झोपताना पोटावर उलटे झोपल्याने होणारे नुकसान नक्की जाणून घ्या

आपण बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला खूप सार्‍या समस्या होऊ लागतात जसे की आपल्याला माहीतच नसेल की झोपताना पोटावर उलटे झोपल्यामुळे सुद्धा आपल्याला खूप सारे नुकसान होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला अंगदुखी सुद्धा होऊ शकते. सकाळी उठल्यावर बऱ्याचवेळा आपल्याला फ्रेश वाटत नाही किंवा डोकेदुखी किंवा अचानक कमरेमध्ये दुखायला लागते, पण आपण याचा अर्थ काहीतरी वेगळाच काढतो. आपण असे समजतो की दिवसभर काम केल्यामुळे किंवा धावपळ केल्यामुळे आपल्याला हा त्रास होत आहे पण याच्या मागचे काही वेगळेच कारण असते.

बरेच लोक असे आहेत की त्यांना रात्री झोपताना पोटावर उलटे झोपल्याने झोप लागते, पण हा एकदम गैरसमज आहे. त्यांना असे वाटते की पोटावर झोपल्याने त्यांना शांत झोप लागेल आणि सकाळी उठल्यावर फ्रेश नाही वाटेल पण असे काही होत नसते. जर आपण पोटावर उलटे झोपत असू तर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात जसे की.

पोटावर उलट झोपल्याने होणारे नुकसान :

तर चला मग आपण आता जाणून घेऊया की आपण जर रात्री झोपतांना पोटावर झोपत असणार तर, आपल्याला त्यामुळे काय काय नुकसान होऊ शकतात तर –

डोकेदुखीचा त्रास :

बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर आपल्याला असे जाणवते की आपल्या डोक्यामध्ये अचानक हळूहळू दुखायला लागते आणि आपल्याला डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो, पण आपण याचा अर्थ काहीतरी वेगळा समजतो कि शक्यतोवर आपण काहीतरी तणाव घेतला असेल किंवा आपल्याला चहा प्यायची आवश्यकता आहे.

पण बघायला गेलं तर रात्री पोटावर उलट झोपल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये योग्य पद्धतीने रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि सकाळी उठल्यावर डोकेदुखीची सुरुवात होते.

कमरे मध्ये दुखायला लागते :

बऱ्याचवेळा सकाळी उठल्यानंतर आपल्याला असे जाणवते की, आपल्या कमरेत थोडे थोडे दुखू लागले आहे आणि आपण याचा अर्थ समजतो की शक्यतोवर, आपले वजन वाढले आहे किंवा आपले वय वाढले आहे, यामुळे सुद्धा हे होत असेल. पण बघायला गेला तर बऱ्याच वेळा आपल्या कमरेमध्ये दुखी चे कारण रात्री झोपण्याची पद्धत असते.

आपल्या पाठीत बॅकबोन असतात ते बॅकबोन जर रात्री झोपताना आपण एक पाय एल आकारामध्ये करतो, त्यामुळे आपल्या बॅकबोन चा आकार थोडा वागतो आणि यामुळे कंबरे मध्ये दुखणे सुरुवात सकाळी जाणवू लागते.

पोट साफ होत नाही :

पोटावर उलट झोपल्यामुळे आपल्या पोटा वर प्रेशर येते आणि त्या प्रेशर मुळे आपण जे जेवण केलेलं असतं ते पचत नाही आणि याच समस्यांमुळे बऱ्याच वेळा आपल्याला पोट साफ होत नाहीये, असं जाणवतं. आपण याचा अर्थ काहीतरी वेगळाच घेतो की आपल्या खाण्या-पिण्याच्या पद्धती मध्ये काहीतरी चुकी होत आहे आणि त्यामुळे सुद्धा पोट साफ होत आहे असे आपण समजून घेतो पण याचे वेगळेच कारण असते.

पोटात सारखा गॅस होणे :

झोपताना उलट झोपल्यामुळे आपल्या पोटावर प्रेशर पडते आणि जेवण पचत नाही, त्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये गॅस तसाच राहतो आणि तो पोट दुखण्याची समस्या घेऊन येतो. त्यामुळे बऱ्याच वेळा पोटात गॅस राहण्याची समस्या उद्भवते.

श्वास घेण्यासाठी त्रास होतो :

झोपताना आपण पोटावर जेव्हा झोपतो तेव्हा आपली मान आपण आडवी करून झोपतो किंवा आपण त्याच्या खाली उशी घेतो आणि याच्यामुळेच आपल्या घशामध्ये चोक तयार होतो यामुळे श्वास घेण्यासाठी आपल्याला त्रास होतो व बऱ्याच वेळा थरथर सुद्धा जाणवते.

महिलांच्या छातीचा आकार बदलतो :

बऱ्याच महिलांना छातीचा आकार कमी जास्त होण्याची समस्या जाणवत आहे आणि यामागे पोटावर उलटे झोपणे हे सुद्धा एक कारण असू शकते. पोटावर उलट झोपल्यामुळे आपल्या छातीच्या लिगामेंट मध्ये तणाव वाढल्यामुळे छातीच्या आकारांमध्ये कमी जास्त होऊ शकते.

तर मित्रांनो हे होते पोटावर उलटे झोपल्याने होणारे नुकसान.अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांची सुद्धा मदत घेऊ शकतात.

Leave a comment