रक्त शुद्धीकरण करण्यासाठी घरगुती उपाय तुम्हाला माहिती आहे का ?


रक्त हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे आणि त्याचबरोबर अविभाज्य असे घटक आहे. आपल्या शरीराला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू त्याच बरोबर शरीराला आवश्यक असणारी वेगवेगळे मूलभूत पौष्टिक तत्वे आपल्या शरीरापर्यंत पोहोचवण्याचे काम रक्त करत असते, पण आपले रक्त जर शुद्ध नसेल तर आपल्याला खूप सारे आजार होऊ शकतात. त्या साठी रक्त शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

आपल्या शरीरात रक्त जर शुद्ध असेल तर आपण निरोगी व सुदृढ आयुष्य जगू शकतो. पण हेच रक्त जर अशुद्ध असेल तर आपल्या निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आपल्या शरीरातील रक्त जर शुद्ध असेल तर आपली त्वचा निरोगी व ताजी राहण्यास मदत मिळते. अनेकदा नकळत खालेल्या पदार्थांमुळे रक्त शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे आपल्या शरीरात रक्त शुद्धीकरण होत नाही आणि त्याच बरोबर आपल्या रक्तात टॉक्सिन्स निर्माण व्हायला सुरुवात होते.

हे टॉक्सिन्स आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. या मुळे आपल्याला थकवा, डोकेदुखी त्याचबरोबर अपचन अशा समस्या होऊ शकतात. आपल्या शरीरात रक्त अशुद्ध असल्यामुळे आपल्या शरीरात विषारी व हानीकारक घटक निर्माण होतात.

रक्त अशुद्ध असल्यामुळे शरीरात निर्माण झालेल्या विषारी घटकांमुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागू शकते. यासाठी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध असणे फार महत्वाचे आहे. रक्त अशुद्ध असल्यामुळे आपल्याला त्वचेचे विकार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे त्वचा निस्तेज होऊ शकते.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शरीरातील रक्त अशुद्ध होण्याचे मुख्य कारण कोणते ? व त्यावर आपण कोणकोणते घरगुती उपाय करून ? आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करू शकतो. चला तर मग बघूया !

शरीरातील रक्त अशुद्ध होण्याचे कारणे :-

जर आपल्याला माहिती असेल की आपले रक्त अशुद्ध का होते तर आपण रक्त अशुद्ध होण्यापासून आधीच टाळू शकतो

अनहेल्दी फूड चे सेवन :-

आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात कामाचा भार असल्यामुळे आपण शरीराकडे काही लक्ष देत नाही. आपण कोणतेही फास्ट फूड खातो. पण हेच फास्ट फूड आपल्या शरीरासाठी हानिकारक आणि अनहेल्दी असते. त्यामुळे आपले रक्त अशुद्ध होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते.

अतिप्रमाणात धुम्रपान करणे :-

आपण बघितले असेल बऱ्याच लोकांना धूम्रपान करण्याची सवय असते. पण धूम्रपान करणे हे आपल्या शरीरास हानिकारक ठरू शकते. अतिप्रमाणात धूम्रपान केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त अशुद्ध होते व त्यामुळे आपल्या शरीरात विषारी घटक निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळे अति प्रमाणात धुम्रपान करणे शरीरास व शरीरातील रक्तासाठी हानीकारक आहे.

अपचन होणे :-

आपण खाल्लेले पदार्थ किंवा अन्न जर आपल्याला पचत नसेल, तर त्यामुळे आपले शरीरातील रक्त अशुद्ध होते. अनेक लोकांना अपचनाचा त्रास उद्भवतो, त्यामुळे आपल्या शरीरातील अन्न नीट नसल्यामुळे आपल्या शरीरात निर्माण होऊ शकते.

कमी प्रमाणात पाणी पिणे :-

आयुर्वेदानुसार मानवी शरीराने दिवसातून कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी पिले पाहिजे. पाणी हे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यास आपल्याला मदत करते. पण जर आपण कमी प्रमाणात पाणी पित असाल, तर त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होत नाही व आपल्या रक्तातील विषारी घटक आपल्याला वेगवेगळ्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे सुद्धा रक्त अशुद्ध होणे अशा समस्या होऊ शकतात.

शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्यासाठी उपाय :-

वरील भागात आपण बघितले आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होण्याचे मुख्य कारण कोणते ? आता आपण बघणार आहोत जर आपल्या शरीरात रक्त असेल तर झाले असेल तर कोणकोणते घरगुती उपाय करून आपण आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करू शकतो ?

लसणाचा आहारात समावेश करावा :-

आयुर्वेदानुसार लसूण हा रक्त शुद्ध करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. लसणामध्ये अँटिबायोटिक अधिक प्रमाणात असते. जे आपले रक्त शुद्ध करण्यासाठी मदतगार ठरते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी लसणाचा आपल्या आहारात समावेश करावा.

रक्त शुद्धीकरण करण्यासाठी बीट खाऊन बघा :-

आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी बीट हे फायदेशीर ठरू शकते. बीट खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता भरून काढली जाते. रोज सकाळी जर तुम्ही बिटचा रस प्यायला तर तुमचे रक्त शुद्ध करण्यासाठी बिटाचा रस मदत करेल.

लिंबाचा रस घेऊन बघा :-

तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी रोज सकाळी थोड्याशा कोमट पाण्यात लिंबू निपळून ते पाणी प्या. लिंबूमध्ये असणाऱ्या लॅक्‍टिक ऍसिड आणि विटामिन्स मुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यास लिंबाचा रस हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

रक्त शुद्धीकरण करण्यासाठी आल्याचा वापर करा :-

आयुर्वेदानुसार आलं हे रक्त शुद्धीकरण करण्याचे उत्तम स्तोत्र मानले आहे. आलं आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करतेच पण त्याचबरोबर आपल्या शरीरात पेशी वाढवण्याचे काम सुद्धा करते. सकाळी उपाशीपोटी आल्याचा एक छोटासा तुकडा त्याचा चौथा होईपर्यंत चघळा. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले रक्त शुद्ध होण्याचे कारणे कोणती ? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *