या पानांपासून वेगवेगळ्या प्रकारचे तेल औषधी बनवले जातात आणि तेच औषधी आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा मिळतात. आज आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टी ट्री तेल टाकल्याने आपल्याला यामुळे किती फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत. तसे बघायला गेले तर टी ट्री ऑइल हे ऑस्ट्रेलिया मध्ये जास्त करून असलेल्या मेलेलुका अल्टिफोलिया नावाच्या झाडाच्या पाना पासून बनवले जाते.
या तेलामुळे आपल्याला खूप सारे फायदे मिळू शकतात आणि खूप कमी नुकसान याचा वापर केल्यामुळे आपल्याला होतात.
या तेलाने आपल्याला खूप सारे फायदे मिळतात पण त्वचेचा एखाद्या विशिष्ट भागावर लावण्यापेक्षा आपण ते तेल दोन ते तीन थेंब घेऊन आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नियमित वापरायला हवे जेणेकरून आपण त्वचेचे विकारापासून लांब राहू शकतो.
याचा वापर केल्याने आपल्याला खूप सारे फायदे मिळतात जसे की फंगल इन्फेक्शन, पिंपल्स, अंगावर किडे पडणे इत्यादी समस्यांपासून आपल्याला सुटकरा अगदी सहज रित्या मिळू शकतो.
चला तर जाणून घेऊया आंघोळीच्या पाण्यामध्ये टी ट्री ऑईल टाकून अंघोळ केल्याने काय फायदे मिळतात ?
टी ट्री तेल टाकून आंघोळ केल्याने काय फायदे होतात ?
तसे बघायला गेले तर याचे खूप सारे फायदे आपल्याला मिळतात, पण हे फायदे का मिळतात हे सुद्धा जाणून घ्यायला हवे.
शरीराचा वास घालवण्यासाठी उपयुक्त :
दिवसभर शारीरिक कष्ट केल्यामुळे आपल्याला खूप घाम येतो आणि या घाम सोबत आपल्या शरीरावर बॅक्टेरिया सुद्धा वाटतात आणि या बॅक्टेरिया मुळे आपल्या शरीराचा थोडा थोडा वास येऊ लागतो, मग आपण यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिओड्रंट वापरतो.
पण काही काळाने डिओड्रंट चा असर कमी होतो आणि परत आपल्या शरीराचा वास येऊ लागतो, त्यासाठी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टी ट्री ऑइल टाकून अंघोळ केली तर तुमच्या शरीराचा वास येणे बंद होते, कारण की याच्यामध्ये अंतीबॅक्टरियल गुणधर्म असल्यामुळे यामुळे फायदा होतो.
हातापायांची बोटांची नखांमध्ये इन्फेक्शन थांबवते :
बऱ्याचवेळा आपण हे बघितले असेल की आपल्या हाता पायांची नखे अचानक पिवळे होण्यास सुरुवात होते, पण हे जास्त करून फंगल इन्फेक्शन होत असल्यामुळे होते आणि अशात जर तुम्ही टी ट्री ऑइल अंघोळीच्या पाण्यात वापरले तर एंटीफंगल गुणधर्मामुळे हा त्रास कमी होतो.
शरीरावर पिंपल्स येत असतील तर ते दूर होतील :
आज कालच्या युवापिढीला चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही खूप मोठी समस्या झालेली आहे आणि अशा मध्ये ते मार्केट मध्ये मिळणारे वेगवेगळे प्रकारचे फेसवॉश वापरतात पण जर त्यामध्ये टी ट्री ऑइल असेल, तर ते तुमच्या पिंपल साठी फायदेशीर असते. पण जर तुम्हाला काहीही न वापरता जर चेहऱ्यावर येणारे पिंपल घालवायचे असतील, तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टी ट्री ऑइल वापरावे. या तेलामध्ये एंटीसेप्टिक आणि एंटीमायक्रोबियल गुणधर्म असल्यामुळे पिंपल्स कमी होतात.
अंगावर खाज येत असेल तर ते दूर होईल :
बऱ्याच वेळा आपल्या शरीरावर अध्येमध्ये कुठे ना कुठे खाज येत असते आणि ते फंगस वाढल्यामुळे होते, त्यासाठी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात हे तेल वापरून आंघोळ केली तर खाज येणारे फंगस दूर होतात व दिवसभर फ्रेश वाटते.
केस तुटणे कमी होईल :
खूप सारे पुरुष आणि महिला असे आहेत त्यांच्या डोक्यावर बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन झाल्यामुळे केस वाढत नाही आणि जे केस आहेत ते हळू हळू तुटायला लागतात तर अशात तुम्ही जर टी ट्री ऑइल वापरून अंघोळ केली, तर तुम्हाला तुमचे केसांचे तुटायचे प्रमाण कमी होताना दिसेल आणि नवीन केस वाढायला सुरुवात होताना दिसेल. कोंडा कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय सुद्धा वापरू शकतात.
प्राइवेट पार्ट जा जवळ फंगस होण्यापासून वाचवते :
आपल्या प्रायव्हेट पार्ट च्या जवळ आजूबाजूला कुठे फंगल इन्फेक्शन होत असेल, तर आपण वेळ प्रकारचे फंगल पावडर किंवा क्रीम वापरतो. जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टी ट्री ऑइल टाकून आंघोळ केली तर तुम्हाला आहे त्रास कमी होताना नक्कीच जाणवेल.
टी ट्री ऑइल अंघोळीच्या पाण्यात वापरण्याची पद्धत :
तुम्ही पहिल्यांदा हे तेल आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरायला जात असाल तर हे तेल तुम्ही किती प्रमाणामध्ये वापरायला हवे हे तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एक बादली अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब टी ट्री ऑइल टाकायचे आहे. आणि या पाण्याने तुम्ही आपल्या नियमित साबण वापरुन आंघोळ करायची आहे तुम्ही यासोबत शाम्पू सुद्धा वापरू शकतात यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान तुम्हाला होणार नाही. नियमित पद्धतीने हे तुम्हीच वापरून बघितले तर तुम्हाला नक्की फायदा होईल.
हे ऑइल कुठे मिळेल ?
तुम्ही हे तेल जर खरेदी करू इच्छित असाल तर हे तुम्ही कुठल्याही मेडिकल वर किंवा ऑनलाईन मागवू शकतात. याची किंमत थोडी जास्त असल्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे.
हे तेल वापरताना काय काळजी घ्यावी ?
जर तुम्ही हे तेल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करत असाल तर तुम्ही खालील प्रमाणे काळजी घ्यायला हवी –
- आंघोळ करताना जर तुम्ही हे तेल पाण्यामध्ये टाकले असेल तर हे पाणी डोळ्यात जाऊ देऊ नये, जर गेले तर तुम्ही साध्या पाण्याने डोळे परत स्वच्छ धुऊन घ्यावे.
- जर हे पाणी तोंडात गेले तर तुम्ही साध्या पाण्याने गुळण्या करून घेणे योग्य राहील. हे तेल पोटात जाऊ देऊ नये.
- जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची आग जाणवत असेल किंवा तुम्हाला यापासून याची असेल तर याचा वापर करणे बंद करा.
- एक बादली पाण्यामध्ये तीन थेंब पेक्षा जास्त तेल घेऊ नये.
- आपण जर दोन वेळेस अंघोळ करत असाल तर एक वेळच याचा वापर करावा.
जर तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर आपल्या मित्रांसाठी नक्की शेअर करा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.