शरीरातील कॅल्शियम कसे वाढवावे ? जाणून घ्या


आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरातील वेगवेगळे घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळी कामं करतो, त्यामुळे कधीकधी आपले शरीर थकते आणि हा थकवा दूर करण्यासाठी आपल्या शरीरातील कॅल्शियम आपल्याला मदत करते.

आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग आणि अविभाज्य घटक म्हणजे कॅल्शिअम. कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडे मजबूत आणि त्याचबरोबर बळकट ठेवण्याचे काम करत असतो. शरीरातील कॅल्शियममुळे आपण आपल्या जीवनातील वेगवेगळी कामं सहजरीत्या करू शकतो. जर आपल्या शरीरात कॅल्शियम नसेल तर आपण कोणतेही काम नीट करू शकणार नाही. त्याचबरोबर दिवसभर थकवा जाणवेल. तसेच आपल्याला हाडे दु:खी, सांधेदुखी अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.

आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या गोळ्यांचा आधार घेतात, पण कुठल्याही गोळ्या जर अति प्रमाणात घेतल्या गेल्या तर ते त्यांच्या शरीरास हानिकारक ठरू शकते. तसेच काही लोकं हाडे दुखी थांबवण्यासाठी पेनकिलर अशा वेगवेगळ्या गोळ्यांचा त्यांच्या जीवनात समावेश करतात. पण या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आपल्याला फक्त थोड्यावेळासाठी बरे वाटते आणि काही कालाविधीनंतर किंवा काही वेळाने हा त्रास पुन्हा सुरू होतो. त्याचबरोबर कॅल्शियम नसल्यामुळे आपली हाडे कमकुवत होऊ लागतात.

शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे तर जावे लागतेच, पण त्याच बरोबर आपल्याला सहन न होणाऱ्या वेदनांचा त्रास होऊ लागतो. तसेच हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यामुळे हाडांमध्ये भेगा पडू शकतात किंवा हाड तुटण्याची समस्या उद्भवू शकते. याच बरोबर आणखी काही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

मित्रांनो हाच त्रास जर तुम्हाला तुमच्या भविष्यात नको हवा असेल, तर शरीरातील कॅल्शियम वाढवणे फार गरजेचे आहे. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना किंवा समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी आपण वेगवेगळी घरगुती उपाय करू शकतो.

शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण कमी असल्यामुळे होणाऱ्या समस्या :-

आपल्या शरीरात कॅल्शियम चे प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या आजारांना सामोरे किंवा तोंड द्यावे लागू शकते.

हृदय विकाराचा आजार होऊ शकतो :-

एका रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल किंवा कॅल्शियमचे प्रमाण कमी असेल, तर त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा आजार होऊ शकतो. जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ नये असे जर वाटत असेल तर शरीरातील कॅल्शियम वाढवण्यास सुरुवात करा.

कर्करोग होऊ शकतो :-

जर आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम नसेल, तर आपल्याला ‘कोलन’ नावाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागू शकते. हा कर्करोग आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे शरीरात कॅल्शियम असणे फार महत्त्वाचे आहे.

थकवा निर्माण होतो :-

कोणालाही आपला दिवस निरुत्साही जाऊ नये असे वाटते. त्याचबरोबर कधीकधी आपल्या शरीराला थकवाही जाणवतो, याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कमी असलेले कॅल्शिअम. आपल्या शरीरात जर कॅल्शिअमचे प्रमाण कमी असेल तर आपल्याला थकवा जाणवू शकतो व त्यामुळे आपल्याला कोणतेही काम करण्यास ऊर्जा मिळत नाही आणि काम करण्यास मन लागत नाही.

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि आहार :-

वरीलप्रमाणे दिलेल्या समस्यांना किंवा त्याच्या असाह्य वेदना जर तुम्हाला सामोरे जावे असे जर वाटत नसेल, तर कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. आता बर्‍याच जणांना हा प्रश्न पडला असेल कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजे नेमके कोणते ? चला तर मग बघुया !

शरीरातील कॅल्शियम वाढवा दूध या पेयाचे सेवन करून :-

आपण बरेचदा ऐकलेले असते की दूध पिल्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढण्यासाठी आपल्याला मदत मिळते. आयुर्वेदानुसार दूध हे शरीराचे कॅल्शियम वाढवण्यासाठी एक गुणकारी आणि अत्यंत उत्तम असा पर्याय आहे. जर आपण रोज दुध थोडेसे प्यायले तर आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढण्यास ते गुणकारी ठरेल.

शरीरातील कॅल्शियमसाठी दही खाऊन बघा :-

जर तुम्हाला तुमच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढवायचे असेल तर दहीचे सेवन करा. दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. आपल्या शरीराला कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे.

कडधान्याचा वापर करा :-

कडधान्यात वेगवेगळे प्रोटिन्स, फायबर्स, लोह त्याचबरोबर मॅग्नेशियम असे वेगवेगळे घटक असल्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी कडधान्य मदत करेल. जर तुम्ही रोज सकाळी मोड आलेले कडधान्यांचे सेवन केले तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

पालेभाज्यांचा समावेश करा :-

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात होणारे वेगवेगळे आजारांपासून जर तुम्हाला दूर राहायचे असेल तर हिरव्या तसेच ताज्या पालेभाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. ज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे कॅल्शियम. पालेभाज्या मध्ये असणारे कॅल्शियम तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी योग्य ठरेल. त्यामुळे पालेभाज्यांचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले शरीरातील कॅल्शियम कसे वाढवावे ? त्याचबरोबर त्याचे घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला हवा असेल ,तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *