पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय


बर्याचवेळा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे सेवन केल्याने आपल्या पोटात गॅस निर्माण होतो आणि या पोटातील गॅस मुळे खूप त्रास होतो. आपल्या पोटातील अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे हा गॅस निर्माण होतो, तसेच काही वेळेस आपले जेवण हे वेळेवर होत नाही, अवेळी होणाऱ्या जेवणामुळे सुद्धा पोटातील गॅस निर्माण होऊ शकते.

अनेकदा बाहेरचे वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा पोटात गॅस तयार होणे अशा समस्या निर्माण होतात. जर आपल्या पोटात अतिप्रमाणात गॅस निर्माण झाली तर आपल्याला पोटदु:खी असा त्रास होऊ शकतो. पोटात गॅस निर्माण झाल्यामुळे आपल्याला जेवणसुद्धा कमी जाते, तसेच आपल्याला जास्त भूक पण लागत नाही.

पोटातील गॅस कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोळ्याचे सेवन करतात, पण कधीकधी ह्या गोळ्यामुळे सुद्धा आपल्याला पुरेसा आराम मिळत नाही. काही जणांना हा त्रास सहन होत नाही त्यामुळे ते अति प्रमाणात गोळ्यांचे सेवन करतात. पण अति प्रमाणात गोळ्याचे सेवन करणे हे आपल्या शरीरास हानिकारक ठरू शकते.

पोटात गॅस निर्माण होणे याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे शरीराला पोष्टीक तत्त्व न मिळणे. आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपण वेळ न मिळाल्यामुळे कधीही फास्टफूड खातो. तसेच या फास्टफूडमुळे आपल्या शरीराला हवी ती पौष्टिक तत्त्वे मिळत नाही, त्यामुळे गॅस सारख्या समस्या निर्माण होतात.

पोटात गॅस निर्माण होणे हा अनुभव प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी घेतलेलाच असतो. पोटात गॅस निर्माण झाल्यामुळे आपल्याला ढेकर येणे, पोट फुगणे असे वेगवेगळे त्रास होऊ लागतात. त्याच बरोबर कधीकधी ऍसिडिटीमुळे सुद्धा पोटात गॅस निर्माण होतो.

पोटात गॅस निर्माण होण्याची कारणे :-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोटात निर्माण होण्याचे मुख्य कारण कोणते ? व त्यावर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ? चला तर मग बघूया-

अपचन होणे :-

अपचन होण्याचे मुख्य कारण म्हणजे अधिक प्रमाणात फायबर असलेले पदार्थ पदार्थांचे सेवन केल्यामुळे हा त्रास होतो. आपले शरीर अधिक प्रमाणात फायबर असलेले पदार्थ सहजासहजी पचवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला गॅस निर्माण होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

धूम्रपान करणे :-

अनेकवेळा अतिप्रमाणात धूम्रपान केल्यामुळे सुद्धा पोट फुगणे किंवा पोटात गॅस निर्माण होणे, अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोटात गॅस निर्माण होणे याचे मुख्य कारण धुम्रपानसुद्धा आहे.

स्टार्च असलेले पदार्थाचे सेवन केल्यामुळे :-

आपण जर स्टार्च असलेल्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केले तर आपल्याला पोटात गॅस निर्माण होणे, अशा समस्या होऊ शकतात. स्टार्च असलेले पदार्थ म्हणजे भात बटाटे आणि यांसारखे अजूनही वेगवेगळे पदार्थ आहे.

दुग्धजन्य पदार्थ :-

अनेकदा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे जसे की पनीर दही किंवा दूध अशा पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्याला पोट फुगणे किंवा पोटात गॅस निर्माण होणे अशा समस्या होऊ शकतात.

पोटातील गॅस कमी करण्यासाठी उपाय :-

वरील भागात आपण बघितले पोटात गॅस निर्माण होण्याचे मुख्य कारण कोणकोणते ? आणि त्यामुळे आपल्याला कोण कोणत्या वेदना होऊ शकतात ? आता आपण बघणार आहोत,पोटातील गॅस कमी करण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात ? अथवा केले जाऊ शकतात ?

आल्याचा आहारात समावेश करा :-

आपल्याला ऍसिडिटी झाल्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो. पण जर तुम्हाला या पोटात गॅस निर्माण होणे अशा समस्या पासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर आल्याचा आपल्या आहारात समावेश करा. आल्या मध्ये असणाऱ्या रासायनिक आरोग्ययुक्त रसामुळे तुम्हाला पोटातील गॅस निर्माण होणे या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते.

सोडा घेऊन बघा :-

जर तुम्हाला आलं आवडत नसेल तर तुम्ही सोड्याचा वापर करू शकतात. सोड्यामध्ये कार्बन-डाय-ऑक्‍साईड असल्यामुळे आपल्या पोटातील गॅस कमी करण्यासाठी सोडा हा उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही सोड्याचा सुद्धा वापर करू शकतात.

लिंबू पाणी घेऊन बघा :-

जर तुम्हाला सोडा उपलब्ध होत नसेल तर तुम्ही रोज सकाळी थोड्याशा गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात जर लिंबू मिसळून ते पाणी प्यायले, तर तुम्हाला पोटात गॅस निर्माण होणे अशा समस्या निर्माण होणार नाही. लिंबू मध्ये लॅक्‍टिक ऍसिड असल्यामुळे पोटातील गॅस कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.

ओव्या चा वापर करा :-

आयुर्वेदानुसार ओव्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराच्या अनेक समस्या या दूर होऊ शकतात. तुम्हाला पोटातील गॅस कमी करायचा असेल, तर रोज सकाळी थोडासा ओवा चावून त्यावर कोमट पाणी पिले तर तुम्हाला पोटात गॅस निर्माण होणे, अशा समस्या उद्भवणार नाही.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा.  तुम्हाला नक्की फरक दिसून येईल . तर आपण आज बघितले पोटातील गॅस कमी करण्यासाठी काय करावे ? त्याचबरोबर त्याचे घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *