पाठीत चमक भरणे या समस्येवर घरगुती उपाय जाणून घ्या

पाठीत चमक भरणे

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण विविध कामे करत असताना आपल्या शरीराकडे फारसे लक्ष देत नाहीत व आपण आपल्या कामात फार गुंतलेले असतो, शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्याला विविध समस्यांचा किंवा आजारांना सामोरे जावे लागू शकते ज्यामुळे आपल्याला भविष्यात त्याचा त्रास देखील होऊ शकतो.

या विविध समस्या मधील एक महत्त्वाची समस्या ही प्रत्येकाला उद्भवते ती पाठीत अचानक चमक भरणे यालाच पाठ जखडणे असे देखील म्हटले जाते, अचानक पण पाठीवर अतिप्रमाणात दबाव आल्यामुळे किंवा तेथील स्नायूंवर अतिप्रमाणात ताण आल्यामुळे पाठीत चमक भरणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते.

पाठीत चमक या समस्येशी निगडित विविध कारणे असू शकतात काम करताना व्यवस्थित रित्या खुर्चीवर किंवा सोफ्यावर नीट न बसणे त्याच बरोबर जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्यामुळे देखील पाठीवर तणाव निर्माण होतो, ज्यामुळे पाठीत चमक येणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात या समस्येपासून आराम मिळण्यासाठी बरेच काही लोक विविध क्रीमचा वापर करत असतात.

त्याचबरोबर चे विविध पेन-किलर्स देखील वापर करत असतात, पण वरील या सर्व गोष्टींमुळे त्यांना फक्त थोडा वेळ किंवा थोडा कालावधीसाठी त्यांना आराम मिळतो त्याच्या नंतर हा त्रास पुन्हा त्यांना उद्भवतो, जर तुम्हाला पाठीत चमक येण्याच्या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही विविध घरगुती उपाय यांचा वापर करून या समस्येपासून आराम मिळवू शकतात.

पाठीत चमक भरणे या समस्येवर घरगुती उपाय :-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पाठीत चमक या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आपण कोणकोणते विविध घरगुती उपाय करू शकतो ? तर मग बघुया !

● दररोज पाठीचा व्यायाम करावा :-

पाठीत चमक भरणे ही समस्या अधिक तर तरुण पिढी तील लोकांना व त्याचबरोबर वृद्ध लोकांना उद्भवू शकतात किंवा उद्भवते या समस्येवर आराम मिळण्यासाठी ते विविध उपाय करून बघतात, पण त्या उपायांचा काही पुरेसा प्रमाणात फरक पडत नाही व त्यांना पाठीत चमक भरणे या समस्येच्या खूप वेदना जाणवतात.

जर तुम्हाला सुद्धा पाठीत चमक भरणे या समस्येवर आरामदायी उपाय हवा असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय करू शकतात दररोज तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं पाठीचा व्यायाम करावा पाठीचा व्यायाम केल्यामुळे पाठीच्या स्नायूंवर आलेला कोणताही ताण तणाव नाहीसा होण्यास त्यांना मदत मिळू शकते व त्याचबरोबर मास पेशी देखील रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकेल जेणे करून पाठीत चमक भरणे ही समस्या आपल्याला उद्भवणार नाही.
त्यामुळे जर तुम्ही दररोज या पाठीच्या व्यायाम जर तुम्ही केला,तर तुम्हाला त्याचे बहुमूल्य फायदे जाणून शकतात व त्याच बरोबर पाठीत चमक भरत असेल तर ही समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.

● पाठीला तेलाने मालिश करून बघा :-

पाठीत चमक भरणे ही समस्या भरपूर लोकांना अनुभवत असते या समस्येपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही वरील उपाय याचा वापर देखील करू शकतात गाठीतील स्नायूंवर अधिक प्रमाणात ताण आल्यामुळे पाठीत चमक भरणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते, ह्या समस्येवर तुम्ही दररोज पाठीचा व्यायाम देखील करू शकतात.

पण जर व्यायाम करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही व पायाचा वापर देखील करू शकतात आपल्या पाठीवर म्हणजेच स्नायूंवर आलेला ताण कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या पाठीला तेलाने मालिश करुन बघावी.

पाठीला तेलाने मालिश केल्यामुळे तेथील मांसपेशी व स्नायू रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते जेणे करून आपल्याला पुन्हा पाठीत चमक भरणे ही समस्या उद्भवणार नाही व त्याच बरोबर पाठीत चमक भरली असेल तर या समस्येपासून आराम मिळण्यास देखील आपल्याला मदत मिळू शकते.

● बसताना पाठीला आधार मिळेल असे बसावे :-

पाठीत चमक भरणे या समस्येचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्थित रित्या बसतांना पाठीला आधार न मिळाल्यामुळे व त्याचबरोबर पाठीवर तणाव आल्यामुळे पाठीत चमक भरणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात, त्यामुळे आपण बसताना पाठीला आधार मिळेल असे बसावे व त्याच बरोबर आपल्याला जेवढे कम्फर्टेबल होईल तेवढे कम्फर्टेबल होऊन बसावे जेणे करून पाठिवर कोणताही प्रमाणात दबाव येणार नाही व आपल्याला पाठीत चमक भरणे ही समस्या उद्भवणार.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की पाठीत चमक भरणे या समस्येवर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल, तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


2 responses to “पाठीत चमक भरणे या समस्येवर घरगुती उपाय जाणून घ्या”

  1. मागील 15 दिवस झाले मला पाठीत शोल्डर मध्ये चमक आहे , खूप त्रास आहे , सतत दुखत असते , 4 डॉक्टर जवळ गेलो पण काहीच फरक नाहो , माणीचा फोटो काढला असता मनक्यमध्ये ग्याप सांगत आहे , औषधी घेतली पण काहीच फरक नाहो , झोपता , जेवण , बसता ही येत नाही , 24 घण्ये लगातार दुखत असते , काय करावे काही सुचत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *