सकाळी लवकर उठण्याचे फायदे नक्की माहिती करून घ्या

आघाडा

आपण आपल्या आजी-आजोबा किंवा घरातील मोठ्या व्यक्तींकडून नेहमी ऐकत असतो,की नेहमी सकाळी लवकर उठावे कारण त्याना माहीत होते की सकाळी लवकर उठण्याचे फायदे काय आहेत ते. पण भरपूर जणांना प्रश्न पडलेला असतो की, सकाळी लवकर उठून नेमके करायचं तरी काय ? तर काही लोकांना सकाळी लवकर उठता येत नाही, याची समस्या असते. त्याचबरोबर काहींना सकाळी लवकर म्हणजे कोणत्या वेळेला उठावे ? हे माहीत नसते.

सकाळी लवकर उठणे हे केव्हाही चांगले असते, कारण सकाळी लवकर उठल्याने आपल्याला आपली काम करण्यासाठी जास्त अथवा पुरेसा वेळ मिळतो. जर आपण थोडासा रिसर्च केला तर आपल्याला असे दिसून येईल की, जगातील काही श्रीमंत माणसाच्या जीवनातील एक महत्वाचा नियम म्हणजे सकाळी लवकर उठणे हा असतो. तुम्ही जर बघितले आपले पूर्वज किंवा आपले पंजोबा अथवा आजी-आजोबा यांना सकाळी लवकर उठण्याची सवय असते, कारण त्यांना सकाळी लवकर उठण्याचे फायदे माहिती असतात.

आयुर्वेदानुसार सकाळी नेमके कोणत्या वेळी उठावे ? हे सांगितले अथवा दर्शविले आहे.आयुर्वेदानुसार सकाळी सुर्योदया आधी किंवा मग सूर्योदय होणाऱ्या वेळेस सकाळी म्हणजेच पहाटे चार वाजता किंवा पहाटे पाच वाजता उठावे. तसेच एक्सपर्ट ही असे सांगतात कि] सकाळी पहाटे उठणे कधीही चांगले असते.

सकाळी लवकर उठणे शरीरास उत्तम ठरते. काही लोक इतर कोणाच्या सांगण्यावरून किंवा मनाशी निश्चय करून एक-दोन दिवस सकाळी लवकर उठतात, पण सकाळी लवकर उठून नेमके काय करायचे ? हेच त्यांना माहीत नसल्यामुळे ते सकाळी लवकर उठणे टाळतात. पण जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचे फायदे किंवा आपण सकाळी लवकर उठल्यामुळे आपले शरीर निरोगी कसे राहील ?हे जर माहित असेल तर आपल्याला अनेक गोष्टीचा फायदा होऊ शकतो.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सकाळी लवकर उठण्याचे फायदे कोणते आहेत’? व सकाळी लवकर उठल्यामुळे कोणकोणत्या गोष्टींची आपल्या शरीराला मदत होते. त्याच बरोबर जर आपण सकाळी लवकर उठलो नाही तर आपल्याला कोणकोणते नुकसान होऊ शकतात? हे जाणून घेणार आहोत.

सकाळी लवकर न उठल्याने होणारे दुष्परिणाम :-

जर तुम्ही दिवसा उशिराने उठत असणार तर तुम्हाला पूर्ण दिवस कधी संपतो, हे सुद्धा बर्याच वेळा समजत नाही आणि खूप लोकांचे असे म्हणणे असते कि काम करायला वेळच मिळत नाही. पण हे फक्त उशिराने उठल्याने सुद्धा होऊ शकते. चला मग तर जाणून घेऊया इतर नुकसान –

दिवसाची सुरुवात चिडचिडेपणाने होणे :-

काही लोकांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची किंवा मग रात्रभर जागरण करण्याची सवय असते. त्यामुळे अशा लोकांना सकाळी लवकर उठने शक्य होत नाही व त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळचे नऊ किंवा साडेनऊ या वेळेपासून होते. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप न झाल्यामुळे त्याच्या दिवसाची सुरुवात चिडचिडेपणानी होते व त्याचबरोबर शरीरात थकवा जाणवतो. त्यामुळे रात्री जितक्या लवकर झोपता येईल तितक्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करायला हवा.

कोणतेही काम करण्यास मन लागत नाही :-

सकाळी लवकर न उठल्यामुळे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित राहत नाही. त्याचबरोबर आपण जर रात्री जास्त जागरण केलं तर आपल्याला सकाळी लवकर जाग येत नाही. त्याच बरोबर आपला दिवस कंटाळवाणी जातो, आपल्याला कामाला जायला उशीर होतो.

त्याचबरोबर आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि आपला अर्धा दिवस या सगळ्या धावपळीत निघून जातो. त्यामुळे आपल्याला कोणतेही काम करण्यास आपले मन लागत नाही.

दिवस धावपळीत निघून जातो :-

सकाळी लवकर न उठल्यामुळे आपल्याला सकाळी उठायला उशीर होतो. त्यामुळे आपल्याला सकाळचा नाश्ता पण नशीब होत नाही. त्यामुळे शरीराला पुरेसा आहार मिळत नाही व कोणतेही काम करण्यास ऊर्जा भेटत नाही, त्यामुळे त्यांचा दिवस खुप धावपळीत निघून जातो.

कामाचा ताणतणाव निर्माण होतो :-

सकाळचा पुरेसा आहार त्याचबरोबर सकाळची पुरेशी झोप नसल्यामुळे आपल्यावर इतर कामाचा ताण तणाव किंवा स्ट्रेस निर्माण होतो. कामाचा ताण तणाव असल्यामुळे आपल्याला ते शांत झोप लागत नाही.आणि नंतर जर शांत झोप लागली तर सकाळी लवकर उठता येत नाही, त्यामुळे लवकर उठून जर आपण मेडिटेशन केलं, तर आपल्याला आपला ताणतणाव कमी करण्यास मदत मिळेल.

सकाळी लवकर उठण्याचे फायदे :-

वरील प्रमाणे आपण सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणते नुकसान होतात ? हे आपण बघितले. आता आपण बघुया की सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणत्या गोष्टी मदतीस ठरतात ?

सकारात्मकता निर्माण होते :-

जर आपण सकाळी पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी जर आपण उठलो तर आपल्याला पक्षांचा किलबिलाट ऐकण्यास मिळतो. सकाळी सूर्योदय होताना दिसतो ज्यामुळे प्रफुल्लित वातावरण निर्माण होते त्यामुळे आपल्यामध्ये एक वेगळी सकारात्मकता निर्माण होते आणि मन शांत राहते.  त्यामुळे काम करण्यास नवी ऊर्जा निर्माण होते.

व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतो :-

सकाळी पहाटे लवकर उठल्यानंतर आपण जर व्यायाम केला तर आपल्या शरीरातील रक्तसराव वाढतो आणि काम करण्यासाठी नवीन ऊर्जा प्राप्त होते.त्याच बरोबर आपल्या ताजे अथवा फ्रेश वाटते.त्यामुळे आपला दिवस चांगल्या जाण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला जर कुठला ताण असेल करतो कमी होण्यास मदत मिळते.

काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतो :-

जर आपण सकाळी लवकर उठलो तर आपल्याला वेगवेगळे काम करण्यासाठी जास्त वेळ भेटतो. उदाहरणार्थ :- जर आपण सकाळी लवकर उठलो, तर आपल्याला वेगवेगळे काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. वेगवेगळे काम म्हणजेच योगा, मेडिटेशन करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. या वरील सर्व गोष्टी केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. त्यामुळे आपला दिवस हा चांगला जातो आणि मन प्रसन्न राहते.

तर आज आपण बघितले सकाळी लवकर न उठल्यामुळे चे नुकसान कोणते? त्याचबरोबर सकाळी लवकर उठण्याचे फायदे कोणते ? यासंदर्भात तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल, तर डॉक्टरचा सल्ला घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *