रात्री झोप येत नसेल तर करा हे सोपे घरगुती उपाय


झोप हा एक आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवसभर खूप काम करतो पण दुसऱ्या दिवशी आपल्याला पुरेशी ऊर्जेची गरज असते जेणेकरून आपण आपले काम नीट करू शकू. त्याच बरोबर आपले शरीर व मेंदू शांत ठेवण्याची गरज असते. या सर्वांचे उत्तर म्हणजे झोप.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण कोणीही झोपे शिवाय राहू शकत नाही. आपण जर झोप घेतली नाही तर आपण निरुत्साही दिसू. आपल्या शरीरामध्ये काही उत्साह राहणार नाही आणि जर उत्साह राहणार नाही तर आपले काम कशी होतील. आपण विचार करून बघा जर आपण एक दिवस झोप घेतली नाही. तर आपला तो पूर्ण दिवस खराब जातो. तसेच काही काम करण्याची इच्छा होत नाही.

झोप हा एकमात्र उपाय आहे जो आपल्या शरीराला शांत करतो, मेंदूला शांत करतो. तसेच नवीन नवीन काम करण्याची कामे शिकण्याची ऊर्जा देतो. आपण नियमितपणे सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे. पण काही लोकांना झोप येतच नाही. तर त्याचे कारण अनेक असू शकतात. तसेच काही लोकांना झोप लागते पण त्यांना मध्ये मध्ये जाग येते. त्यांची पुरेशी प्रमाणामध्ये झोप होत नाही किंवा अखंड झोप होत नाही. काही लोक झोपतात पण त्यांना शांत अशी झोप येत नाही. जी आपल्या शरीराला आवश्यक आहे.

हेच आपण आज बघणार आहोत की झोप का येत नाही. त्याची कारणे कोणती ? तसेच आपण आपल्या दिनक्रमा मध्ये काय बदल करावा ? हे आपण जाणून घेऊया. झोप येण्याची घरगुती प्रभावशाली उपाय कोणते ?

झोप न येण्याची कारणे :

  1. अनियमित आहार
  2. काम करण्याची अयोग्य पद्धत
  3. योग्य वेळेत झोप न घेणे
  4. झोपण्याचे ठिकाण बदलणे
  5. जागरण केल्याने

याला आपण पंच कारणे असे म्हणतो. हे पाच कारण असू शकतात झोप न येण्याचे. कारण आपण बरेचदा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर परिणाम दिसून येतो.

तसेच आपण बघितले की आहार हे झोप न येण्याचे कारण असू शकते. तर आपण आपल्या दिवसभरामध्ये आपल्या शरीराला पुरेसी असलेली ऊर्जा आपल्या आहारातून घेत नाही. तसेच बाहेरचं फास्टफूड खातो त्याच बरोबर अतिउष्ण पदार्थ, तेलकट, तुपकट पदार्थ हे खाल्ल्याने आपल्या शरीराचे एकांतरित संतुलन बिघडते व त्याचा सरासरी परिणाम आपल्या झोपेवर होतो.

नंतर म्हणजे काम ? आपण किती श्रमाचे काम करतो यावर ही झोप अवलंबून असते. त्याचबरोबर वेळेवर ही झोप अवलंबून असेते आपण कोणत्या वेळेत झोप घेतली पाहिजे. किती प्रमाणामध्ये घेतली पाहिजे. हे खूप गरजेचे असते, तसेच आपण जागरण करतो. ते जागरणाने आपल्याला झोप कमी येते अथवा शांत झोप लागत नाही.

रात्री झोप येण्याचे सोपे उपाय :

चला तर मग आपण आता जाणून घेऊया काय आहे सोपे उपाय जे आपल्याला शांत झोप येण्यासाठी फायदेशीर राहतील.

काम करण्याची पद्धत बदलावा :

आपल्या प्रत्येकाचे काम वेगवेगळे असते. तसेच काम करण्याची पद्धतही वेगळी असते. त्याचबरोबर कोणाचे काम अतिश्रमाने असते. तर कोणाचे काम कमी श्रमाचे असते. जर आपले काम अतिश्रमाने असेल तर आपण प्रत्येक दोन तासाने अथवा तीन तासाने त्यामध्ये थोडीशी विश्रांती घ्यावी.

त्याचबरोबर जर आपले काम कमी श्रमाचे असेल म्हणजेच आपले काम कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल वर काम करत असेल. त्याच बरोबर आपण एकाच जागेवर बसून काम करणे टाळावे. थोडी हालचाल करत राहावी. तसेच एकटक मोबाईल कडे अथवा डिजिटल स्क्रीनवर बघणे टाळावे. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर ब्ल्यू लाईट फिल्टर ही लावू शकतात. जेणेकरून तुमचे डोळे लाल होणार नाही तसेच तुमचे झोपेची समस्याही दूर होईल. 

विश्रांतीची वेळ ठरवून घ्या : 

आपल्या शरीराला विश्रांतीची खूप गरज असते. त्याचबरोबर आपण विश्रांती कशी घ्यावी ? किती प्रमाणामध्ये घ्यावी ? हेच आपणास सांगणार आहोत. आपल्या शरीराला साधारणता दिवसभरामध्ये सात ते आठ तास झोप असणे पुरेसे आहे. पण ती झोप शांत असावी. तसेच आपल्या प्रत्येक कामांमध्ये आपण थोडी थोडी विश्रांती घ्यावी. तसेच तुम्हाला जर दुपारी वेळ असेल तर एक ते दोन तास शांत झोप घ्यावी. तसेच रात्री जागरण करू नये. आपल्या सगळ्याला मुख्यता शांत झोप रात्री आवश्यक असते. 

रोज झोपेचा वेळ तुम्ही ठरवून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. जर तुम्ही रात्री अकराला झोपत असणार तर रोज रात्री अकरा वाजता झोपा तेव्हा तुम्हाला काहीही न करता झोप येईल. सारखा सारखा वेळे मध्ये बदल झाल्यामुळे तुमची झोप लावण्याची सवय जाते.

योगा करणे फायदेशीर ठरेल :

आपल्याला योगाचे महत्त्व माहितीच आहे. म्हणून जर आपल्याला झोप येत नसेल. तर आपण योगामध्ये मुख्यताहा प्राणायाम करावे. आपण दिवसभरातून चव्हाण दहा ते पंधरा मिनिटे प्राणायाम करावा. प्राणायाम केल्याने तुमचा मेंदू व शरीर शांत होईल व तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल.

 तर आज आपण बघितले झोप न येण्याची कारणे कोणती. तसेच त्याचे उपाय कोणते. हे उपाय जर तुम्ही करून बघितले तर तुम्हाला नक्कीच थोड दिवसांमध्ये फरक दिसून येईल. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देऊ शकतात.

जायफळ आणेल शांत झोप :

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जायफळ हे मुख्य ताहा झोप येण्यासाठी वापरली जाते. पूर्वीच्या काळामध्ये आई त्यांच्या लहान मुलांना झोप येण्यासाठी जायफळ उगडून देत असे. कारण जायफळ यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असते. जे तुमच्या झोपेसाठी फार उपयुक्त ठरते. तसेच यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. तुम्हाला जर शांत झोप लागत नसेल –

तर तुम्ही एक जायफळ घ्या, जर तुमच्याकडे उगळणी असेल तर त्यावर ते जायफळ उगळावे व साधारणत पाऊण चमचा ते उगळावे. त्यानंतर ते रोज रात्री झोपताना उगळलेला जायफळ चाटावे. असे केल्याने तुमची झोप न येण्याची समस्या नाहीशी होईल.

अश्वगंधा चूर्ण घेणे :

जर तुम्हाला असं जाणवत असेल की तुम्हाला झोप येत नाही आहे आणि तुम्ही बरेच प्रयत्न करूनही तुम्हाला झोप लागत नाही तर तुम्ही अश्वगंधा चूर्ण सोबत सर्पगंध चूर्ण एकत्र तीन ते पाच ग्रॅम मिसळून रात्री ते कोमट दुधासोबत तुम्हाला घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल. जर सर्पगंध चूर्ण नसेल तर तुम्ही फक्त अश्वगंधा पावडर ५ ग्राम घेऊन दुधात मिसळून पिऊ शकतात.

दालचिनी फायदेशीर असेल :

रात्री झोपण्याच्या आधी दालचिनी तुम्हाला फायदेशीर राहील त्यासाठी तुम्हाला रात्री झोपताना गरम दुधासोबत दालचिनी घेणे फायदेशीर राहील. दुधासोबत दालचिनी पावडर घेतल्याने तुम्हाला शांत झोप लागेल.

असेच उपाय जाणून घेत राहण्यासाठी नक्की शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *