आज आम्ही आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने काय होऊ शकते व ही कमतरता कशी मिळवावी याबद्दल माहिती देणार आहोत. प्रत्येक जण पाणी पितो भले तो माणूस असो किंवा प्राणी असो. दिवसभरातून आपण जर योग्य वेळेत किंवा योग्य मात्र मध्ये पाणी नाही पिले, तर त्यामुळे आपल्याला शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते.
शरीरामध्ये पाण्याचे कमतरतेमुळे खूप लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. तुम्हालाही ऐकूनच नवल वाटले असेल कि या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा लोक मरतात का ? तर हो शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा मृत्यू येऊ शकतो.
शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी जर असले तर आपण आपले काम अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. पण जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवायला लागली तर आपले काम करायचे मनही नाही होत आणि आपल्याला वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.
जेव्हा आपल्या शरीरातून अधिक प्रमाणामध्ये घाम किंवा इतर मार्गाने पाणी शहराच्या बाहेर निघत असेल आणि आपण त्यापेक्षा कमी पाणी पीत असेल तर यालाच आपण शरीरात पाण्याची कमतरता होणे सुद्धा बोलू शकतो याला स्वतः भाषेत डीहायड्रेशन सुद्धा म्हणतात.
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला तर नाही ना शरीरात पाण्याची कमतरता ? हे कसे जाणावे ? तर यासाठी आपण काही लक्षण जाणून घेऊया जेणेकरून आपण समजू शकतो की आपल्या शरीरात सुद्धा पाण्याची कमतरता आहे.
शरीरात पाण्याची कमतरता चे लक्षण :
तसे बघायला गेले तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत आहे हे आपल्याला लगेच नाही समजत पण जर तुमच्या मध्ये जर खालील प्रकारची लक्षणे दिसून येत असतील, तर तुम्ही हे जाणू शकतात की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. –
- वारंवार ओठ कोरडे पडू लागतात.
- ओठांची त्वचा पाठवू लागते किंवा बरेच वेळा त्यातून रक्त सुद्धा येते.
- घशामध्ये नेहमी कोरड पडणे.
- परत परत पाणी पिल्यावर सुद्धा असे जाणवते की अजून पाणी प्यावे .
- छाती मध्ये जळजळ होणे.
- पोटामध्ये गर्मी जाणवणे.
- ब्रश केल्यावर सुद्धा तोंडाचा वास येणे.
- लघवी करताना पिवळ्या रंगाची लघवी होणे.
- टॉयलेट करताना खूप त्रास होणे.
- स्कीन खाजू लागते.
- डोळ्यांच्या खाली काळे खड्डे पडू लागतात.
- काहीही काम न करता थकवा जाणवतो.
- सारखी चिडचिड होते.
- डोकेदुखीची समस्या होते.
- हाता पायामध्ये दुखायला लागते.
तर हे होते काही लक्षण ज्यामुळे तुम्ही समजू शकतात, ते तुमच्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता आहे की नाही ?
दिवसभरातून आपण किती पाणी प्यायला हवं ?
बरेच लोक या बाबतीमध्ये विचार करतात की आपण दिवसभरातून किती पाणी प्यायला हवे, जेणेकरून आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. तर बघायला गेलं, तर हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे आहे. तुमचं जे वजन असेल त्या वजनाला 30 ने भागावे आणि जो आकडा येईल तेवढं तुम्हाला लिटर मध्ये पाणी द्यायचे आहे.
समजा तुमचे वजन 90 आहे, तर तुम्हाला 90 ला 30 ने भागाकार करायचा आहे. तर याचे उत्तर येईल 3 . म्हणजे तुम्हाला दिवसभरातून तीन लिटर पाणी प्यायचे आहे. जर तुमचे वजन 60 किलो असेल तर तुम्हाला दिवसभरातून दोन लिटर पाणी प्यायचे आहे.
आता या छोट्याशा उदाहरणावरून सुद्धा तुम्हाला समजून गेले असेल की तुम्हाला दिवसभरातून किती पाणी द्यायचे आहे. चला आपण जाणून घेऊया, जर तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवत असेल आणि वरील काही लक्षण तुमच्या शरीरात दिसत असतील तर तुम्ही काय करायला हवे ?
शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्याचे सोपे उपाय :
जर तुम्ही सोपे घरगुती उपाय वापरून शरीरातील पाण्याची कमतरता दूर करायची आहे, तर तुम्ही खालील उपाय करायला हवे –
- दिवसभरातून एक तरी नारळ पाणी प्यावे. फक्त याची काळजी घ्यायची आहे की ते पाणी थंड नसावे.
- तुम्ही मेडिकल मधून ओ.आर.एस पावडर घेऊन येऊ शकतात आणि ती ओ.आर.एस पावडर पाण्यामध्ये मिसळून प्यायला हवी.
- जर तुम्हाला पाण्याची तहान लागली असेल किंवा तुम्ही बाहेरून आले असाल, तर तुम्हाला एकदम पाणी नाही घ्यायची आहे.
- पाणी पिताना एक एक घोट असे करूनच प्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला ते पाणी शरीरामध्ये योग्य पद्धतीने जाण्यासाठी मदत होईल.
- पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडेसे मीठ टाकून ते द्यायला हवे.
- तुम्ही दिवसभरातून एक लिंबू कापून त्याचा लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी पिऊ शकतात.
- डीटॉक्स पाणी प्यायला हवे, त्यासाठी तुम्हाला एक काकडी, एक लिंबू आणि दोन ते तीन पुदिना च्या पत्त्याचे काड्या तीन लिटर पाण्याच्या भांड्यात ठेवून ते पाणी तुम्हाला दिवसभर थोडे थोडे प्यायचे आहे, यामुळे तुम्हाला फ्रेश पण वाटेल.
- तुम्हाला जर glucon-d आवडत असेल, तर तुम्ही glucon-d सुद्धा पिऊ शकतात.
तर हे होते काही सोपे उपाय, जे वापरून तुम्ही तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करू शकतात व ताजेतवाने राहू शकतात.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.