आपण नेहमी आरोग्य बद्दल घरगुती उपाय शोधात असतो पण त्यात आपण फक्त आपले शारीरिक आरोग्य बघतो, पण मानसिक आरोग्याचे काय ? आज काल खूप लोक अशे आहेत जे काही न काही मानसिक तणाव मुले त्रस्त आहे. कोणीही मानसिक ताण तणाव चा घरगुती उपाय नाही शोधात, आणि हे अगदी अयोग्य आहे. आपल्याला जीवनात काहीही करायचे असेल तर सुरुवाती ला आपल्या मनाची तयारी असणे आवश्यक असते. पण मन च तयार नसेल तर कोणते हि काम होणे अगदी अशक्यच असते.
आज कालच्या घाई गडबडीत या जगात आपण मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो. शारीरिक स्वास्थ तर सगळ्यांना दिसून येते पण मानसिक स्वास्थ्य लवकर दिसून येत नाही अथवा लवकर आढळत नाही आणि काही लोकांना तर कळतच नाही की आपण मानसिक तणावाला सामोरे जात आहोत.
तर काही लोकांना कळत नाही की आपण दिवसेंदिवस डिप्रेशनचा शिकार होत आहे. जर माणसाचे मानसिक स्वास्थ चांगला नाही आहे तर तो बाकीची कामावर कशा करू शकेल. आपल्या डोक्यामध्ये एक रसायन असते ते जर जास्त झाले, तर आपण डिप्रेशनचे शिकार होतो.
मानसिक स्वास्थ खराब होण्याचे खूप सारे कारणे असू शकतात :
जसे कि –
- प्रसंगी जीवनातला तणाव
- पारिवारिक तणाव
- समाजातील मतभेद
- सांस्कृतिक मतभेद
- जास्त कामाचा तणाव
इत्यादी मानसिक स्वास्थ बिघडण्याचे कारणे असू शकतात. लोकांना मानसिक स्वास्थ्य नीट नसल्यामुळे खूप सारे आजार होतात, जसे की –
- एका माणसाला खूप लोक त्याच्या आजूबाजूला दिसतात पण हे फक्त त्याची कल्पना असते कारण की खरं खरं तर ती लोकं आजूबाजूला नसतातच याला आपण आभास असे म्हणतो किंवा हॅलोजन असे म्हणतो.
- तर काही लोकांना सतत असे वाटते कि कोणीतरी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे.
- तसेच जर कुठल्या मुलाने लहानपणी जर काही वाईट प्रसंग किंवा चित्र बघितले असेल, तर त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते ती कालांतराने भीती वाढत जाते व त्याचे कोणत्या कामामध्ये लक्ष लागत नाही.
- कोणी खूप सार्या वस्तूंना काम नसताना घाबरतो, त्याला आपण फोबिया असे म्हणतो.
अशावेळी आपल्याला एका चिकित्सक म्हणजेच डॉक्टरची गरज असते म्हणजेच एका सोक्रेटीस ची गरज असते. जेणेकरून आपले उपचार नीट प्रकारे होऊन आपण लवकर बरे होऊन व आपले कामे व्यवस्थित रित्या पार पाडू. पण जर का डॉक्टर उपलब्ध नसेल तर आपण आपल्या परीने ही काही उपाय करू शकतो बरे होऊ शकतो.
मानसिक तणाव पासून दूर राहण्याचे सोपे उपाय :
- सर्वात पहिले तर आपण सकारात्मक विचार केला पाहिजे, खूप सारे आजार हे सकारात्मक विचार केल्यास बरे होतात.
- आपण लोकांशी संवाद साधला पाहिजे आपण लोकांशी मैत्री केली पाहिजे त्याच्याशी आपले विचार मांडले पाहिजे. जेणेकरून आपल्या समस्याचे आपल्या मनात न्यूनगंड राहणार नाही.
- नेहमी दुसर्यांचे चांगले होईल हवे असा स्वभाव ठेवा, आपले चांगले होताना दिसेल. कधी कोण बद्दल वाएत विचार करू नका.
- देवावर विश्वास ठेवा. नक्की सर्व चांगले होईल असा विश्वास ठेवा.
- आपण मित्र-मैत्रीण बनवले पाहिजे व त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला पाहिजे.
- तसेच आपण नवीन नवीन वस्तू व कामे शिकत राहिली पाहिजे जेणेकरून आपले मन त्यामध्ये रमेल.
- मानसिक स्वास्थ्य नीट नसल्यामुळे आपले जेवणाकडे दुर्लक्ष होते ते न करता आपण जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे व जेवण व आहारावर पण नियंत्रण राहायला हवे.
- आपल्या मनात काही भीती काही शंका असतील त्या तर डॉक्टरला मोकळेपणाने विचारले पाहिजे. अशा लोकांसोबत वेळ घालवा त्यांच्याशी बोलून तुम्हाला चांगले वाटते.
- आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे.
- हवे तेवढे शांत राहिले पाहिजे.
- प्रत्येक काम किंवा अडचण इकडे शांत विचार करून त्या सोडवला पाहिजे तसेच मानसिक स्वास्थ हे दूर होण्यासाठी मानसिक स्वास्थ्य दिवस साजरा केला जातो.
- जर तुम्हाला कामा मध्ये ताण तणाव असेल तर तुम्ही काही दिवस सुट्टी काढून गावी शेती मध्ये निसर्गरम्य ठिकाणी काही दिवस फिरून यायला हवे.
- रात्री शांत झोप घेणे फायदेशीर आहे , त्या साठी रात्री झोपताना तुम्ही दुध हळद घेऊ शकतात किवा दुधासोबत अश्वगंधा चूर्ण घेऊ शकता.
मानसिक स्वास्थ खराब होणे हा कोणत्या प्रकारचा आजार नाही. हा ही बरा होऊ शकतो फक्त मनाची तयारी पाहिजे तसेच डॉक्टरांचे उपचार वेळोवेळी घेतले पाहिजे. अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या पेज सोबत जुळून रहा. धन्यवाद.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.