जाणून घ्या उन्हाळ्यात ताडगोळे फळ का खायला हवे ? खूप फायदे मिळतील

तुम्ही बाहेर बर्‍याच वेळा ऐकले असणार ताडगोळे फळा बद्दल पण कधी तुम्ही याचे फायदे काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का ? ताडगोळे फळ हे फक्त वर्षातून एका ठरावीक ऋतूमध्ये येत असते आणि ते आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये मिळत असते याला आइस एप्पल सुद्धा बोलतात. या फळाची चव सर्वांना आवडणारी आहे कारण नारळा मधली क्रीम ची चव जशी लागते तसेच या फळाची चव लागते.

आपण फळे आपली तब्येत चांगली राहण्यासाठी खातो कारण फळ खाल्ल्यामुळे आपल्याला त्यापासून खूप सारे फायदे होतात. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळ येतात आणि ते फळ त्या ऋतूमध्ये खाल्ल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. फळांमधून आपल्याला खूप सारे पोषक तत्व मिळतात. फळ खाल्ल्यामुळे आपण एकदम तंदुरुस्त आणि फिट राहू शकतो. कधी आपण बघितले आहे का की कोणी व्यक्ती फळे खाऊन जाड होत आहे ? नाही ना ? निसर्गाने फळ असे बनवले आहे ज्याला योग्य प्रमाणात खाऊन आपल्याला नुकसान नाही होत.

ताडगोळे फळ ही या प्रकारचच आहे. जर उन्हाळी दिवसांमध्ये तुम्ही ताडगोळे जर खात असाल, तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खूप सारे फायदे तुम्हाला दिसून येतील. या फळांमध्ये विटामिन बी, आयरन, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम इत्यादी प्रकारचे गुण असल्यामुळे हे फळ तुम्हाला खूप फायदेशीर आहे.

जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याचा वापर तुमच्या आरोग्यासाठी केला तर खूप सारे फायदे तुम्हाला यामुळे मिळणार आहेत, जसे की –

ताडगोळे फळा मुळे काय फायदे मिळतात ?

तसे बघायला गेले तर यामध्ये उपलब्ध असलेले विटामिन, आयरन, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस आपल्याला खूप सारे फायदे देऊ करतो पण काही फायदे आपण जाणून घेऊया.

 शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते ताडगोळे फळ :

उन्हाळी दिवसांमध्ये आपल्या शरीराचे तापमान भरपूर वाढलेले असते, त्यामुळे आपल्याला पूर्ण अंगामध्ये गर्मी जाणवत असते. जर तुम्ही ताडगोळे फळाचे ज्यूस बनवून किंवा ते असेच सेवन केले, तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तापमान कमी करण्यासाठी मदत मिळेल. हे एक फळ थंड असल्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही व तुम्हाला तुमच्या शरीर नेहमी थंड जाणवेल. तुम्हाला जर डीहायड्रेशन पासून वाचायचे असेल तर तुम्ही दिवसाला एक ग्लास या फळाचे ज्युस काढून प्यायला हवे.

पोटाचे विकार दूर होतात :

या फळांमध्ये विटामिन बी १२ असल्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून सुटका मिळतो. याचा नियमित सेवन केल्याने तुम्हाला शरीरातील विषारी घटकांपासून सुटकारा मिळेल.

ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास फायदेशीर ताडगोळे फळ :

जर तुम्हाला ब्लडप्रेशरचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला तुमचा बीपी कंट्रोल करण्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे. हे फळ नियमित खाल्ल्याने तुम्हाला हार्ट चे विकार होत नाही.

डोळ्यांची नजर वाढवतो :

जर तुम्हाला दृष्टीदोष म्हणजे बघण्याची क्षमता कमी होत असेल, तर तुम्ही या फळाचे उन्हाळी दिवसांमध्ये नियमित सेवन करायला हवे, त्यामुळे तुम्हाला तुमची नजर तीक्ष्ण होताना जाणवू लागेल.

तुमचे लिव्हर तंदुरुस्त बनवेल ताडगोळे फळ :

यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे तुम्हाला असे जाणवेल की तुमचे लिव्हर तंदुरुस्त बनत आहे व तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लिव्हरचे प्रॉब्लेम लवकर होणार नाही.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

आज कालच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना पासून वाचण्यासाठी आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे असते.  कोरोना सारख्या विषाणू पासून पसरणाऱ्या आजारापासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही याचा योग्य वापर केला तर तुम्हाला वायरल किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी असते.

 त्वचेमध्ये निखार मिळवण्यासाठी :

जर तुमच्या त्वचेवर खाज, लाल डाग इत्यादी येत असतील, तर तुम्ही थोडीशी चंदन पावडर घेऊन त्यामध्ये ताड गोळ्याचा रस एकत्र करून तशा त्वचेवर लावल्याने तुम्हाला बरेच स्किन इन्फेक्शन पासून सुटकारा मिळेल. चेहऱ्यावर हा ताडगोळे आणि चंदनाचा लेप लावल्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी मदत मिळेल.

तर हे होते काही फायदे.

Leave a comment