नाकातून रक्त येणे कारणे आणि उपाय जाणून घ्या

आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रियपैकी अत्यंत महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक. ह्या ज्ञानेंद्रियामूळे आपल्याला वेगवेगळी महत्त्वाची कामे करता येतात. नाकामुळे आपण श्वास घेऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थांचा वेगवेगळ्या सुगंधाचा आपण वास किंवा गंध घेऊ शकतो. जर तुमच्या नाकातून सतत रक्त येत असेल तर आपल्याला श्वास घ्यायला अडथळा येतो किंवा त्रास होतो. त्याच बरोबर वेगवेगळ्या गोष्टींचा श्वास घेण्यासाठी किंवा गंध घेण्यासाठी आपल्याला त्रास होतो. नाकातून रक्त येऊ लागल्यामुळे आपल्याला पुरेसा ऑक्सीजन घेता येत नाही. आज आपण नाकातून रक्त येणे कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.

नाकातून रक्त येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. कधी नाकातून रक्त येऊ लागल्यामुळे आपल्याला डोकेदुखी सारखे समस्या सुद्धा उद्भवतात. नाकातून रक्त हे सर्दी झाल्यामुळे सुद्धा येऊ शकते. अनेक वेळा शिंकताना किंवा नाक पुसताना आपल्या नाकामध्ये असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या यांना इजा होते. त्यामुळे नाकातून रक्त येणे अशा समस्या निर्माण होतात.

नाकाला कोणतेही झालेल्या इजेमुळे सुद्धा आपल्या नाकातून रक्त येणे अशा समस्या आपल्याला उद्धवू किंवा निर्माण होऊ शकतात. नाकातून अतिप्रमाणात सतत रक्त येत असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यावा.

नाकातून रक्त येण्याची कारणे :-

आज आपण बघणार आहोत नाकातून रक्त येण्याची कारणे कोणकोणते आहेत? आणि त्याचबरोबर नाकातून रक्त येऊ नये यासाठी कोणते घरगुती उपाय करावे? चला तर मग बघुया!

१. कोरडी हवा :-

अनेक वेळा आपल्या शरीराला वेगवेगळ्या होणारे तापमानातील बदल किंवा हवेमधील बदल सहन होत नाही. त्यामुळे आपल्याला नाकातून रक्त येणे अशा समस्या निर्माण होतात. कोरडी हवा हे नाकातून रक्त येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. कोरडी हवा ही नाकातून रक्त येणे अशा समस्या निर्माण करू शकते.

२. धुळीची ऍलर्जी असणे :-

अनेक वेळा लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची ऍलर्जी असते. त्यामधील काही लोकांना धुळीची ऍलर्जी असते. म्हणजे त्या लोकांना अजिबात सहन होत नाही व त्यामुळे त्यांना वारंवार सर्दी होणे किंवा शिंका येणे अशा समस्या निर्माण होतात. धुळीची ऍलर्जी असणे या कारणामुळे सुद्धा नाकातून रक्त येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक वेळा हवेमध्ये झालेल्या वेगवेगळ्या बदलांमुळे हवेमध्ये प्रदूषणाचे होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्याला नाकातून रक्त येणे अशा समस्या निर्माण होतात.

३. नाकाला इजा होणे :-

नाकातून रक्त येणे या समस्या चे अजून एक मुख्य कारण म्हणजे नाकाला इजा होणे हे असू शकते. कारण नाकाला झालेल्या कोणत्याही इजेमुळे आपल्याला नाकातून रक्त येत आहे अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कधीतरी नाकाला जोरदार धक्का बसल्यामुळे नाकाला इजा होते. या इजेमुळे सुद्धा नाकातून रक्त येणे अशा समस्या आपल्याला वारंवार निर्माण होतात. त्यामुळे नाकाला इजा होणे किंवा जखम होणे हे रक्त येण्याचे कारण आहे.

नाकातून रक्त येऊ नये यासाठी घरगुती उपाय :-

● कांद्याचा दर्प लावून ठेवा :-

जर तुम्हाला यावरील कोणत्याही कारणामुळे तुमच्या नाकातून रक्त येत असेल अशा समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही त्वरित कांद्याचा दर्प त्या ठिकाणी लावून ठेवावा. त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर ते बंद होईल. कांद्यामध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येण्याची समस्यां पारवार उद्भवत असेल तुम्हाला कांदा मदतगार ठरू शकतो. कांद्याचा दर्प नाकातून रक्त येत आहे त्या ठिकाणी धरून ठेवा. यामुळे तुमच्या नाकातून रक्त थांबल्यास तुम्हाला मदत मिळेल.

● बर्फाने शेक द्या :-

तुमच्या नाकातून रक्त अशा समस्या जर वारंवार होत असेल तर तुम्ही बर्फाने नाकातून रक्त येते त्याठिकाणी बर्फाने शेक द्यावा. बर्फामुळे तुमच्या नाकातून येणारे रक्त थांबण्यास तुम्हाला मदत मिळेल. कारण बर्फामुळे तुम्हाला झालेले नाकात कोणतीही झालेली इजा व त्याची सूज घालवण्यासाठी बर्फ तुम्हाला मदत करेल. त्यामुळे जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर त्याठिकाणी बर्फाने शेक द्यावा. असे केल्याने तुमचे नाकातून रक्त येणे बंद होण्यास तुम्हाला मदत मिळेल.

● बेलाच्या पानाचा रस प्यावा :-

जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर तुम्ही बेलाच्या पानांचा रस द्यावा. या बेलाच्या पानांमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. आयुर्वेदानुसार बेलाचे पान वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे असे दर्शविले आहे. बेलाची दोन-तीन पाने घेऊन ती पाने गरम पाण्यात चांगली उकळून घ्यावी आणि नंतर हे पाणी गाळून घेऊन या पाण्याचे दिवसातून दोन वेळा सेवन करावे. असे पाच ते दहा दिवस केल्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे अशा समस्या पासून तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळू शकते.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले नाकातून रक्त येण्याची कारणे कोणती ? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? तसेच जर तुमच्या नाकातून येणार रक्त थांबत नसेल तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Leave a comment