पोटात कळ येणे कारणे आणि उपाय जाणून घ्या

पोटात कळ येणे कारणे आणि उपाय

पोटात कळ येणे याचे सोंग करून आपण सर्वांनी एकदा तरी आपल्या शाळेला सुट्टी घेतली असेल. पोटात कळ जाणवते याचा अनुभव आपण अगदी लहानपणापासून एकदा तरी अनुभवलेला असेलच. पोटात कळ येणे यालाच पोट दुखणे सुद्धा म्हटले जाते.

अनेक वेळा बाहेरचे पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्याला पोटात कळ सारखे येणे अशा समस्या उद्भवतात. पोटात कळ येते अशा समस्या आपल्याला पावसाळा या ऋतु मध्ये अतिप्रमाणात जाणवतात. पावसाळ्यात हवामान होणारे बदल किंवा पावसात खाल्लेल्या कुठलाही बाहेरच्या पदार्थांमुळे आपल्याला पोटात कळ जाणवते अशा समस्या निर्माण होतात.

पोटात कळ येऊ लागली की आपल्याला त्या वेदना सहन होत नाही. पोटामध्ये कळ येणे हा त्रास अतिशय त्रासदायक असतो. अनेकदा या पोटामध्ये कळ येणे या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा त्रास आणखी वाढू शकतो आणि आणि नंतर हा त्रास इतका वाढतो की आपल्याला उभे राहताना सुद्धा त्रास होतो.

अनेकदा पोटात कळ येणे हा त्रास थांबवण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्यांचा आधार घेतला जातो. पण त्यामुळे ही कधी कधी काही पुरेसा फरक पडत नाही. पण ह्या पोटात कळ येणे या समस्येवर तुम्ही घरगुती उपाय करून पोटामध्ये कळ येणे या समस्येपासून आराम मिळवू शकता.

पोटात कळ येण्याची कारणे :-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोटामध्ये कळ येणे याची मुख्य कारणे कोणकोणते आहेत आणि यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते करावे चला तर मग बघूया!

१. दूषित पाणी पिणे :-

पोटात कळा येण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छ पाणी न पिणे. अनेक वेळा पाण्यात उपलब्ध असलेला गाळ किंवा दूषित पाणी पिल्याने आपल्याला पोटामध्ये कळ येणे अशा समस्या निर्माण होतात. दूषित पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरात बॅक्टेरिया चे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आपल्याला पोटामध्ये कळ येणे किंवा पोट दुखणे अशा समस्या निर्माण होतात.

२. शिळे अन्न खाणे :-

अनेकदा रात्री किंवा दिवसा उरलेले जेवण वाया जाऊ नये म्हणून आपण ते दुसऱ्या दिवशी सुद्धा खातो. पण हेच शिळे अन्न खाणे आपल्याला महागात पडू शकते. शिळे अन्न खाणे हे एक महत्वाचे कारण आहे. पोटात कळ निर्माण होणे किंवा पोट दुखी होण्यासाठी अनेकदा शिळे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात वेगवेगळे जंतू आपल्या पोटात जातात. त्यामुळे पोटामध्ये कळ जाणवते अशा समस्या आपल्याला उद्भवतात.

३. अति प्रमाणात तिखट पदार्थ खाणे :-

अनेक लोकांना अति प्रमाणात तिखट खाण्याची सवय असते.पण हीच सवय त्यांना घातक ठरू शकते. अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला पोटात कळा निर्माण होणे किंवा पोट दुखणे अशा समस्या निर्माण होतात.अति प्रमाणात तिखट खाल्ल्यामुळे आपल्या पोटातील उष्णता वाढते आणि यामुळे आपल्याला पोटात कळ निर्माण होणे अशा समस्या उद्भवतात.

पोटात येणारी कळ थांबवण्यासाठी घरगुती उपाय :-

● ताजे अन्न खावे :-

पोटात कळ येणे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिळे पदार्थांचे सेवन करणे.अनेकदा शिळे पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या पोटात वेगवेगळ्या जंतूचा शिरकाव होतो आणि यामुळे आपली पचनक्रिया सुद्धा बिघडते आणि आपल्याला पोटामध्ये कळ येणे पोट दुखणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नेहमी ताजे अन्न खावे. त्याचबरोबर शिळ्या अन्नाचे सेवन करू नये. ताजे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे पोषकतत्वे मिळतात. त्यामुळे पोटामध्ये कळ येणे या समस्येला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर ताजे अन्न खावे.

● आल्याचा रस घ्यावा :-

जर तुमच्या पोटात येणारी कळ ही थांबत नसेल किंवा तिचा त्रास अधिक प्रमाणात वाढत असेल तर आल्याचा रस घ्यावा. उकळत्या पाण्यामध्ये आल्याचा तुकडा किसून ते पाणी चांगले गरम करावे आणि नंतर हे पाणी गाळून घ्यावे. नंतर या पाण्यामध्ये थोडेसे मध टाकावे आणि ह्या पाण्याचे सेवन करावे. असे दोन-तीन दिवस गेल्यामुळे पोटात कळ जाणवते या समस्येपासून तुम्हाला आराम भेटू शकतो.

● जिऱ्याचे पाणी प्यावे :-

जर तुम्हाला पोटात कळ जाणवते ही समस्या अधिक प्रमाणात वाढत असेल आणि पोटामध्ये कळ येणे थांबत नसतील तर तुम्ही जिऱ्याचे पाणी प्यावे. उकळत्या पाण्यामध्ये दोन चमचे जिरे टाकावे. नंतर हे पाणी चांगले उकळून घ्यावे आणि हे पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे. असे केल्यामुळे तुमच्या पोटात निर्माण होणाऱ्या कळा थांबण्यास तुम्हाला मदत मिळेल.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल .तर आपण आज बघितले पोटात कळ निर्माण होण्याची कारणे कोणती आहे? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


One response to “पोटात कळ येणे कारणे आणि उपाय जाणून घ्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *