शरीरातील हिमोग्लोबिन हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा व अविभाज्य असा घटक आहे. हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या शरीरात उपस्थित असणाऱ्या रक्तांच्या लाल पेशी यांनाच हिमोग्लोबिन असे म्हटले जाते. आपल्या शरीरातील रक्ताचे प्रभाव सुरळीतपणे होण्यासाठी रक्तात ऑक्सिजन असणे फार महत्त्वाचे असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करतो.
हिमोग्लोबिन म्हणजे रक्तात असणारे लोह आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी आपल्या शरीराला आयन म्हणजेच लोह याची गरज असते. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्तातील लोह सुद्धा कमी होऊ लागते. त्याचबरोबर हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रक्तातील ऑक्सिजन पुरवठा सुद्धा कमी होण्यास सुरुवात होते.
हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आपल्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन जर कमी झाले असेल तर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होते. त्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात.
हिमोग्लोबिन कमी होण्याचे वेगवेगळी कारणे सुद्धा असू शकतात. डेंग्यू ,अल्सर असे वेगवेगळे कारणे किंवा या आजारामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होऊ लागते. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आपल्या रक्तातील लाल पेशी नष्ट होण्यास सुरुवात होते आणि ह्या पेशी जर नष्ट झाला तर आपल्या शरीराला पुरेसा रक्तप्रवाह किंवा रक्त पुरवठा होण्यास अडथळे निर्माण होतात.
हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते व कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती प्रभावशाली पडत नाही. त्याचबरोबर अति प्रमाणात रक्तदान केल्याने सुद्धा शरीरातील हिमोग्लोबिन कमी होऊ लागते. त्यामुळे आपल्या शरीरात वेगवेगळे बदल होण्यास सुरुवात होऊ लागते.
शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होणारे शरीराला नुकसान :-
तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते नुकसान होत असतात ? आणि त्याचबरोबर हिमोग्लोबिन वाढवण्याचे घरगुती प्रभावशाली उपाय कोणकोणते आहेत ? चला तर मग बघूया !
अशक्तपणा येणे :-
शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्तातील लाल पेशी कमी होऊ लागतात. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो. ज्यामुळे आपल्याला चक्कर येणे असा वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात.
अनियमित हृदयाचे ठोके :-
हिमोग्लोबिन मुळे रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे होत नाही. त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित पणे पडण्यास सुरुवात होते. हृदयाची अनियमित ठोके पडल्यामुळे याचा परिणाम शरीरावर दिसून येतो.
धाप लागायला सुरुवात होते :-
हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्यास सुरवात होते. त्यामुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन प्रमाण कमी होऊ लागते. फुफ्फुसाला हवा असणारा गरजेचा ऑक्सिजन देण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते. त्यामुळे आपल्याला धाप लागणे अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात.
श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण होते :-
शरीरातील हिमोग्लोबिन शरीरात रक्ताचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीतपणे ठेवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते. पण शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते व त्यामुळे श्वास संदर्भात अनेक अडचणी येऊ लागतात. त्यामुळे पुरेसा श्वास गेल्यास अडचण निर्माण होते.
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी घरगुती उपाय :-
आता आपण जाणून घेऊ काय केल्याने आपल्याला कधीच हिमोग्लोबिन छी कमी पडणार नाही –
नियमित आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा :-
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे होणारा वेगवेगळ्या समस्या पासून जर तुम्हाला दूर राहायचे असेल तर आपल्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. लोहयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत मिळते. आहारात नियमितपणे लोहयुक्त पदार्थांचा सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील लाल पेशी वाढल्या सुद्धा मदत मिळू शकते. लोहयुक्त पदार्थ म्हणजे बीट, गाजर, सुकामेवा, पालेभाज्या अशा वेगवेगळ्या आहाराचा समावेश करा.
बीट खाऊन बघा :-
जर तुम्हाला तुमच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल तर बीटाचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करा. बीटा मध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे आपल्या रक्तामध्ये लाल पेशी वाढवण्यास मदतगार ठरू शकते. शिवाय बिटाचा समावेश आहारात केल्यामुळे हिमोग्लोबीन वाढते.
टोमॅटोचे सेवन करा :-
शरीरातील विटामिन सी आणि लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी टोमॅटो हा एक उत्तम पर्याय आहे. कारण टोमॅटोमध्ये विटामिन सी आणि लोह हे अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे आपल्या शरीरात विटामिन सी चे प्रमाण वाढते आणि त्याचबरोबर आपल्या रक्तातील लोहाचे प्रमाण वाढल्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत मिळते.
डाळिंब खा :-
जर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचे असेल तर डाळिंबाचे वापर किंवा सेवन करा. कारण डाळिंबामध्ये प्रोटीन ,फायबर त्याचबरोबर असा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदतगार ठरते. त्यामुळे डाळिंब खाणे हा सुद्धा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल तर आपण आज बघितले शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होणारे शरीराला नुकसान कोणते? त्याचबरोबर हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी त्याचे घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.