प्रवास करताना उलटी चा त्रास होतोय का ? हे करून बघा


जगभरातील प्रत्येकालाच वेगवेगळ्या ठिकाणी जायला, त्याचबरोबर प्रवास करायला आवडते. भरपूर लोक आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत हा प्रवास करत असतात. तर लहान वयोगटातील मुलेसुद्धा सहलीसाठी आपल्या पालकांबरोबर प्रवास करत असतात. पण बरेच लोकं हाच प्रवास करणे टाळतात. त्यांचा प्रवास आनंददायी न ठरता त्रासदायक ठरतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रवास करताना उलटी किंवा मळमळणे त्रास होणे.

एका रिपोर्टनुसार प्रवास करणाऱ्या लोकांपैकी 20% टक्के लोक प्रवासात मळमळणे व उलटीचा त्रास होणे अशा समस्यांची भीती मनात ठेऊन प्रवास करणेच टाळतात. तर काही लोक अक्षरशः आपले डोळे बंद करून संपूर्ण प्रवास करतात. यातील बऱ्याच लोकांना प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलटी का होते ? याचे कारणे माहीत नसतात तर काहींना हा त्रास होऊ नये त्यामुळे ते कोणाचाही सल्ला न घेता वेगवेगळे उपाय करतात.

याच उलटीच्या त्रासाला मोशन सिकनेस असेही म्हटले जाते. तर काहीजण यालाच बस लागणे किंवा गाडी लागणे असेही म्हणतात. प्रवास करताना हा उलटीचा त्रास आपल्याला बस, आपल्या मालकी हक्काची गाडी किंवा मग विमानातून प्रवास करताना होतो.

सगळ्यांनाच प्रवास करणे हे आवडते. पण काही जणांना आपल्याला प्रवासात उलटी होईल या विचाराने ते प्रवास करणे टाळतात.त्याच बरोबर प्रवास टाळल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाच्या आनंद किंवा वेगळी ठिकाणी फिरण्याचा अनुभव घेता येत नाही.

अनेक लोक प्रवास करताना या उलटीच्या त्रासाला कंटाळून किंवा हा उलटीचा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय करतात, पण तेच उपाय काहीजणांना पुरेशी माहिती नसल्यामुळे घातक ठरू शकतात. त्यासाठीच आज मित्रांनो आपण बघणार आहोत प्रवास करताना जर आपल्याला उलटीचा त्रास होत असेल तर आपण कोणकोणते उपाय करून? आपण आपल्या प्रवासाचा आनंद त्याचबरोबर मनोरंजनाचा अनुभव येऊ शकतो. चला तर मग बघुया!

प्रवास करताना उलटी होण्याचे कारण :-

अनेक लोकांना लांबचा प्रवास म्हटले तर आपल्याला प्रवास करताना उलटीचा त्रास होईल या विचारांनीच त्यांच्या मनात भीती निर्माण होते आणि त्यांना घाम फुटायला सुरुवात होते. प्रवास करताना उलटी होणे हे लहान किंवा मोठी माणसे यापैकी कोणालाही होऊ शकतो. यामध्ये लहान-मोठे असा फरक नसतो कोणालाही हे होऊ शकते.

जेव्हा कधीही आपण कुठला प्रवास करतो तेव्हा आपण कोणत्या वेळी कुठल्या ठिकाणी आहोत? हे संकेत आपले ज्ञानंद्रिये आपल्या मेंदूला देत असतात. पण आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा बहुतांश उलटी होण्याचा त्रास डोळे व कान या दोन ज्ञानंन्द्रिय यांचा ताळमेळ न बसल्यामुळे होतो. आवाज, वेग अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे मेंदूपर्यंत जाणारे संकेत गोंधळतात आणि आपल्या मेंदूपर्यंत पुरेसे संकेत न मिळाल्यामुळे आपल्या प्रवासात उलटी होणे हा त्रास व्हायला लागतो किंवा हा त्रास व्हायला सुरुवात होते. तर उलटीसारखे त्रास थांबवण्यासाठी नेमके तुमचे उपाय केले पाहिजे? हे आपण आता बघणार आहोत.

प्रवास करताना उलटी किंवा मळमळ थांबवण्यासाठी घरगुती उपाय :-

वरील भागात आपण बघितले की, प्रवास करताना उलटी होण्याचे मुख्य कारण कोणते ? आता आपण जाणून घेणार आहोत, प्रवासादरम्यान उलटी थांबवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात ? ज्यामुळे आपण आपल्या प्रवासाचा आनंद घेऊ शकतो.

लिंबू चा वापर करा :-

प्रवासादरम्यान जर आपल्याला मळमळ किंवा उलटी चा त्रास होत असेल तर आपल्या सोबत लिंबू सरबत ठेवा. जर तुम्ही नुसता लिंबूचा रस ही घेतला तरी काही हरकत नाही. लिंबू मध्ये लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे शरीराचा ताळमेळ बसवण्यासाठी उपयोगी ठरते व त्याचबरोबर आपली होणारी मळमळ थांबवण्यास मदत करू शकते.

लवंग चा वापर करा :-

जर तुम्हाला प्रवास करताना मळमळ व त्याचबरोबर उलटी सारखा त्रास होत असेल, हा त्रास थांबवण्यासाठी लवंग हा उत्तम उपाय आहे. प्रवासादरम्यान उलटीचा त्रास थांबवण्यासाठी एक लवंग प्रवास करताना तोंडात चघळा. त्यामुळे तुमचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

अद्रक ठरेल गुणकारी :-

जर तुम्हाला प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होऊ नये असे जर वाटत असेल तर, प्रवास सुरू करण्याचा अर्धा तास आधी एक आल्याचा चहा ज्यात आलं अधिक प्रमाणात असेल असा चहा प्या.

आलं हे गुणकारी असते व त्यामुळे तुम्हाला होणारा उलटीचा त्रास थांबू शकतो. त्याचबरोबर तुमच्या शरीराचा ताळमेळ बसण्यास किंवा सुधारण्यास मदत होऊ शकते.

सुपारी किंवा आवळ्याचे सेवन करून बघा :-

जर तुम्ही प्रवासात होणाऱ्या उलट्या या त्रासापासून कंटाळली असाल व त्यावर तुम्हाला एक रामबाण उपाय हवा असेल तर सुपारी किंवा आवळ्याचे सेवन करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जेव्हा तुम्हाला मळमळ अथवा उलटीचा त्रास जाणवण्यास सुरुवात होईल तेव्हा एक सुपारी किंवा एक आवळा तोंडात चघळा. त्यामुळे तुमचे शरीराचे संतुलन किंवा ताळमेळ बसण्यास मदत होईल.

तर आज आपण बघितले आपण प्रवास करत असताना आपल्याला होणारी मळमळ किंवा उलटीचा त्रास जर थांबावायचा असेल तर कोणकोणते घरगुती उपाय आपल्याला मदतगार ठरू शकतात ? यासंदर्भात जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला ही घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *