शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कसे वाढवावे ? जाणून घ्या


ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू हा आपल्या जीवनातील एक मूलभूत आणि अत्यंत गरजेचा असा भाग आहे. जर आपल्या जीवनात ऑक्सिजनच नसेल तर आपण जगु शकत नाही त्याचबरोबर ऑक्सिजन हे आपल्या शरीरातील एक अविभाज्य घटक आहे. ऑक्सिजनमुळे आपण आपल्या दिवसाची वेगवेगळी कामे करण्यासाठी जिवंत राहू शकतो. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण किती असायला हवे ? हे सुद्धा जाणून घ्यावे, जेणेकरून आपल्याला कधी कमी जाणवणार नाही.

आता सुरु असणारी सध्याची परिस्थिती म्हणजेच कोविड. या आजारामुळे अनेक लोकांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अनेक लोकांचे शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा साठा न मिळाल्यामुळे प्राणही जात आहे. त्याचबरोबर शरीरात पुरेशी ऑक्सिजनची मात्रा नसल्यामुळे काही लोकांना व्हेंटिलेटरची मदत घ्यावी लागत आहे आणि सगळ्यांनाच ऑक्सिजन आपल्या जीवनात का महत्वाचे आहे? याचे महत्त्वसुद्धा पटलेले आहे.

आपल्या जीवनात जर ऑक्सिजन नसेल, असा जर आपण विचार केला तरी आपल्याला गुदमरल्यासारखे वाटते. पण जर खरच आपल्या जीवनात अक्सिजन असेल तर आपण एक क्षणसुद्धा जगू शकणार नाही. ऑक्सीजन आपल्या शरीरात अत्यंत महत्त्वाचे काम करते अनेक लोक शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योगाच्या प्रकाराचा वापर करून बघतात. काही लोकांना पुरेसा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे दमा लागणे अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा सामोरे जावे लागते.

आपल्या रोजच्या जीवनात जर आपण बघितले, तर साधारण एक व्यक्ती एका दिवसात जवळजवळ पाचशे लिटर ऑक्सिजनचा घेत असतो. ऑक्सिजन आपल्याला वेगवेगळ्या झाडांपासून मिळत असतो. आपण किमान एक तरी झाड लावलेच पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात ऑक्सिजन मिळेल.

झाडाचे एक पान एका तासात जवळ जवळ पाच मिलिलिटर ऑक्सिजनचे उत्पादन करते. पिंपळाचे झाड आपल्याला 90 ते 95% टक्के ऑक्सीजन देत असते. त्याचबरोबर समुद्रातील काही झाडेसुद्धा आपल्या शरीरासाठी 70 ते 80 टक्के ऑक्सिजन निर्माण करत असतात. एका रिसर्चनुसार जमिनीवर राहणाऱ्या झाडांपेक्षा समुद्रात राहणारे झाडे जास्त प्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन करतात. पिंपळ , समुद्रातील झाडे, त्याचबरोबर बांबूचे झाडेसुद्धा ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास मदत करतात .

आपण लहानपणी अनेकदा वाचलेले असते की झाडे ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करतात . झाडे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेऊन हवेत ऑक्सिजन निर्माण करतात.

शरीरा मध्ये ऑक्सीजन लेवल किती असायला हवी ?

साधारणतः हा मानवी शरीरात रक्तामध्ये 94 – 95 ते 100 च्या दरम्यान सैचुरेशन लेवल सामान्य मानले गेले आहे. 95 पेक्षा कमी ऑक्सिजन लेवल जात असेल तर हा एक धोक्याचा इशारा आहे असे समजून घ्यावे. जर तुम्हाला असे जाणवत असेल की तुमचा ऑक्सिजन लेवल 93 च्या खाली जात आहे तर तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना संपर्क करा.

शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे होणाऱ्या समस्या :-

जर आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असेल तर आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात ? याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

दमाचा आजार होऊ शकतो :-

आपल्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन चा पुरवठा होत नाही. त्यामुळे आपल्याला दमा लागणे किंवा थाप लागणे असे आजार होऊ शकतात. जर तुम्हाला असे आजार होऊ नये असे वाटत असेल, तर आपल्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे.

रक्तस्राव कमी होतो :-

आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे आपल्या रक्तस्त्राव अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तस्त्राव झाल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे काम करता येत नाही. त्याचबरोबर आपल्या मेंदुला अति प्रमाणात त्रास होतो.

हृदयाचे विकार होऊ शकतात :-

शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त मंदावते व त्यामुळे आपल्या हार्टचे अथवा हृदयाचे ठोके कमी होतात. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते आणि ऑक्सिजन मात्र पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे आपल्याला हृदयाचे विकार होऊ शकतात.

आपल्याला जर अशा समस्या होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल ,तर आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला वाढवायला हवे ते वाढवण्यासाठी आपल्याला पोषक आहाराचे सेवन केले पाहिजे.

शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणते आहार घ्यावे ?

जर आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला वरील प्रमाणे असा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जर आपल्याला आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवायचे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या आहाराचे सेवन करावे लागते. त्यामुळे आज आपण बघणार आहोत कोणकोणत्या आहाराचे केल्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढू शकते? चला तर मग बघुया !

केळी खाणे :-

आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी रोज सकाळी जर तुम्ही एक केळ खाल्ले, तर त्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजन प्रमाण वाढवण्यास केळ हे मदत करेल. जास्त खाले तर कफ चा त्रास होऊ शकतो त्या मुले एक जरी खाल्ले तरी पुरेसे आहे.

द्राक्षाचे सेवन करा :-

द्राक्ष या फळांमध्ये अति प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. जर तुम्ही द्राक्षाचे सेवन केले, तर त्या एंटीऑक्सीडेंट मुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर तुमचे ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी द्राक्षाचे सेवन करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

लसूण ठरेल गुणकारी :-

जर तुम्हाला शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी वाटत असेल आणि हेच ऑक्सिजनचे प्रमाण जर तुम्हाला वाढवायचे असेल, तर तुम्ही लसणाचा वापर करू शकतात. जर आपण नियमित लसणाचे सेवन आपल्या आहारात केले, तर आपल्या शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी लसुन गुणकारी त्याचबरोबर लाभदायक ठरेल.

ऑक्सिजनचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी ?

  1. नियमित व्यायाम करायला हवा.
  2. दिवसातून एक वेळा वाफ घ्यायला हवी.
  3. फुफ्फुस चे ऑक्सिजन घ्यायचे प्रमाण वाढवायला हवे, त्या साठी तुम्ही फुफ्फुस चे व्यायाम करू शकता.
  4. दिवसभरातून भरपूर पाणी पिणे.
  5. आयरन युक्त पदार्थ जास्त खाणे.
  6. सकाळी कोमट पाणी पिणे, जेणेकरून कफ चा त्रास होणार नाही.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणकोणते उपाय करावे ? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात.

जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा . ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *