पेनकिलर गोळ्या जास्त का घेऊ नये ? त्याचे फायदे व नुकसान

पेनकिलर गोळ्या

आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोणतीही वेदना झाली तर लगेच पेनकिलर गोळ्या घेण्याची सवय असते. बऱ्याच वेळा वेगवेगळे काम करून आपले मानवी शरीर थकते, अति प्रमाणात काम केल्यामुळे आपल्याला डोकेदुखी, अंगदुखी असे वेगळे त्रास होऊ लागतात.

काही लोकांना तर पेनकिलर गोळ्या दररोज घेण्याची सवय लागली आहे. पण ही सवय अजिबात चांगली नाही आहे, कारण अतिप्रमाणात पेनकिलर चे सेवन केल्याने आपल्या शरीराला वेगवेगळ्या आजारांचा धोका होऊ शकतो. त्याचबरोबर अति प्रमाणात पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केले तर ते आपल्या शरीरास हानिकारक ठरू शकते.

अतिप्रमाणात पेनकिलर घेण्याचे आपल्या शरीराला वेगवेगळे नुकसान होऊ शकतात. पेनकिलरच्या गोळ्या मुख्य म्हणजे जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीचा अतिप्रमाणात त्रास होत असेल तेव्हाच घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुद्धा अति प्रमाणात पेनकिलर गोळ्यांचे सेवन करणे आपल्या शरीरास नुकसानदायक ठरू शकते.

पेनकिलर घेतल्यामुळे आपल्या वेदनांना तात्पुरता आराम मिळतो आणि हा आराम मिळण्यासाठी अनेक लोक पेनकिलर चा अतिप्रमाणात वापर करतात. जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्यामुळे याच आराम देणाऱ्या गोळ्या आपल्या शरीराला घातक ठरू शकतात.

एका रिसर्च नुसार अतिप्रमाणात पेनकिलर घेतल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. जास्त प्रमाणात पेनकिलर गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आपल्या वेगवेगळे साईड इफेक्ट होऊ शकतो. पेनकिलर घेतल्यामुळे अतिप्रमाणात आपल्याला हृदयाच्या संबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते.

पेनकिलरच्या गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा जर तुम्ही पेनकिलर घेत असाल तर ती अतिप्रमाणात घेऊ नये. पेनकिलरच्या अतिसेवनामुळे तुम्हाला किडनीचा देखील त्रास होऊ शकतो, काही लोकं थोडासा थकवा किंवा थोडीशी डोकेदुखी जाणवली तर लगेच पेन किलरचा वापर करतात.

पेनकिलर गोळी आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी अनेक फायदे सुद्धा आहेत. पेनकिलरमुळे आपल्याला होणाऱ्या अनेक वेदनांना आराम मिळू शकतो.

पेनकिलर घेतल्यामुळे शरीराला होणारे फायदे :-

जर तुम्ही डोकेदुखी झाल्यावर अतिप्रमाणात पेनकिलर घेत असाल तर तुम्हाला उलटी त्याचबरोबर वेगवेगळे आजार होऊ शकतात. मित्रांनो आज आपण बघणार आहोत पेनकिलर गोळ्या मुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात ? पेनकिलर गोळ्या यांचे अतिसेवन केल्यामुळे किंवा अति वापर केल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणते नुकसान होऊ शकतात ? चला तर मग बघूया!

कंबरदुखी थांबवते :-

जर तुम्हाला अतिप्रमाणात कंबरदुखी होत असेल किंवा कोणतेही काम करताना तुम्हाला कमरेचा त्रास होत असेल तर तुम्ही एक पेन किलरची गोळी घेऊन तुमची कंबर दुखी थांबवू शकतात.

डोकेदुखी थांबवण्यास मदत करते :-

अनेक वेळा इतर कामांचा तणावामुळे आपल्याला डोकेदुखी अशा वेगवेगळ्या समस्यांचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला या त्रासापासून सुटका हवी असेल, तर तुम्ही एक पेनकिलरची गोळी घेतल्यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो.

अंगदुखी थांबवते :-

जर तुम्हाला अति काम करून थकवा जर आला असेल व तुमच्या अंगदुखत असेल तर तुम्ही पेनकिलर गोळी चा वापर करू शकतात, पेनकिलर घेतल्यामुळे तुमचे अंगदुखी पासून तुम्हाला आराम भेटू शकतो.

गुडघेदुखी दूर करते :-

तुम्हाला गुडघेदुखी सारखा त्रास होत असेल तर तुम्ही पेन-किलर्स वापर करू शकतात. पेन किलर घेतल्यामुळे तुमचे गुडघे दुखणे थांबण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

पेनकिलर मुळे होणारे नुकसान :-

वरील भागात आपण बघितले पेन किलर घेतल्यामुळे आपल्याला शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात. पण त्याचबरोबर आपल्याला काही नुकसान होऊ शकतात ते नुकसान आता आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

१. एकाग्रता कमी होते :-

तुम्ही जर पेनकिलर गोळ्यांचे अतिप्रमाणात वापर किंवा सेवन करत असाल तर त्यामुळे आपली एकाग्रता कमी होऊ शकते. कोणतेही काम करण्यात आपले मन लागत नाही आणि कोणतीही गोष्ट एकाग्रपणे पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अति प्रमाणात पेनकिलर घेणे टाळावे.

२. अशक्तपणा येणे :-

अतिप्रमाणात पेन किलर गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किंवा त्यांचा वापर केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवू शकतो. आपल्या शरीरात कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा राहत नाही व त्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो.

३. त्वचा काळी पडू शकते :-

जर तुम्हाला आपली त्वचा काळी पडू नये असे जर वाटत असेल तर पेनकिलर अतिप्रमाणात घेणे टाळावे. अतिप्रमाणात घेतल्यामुळे त्याचा त्रास होतो व त्याचा परिणाम आपल्या दिसून येऊ शकतो. त्वचा कोरडी व काळी पडायला सुरुवात होते. त्यामुळे पेनकिलर चा अति वापर करू नये.

४. श्वास घेताना त्रास होतो :-

अतिप्रमाणात आपण आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या श्वास घेण्याची गती कमी होऊ शकते व त्यामुळे आपल्या फुफ्फुसे सुद्धा मंदावते. त्यामुळे अतिप्रमाणात पेनकिलर गोळ्या घेऊन नये.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले पेनकिलर घेतल्यामुळे आपल्याला कोण कोणते फायदे होतात? त्याचबरोबर प्रमाणात पेनकिलर घेतल्यामुळे आपल्या शरीरात कोणकोणते नुकसान होऊ शकतात ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *