पोटात आग पडण्याची कारणे आणि उपाय नक्की जाणून घ्या

पोटात आग पडण्याची कारणे आणि उपाय

अनेक लोकांना पोटात आग म्हणजे पोटात जळजळणे अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. पोटात आग पडणे अशा समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांना कोणतेही काम करण्यास ऊर्जा राहत नाही. त्याचबरोबर त्याच्या वेदना ही असाह्य होतात आणि त्यांना माहित हि नसते कि पोटात आग पडण्याची कारणे आहेत तरी काय ?

बाहेरचे कुठली गोष्ट खाल्ल्यामुळे किंवा अवेळी झालेल्या जेवणामुळे पोटात आग होणे अशा समस्या उद्भवू शकतात. यामध्ये मुख्यतः अतिप्रमाणात मसालेदार किंवा तिखट असे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात आग होण्याची समस्या निर्माण होते. जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तरीसुद्धा पोटात आग पडणे चे समस्या निर्माण होऊ शकते.

त्याचबरोबर शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळेसुद्धा पोटात आग पडणे किंवा जळजळ होणे अशा समस्या निर्माण होतात. अशा समस्यांमुळे आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळी कामे जी आपण सहज रित्या करू शकतो ती काम करण्यास आपल्याला खूप अडचणी निर्माण होतात.

पोटात आग पडणे याचे मुख्य कारण म्हणजे अपचन. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचे जास्त किंवा अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास होतो. त्याचबरोबर आपल्या पोटात आग पडणे अशा समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे आपली अन्नप्रक्रिया बिघडते.

आपण खाल्लेल्या कोणत्याही जास्त प्रमाणात तिखट पदार्थमुळे सुद्धा आपल्याला पोटात आग पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते. आणि ह्या ऍसिडिटी चे प्रमाण जर अधिक वाढले तर आपल्याला जळजळणे किंवा पोटात आग पडल्यासारखे वाटते.

पोटात आग पडण्याची कारणे :-

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पोटात आग पडण्याचे मुख्य कारणे कोणती? आणि त्याचबरोबर त्याचे प्रभावशाली व घरगुती उपाय कोणते ? चला तर मग बघूया !

१. मसालेदार पदार्थांमुळे :-

अनेकदा आपल्याला पोटात आग पडण्याचे मुख्य कारण हे मसालेदार पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे होते. कारण मसालेदार पदार्थांमुळे आपल्या शरीरातील ऍसिडिटी वाढण्यास सुरुवात होते व त्यामुळे आपल्याला पोटात आग होणे अशा समस्या निर्माण होतात.

२. अतिप्रमाणात ऍसिडिटी होणे :-

पोटात आग पडणे याचे आणखी एक कारण म्हणजे अति प्रमाणात ऍसिडिटी होणे झाल्यामुळे आपल्या छातीत जळजळ होऊ लागते व ही जळजळ अतिप्रमाणात झाल्यामुळे आपल्याला पोटात आग पडल्यासारखे वाटते. आणि ह्या ऍसिडिटी वर वेळेस उपचार केला नाही तर आपल्याला आग पडण्याची समस्या अधिक वाढू शकते.

३. अपचन होणे :-

बरेचदा अवेळी जेवण केल्यामुळे किंवा बाहेरच्या कोणते फास्ट फूड पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला अपचनाचा त्रास होऊ लागतो. या होणाऱ्या अपचनामुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटीचा प्रमाण वाढू लागतो. पण त्यामुळे पोटात आग पडणे अशा समस्या निर्माण होतात.

पोटात आग पडणे यावर उपाय :-

वरील प्रमाणे आपण बघितले की कोण कोणत्या कारणामुळे आपल्या पोटात आग पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात ? त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत पोटात आग पडणे थांबवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय केले जाऊ शकतात?

● गुळ खाऊन बघा :-

पोटातील आग पडणे थांबवण्यासाठी गुळ खाणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. गुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. रोज सकाळी उपाशी पोटी गुळाचा एक खडा चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या. असे जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केले तर तुमची पोटात आग पडणे या समस्या पासून सुटका मिळू शकते. कारण की गुळ हे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. त्याचबरोबर पोटात आग पडणे ह्या सारख्या होणारे त्रास थांबवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो.

● आलं वापरून बघा :-

आपला आयुर्वेदानुसार आलं हे वेगवेगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी उत्कृष्ट असा पर्याय आहे. आलं हे आपल्या पोटातील उष्णता कमी करते. त्याचबरोबर पोटात किंवा छातीत होणारी जळजळ थांबवण्यासाठी आलं मदतगार ठरते. रोज सकाळी थोडसं आल्याचा रस जर तुम्ही पिला तर तुम्हाला पोटात आग पडणे अशा समस्या होणार नाही.

● ओवा खाऊन बघा :-

ओवा यामध्ये थायमाॅल हा पदार्थ अति प्रमाणात असतो. हे आपल्या शरीरात होणारे जळजळ आणि ऍसिडिटी थांबवण्यास मदत करतो. थोडासा ओवा तव्यावर गरम करा आणि त्यात थोडेसे काळ मीठ मिसळा नंतर त्याची पावडर तयार करून घ्या. ही पावडर थोड्या कोमट पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. हे केल्यामुळे तुम्हाला पोटात आग पडणे या समस्यांपासून आराम मिळेल.

● बडीशेप वापरा :-

रोज रात्री जेवण झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी बडीशोप खावी. यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत मिळते. त्याचबरोबर बडीशेप मुळे आपल्याला पोट फुगणे, पोटात गॅस निर्माण होणे अशा समस्या होत नाही. पोटात आग पडणे यापासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल रोज रात्री गरम पाण्यात एक चमचा बडीशेप टाका व रात्रभर ती तशीच राहू द्या. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ते पाणी गाळून घेऊन ते पाणी प्यावे असे केल्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि पोटात आग होणे अशा समस्या उद्भवणार नाही.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल तर आपण आज बघितले पोटात आग पडण्याची कारणे कोणती? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


3 responses to “पोटात आग पडण्याची कारणे आणि उपाय नक्की जाणून घ्या”

  1. उजवीकडची छाती व पोट गरम जडते या वर उपाय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *