माझी मान दुखत आहे, इकडे – तिकडे वळवता ही येत नाही, मी काय करू, बाई ग, आई ग, अशा अनेक जणांच्या तक्रारी असतात. मान दुखी चे अनेक कारणे आहेत जसे कि तासंतास मोबाईल घेऊन बसणे, तसेच कॉम्प्युटर वर जास्त वेळ बसणे, जास्ती वेळ ऑनलाइन क्लासेस करणे, लॅपटॉप वर बसून काम करणे, तसेच व्यवस्थित न झोपणे, जास्त उंच उशीचा वापर करणे, जर तुम्ही जास्त उंच उशीचा वापर करत असाल, तर तुमची मान ही भरून जाते. तसेच अवजड वस्तू उचलणे, कधीकधी चुकीच्या पद्धतीने व्यायामाचा केल्याने, व्यवस्थित व्यायाम न केल्याने ही मान दुखी चा त्रास होऊ शकतो. तर कधी कधी तुम्ही प्रवास करताना, तुम्हाला झोपेची डूलकी लागल्यावर अचानक गाडीचा ब्रेक लागल्याने, झोपायच्या धुंदीत तुमच्या मानेला लचका बसून तुमची मान भरवते. अशी अनेक कारणे मान दुखीचे आहेत. त्यासाठी मान दुखी साठी काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
मान दुखी साठी काही घरगुती उपाय :
ज्या वेळी आपली मान दुखते, त्या वेळी आपले कोणत्याही कामात चित्त लागत नाही, मन लागत नाही, सारखं लक्ष आपल्या माने कडे राहते, आपल्याला मान सरळ ठेवता येत नाही, किंवा फिरवता येत नाही. तिरकस बघता येत नाही, अशा समस्यांना आपल्याला मान दुखल्यावर तोंड द्यावे लागते. मग त्यासाठी काही घरगुती उपचार आहेत का ? असेल तर ते कोणकोणते ?
चला तर मग जाणून घेऊया कि मान दुखी साठी काही घरगुती उपचार !
बर्फाचा वापर करून बघा :
हो, खरंच बर्फाचा वापर हा मान दुखी साठी फायद्याचा ठरू शकतो. जर तुम्हाला मान दुखीचा त्रास अधिक होत असेल, त्वरीत तुम्हाला आरामाची गरज असेल, तर तुम्ही बर्फाचा उपयोग करु शकतात. त्यासाठी तुम्ही पालथे पडून, बर्फ हा कॉटनच्या कपड्यांमध्ये घेऊन तुमच्या मानेवर ठेवा.
बर्फ हा जरी थंड असेल, तरी त्याच्यात उष्णताही असतेच. तो तुमच्या मानेतील दुखीवर त्वरित मिळवून देऊ शकतो. बर्फ ला हा चायनीज थेरेपी मध्ये वापरला जातो, ही थेरपी तुम्ही तुमच्या मानदुखीवर करू शकतात. त्याने तुम्हाला आराम मिळेल, तुम्ही हा उपाय करून बघण्यासारखा आहे, करून बघा.
तेलाने मानेचा मसाज करून बघा :
कोणत्याही दुखीवर तेलाने मसाज केल्याने फरक पडतो, फक्त मसाज हा व्यवस्थित पद्धतीने केला पाहिजे, मान दुखी च्या समस्येवर जर तुम्ही मसाज केला, तर तुम्हाला भरपूर आराम मिळेल. कोणत्याही आयुर्वेदिक तेलाने जर तुम्ही मसाज केला, तर तुमच्या नसांना आराम मिळतो. जर तुम्हाला हा मसाज घरी जमत नसेल, तर तुम्ही थेरपीची मदत घ्या आणि मसाज करा. त्याने तुम्हाला लवकरच मान दुखीवर आराम मिळेल हा उपाय करून बघा.
तुम्ही हीटिंग पॅड म्हणजेच गरम पाण्याच्या पिशवीने तुमची मानेवर शेकून बघा :
जर तुमच्या मानेच्या दुखी आणि तुम्ही त्रस्त असाल, तसेच कोणतेही स्नायूंचे दुखणे यावर तुम्ही त्रस्त असाल, तर हीटिंग पॅड ही अशी गोष्ट आहे, ज्याने तुम्हाला त्वरित आराम मिळतो. त्यासाठी तुम्ही हीटिंग पॅड घेऊन त्यात गरम पाणी टाकून ती पिशवी तुमच्या मानेवर ठेवा. त्याने हळू शेकुन घ्या फक्त त्याची तुम्ही थोडी सावधानी घ्यावी, तिचे झाकण एकदम पॅक असावे. असे एक ते दोन दिवस शेकले की तुमच्या मान दुखी वर आराम मिळेल. तसेच तसेच कोणतेही स्नायूंमध्ये दुखी असेल, तर तुम्ही या पिशवीचा वापर करू शकतात.
तुम्ही मानेचे व्यायाम करून बघा :
व्यायाम हा सगळ्या उपचारांवर रामबाण उपाय आहे. जर तुम्ही एकाच जागेवर बसून तुमची मान व खांदे दुखत असतील, त्यावेळी तुम्ही मान ही डावी कडे वळवावी, हनुवटीच्या डाव्या खांद्याच्या दिशेने वळावे, ती खांद्याच्या रेषेत सरळ आणण्याचा प्रयत्न करावा. मग तुम्ही अशा स्थितीत हळूहळू पूर्ण श्वास घेण्याचा प्रयत्न करून सोडावा, क्रिया उजवीकडे ही करावी.
दोन्ही बाजूंनी मान वळवने, त्यावर तुमच्या मानदुखीवर आराम मिळेल. तसेच तुम्हाला जास्त वेळ बसून चे जर काम करावे लागत असेल तर तुम्ही तिथेच खुर्चीवर बसून खांद्याला कानाजवळ नेऊन आणि दीर्घ श्वास घ्या, असे तुम्ही दहा ते बारा वेळा बसल्याबसल्या व्यायाम करू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
तसेच तुम्ही तुमची मान पूर्ण गोल वर फिरवू शकतात, त्याने तुम्हाला आराम मिळेल. थोडी दुखेल पण हळू मानेच्या नसा मोकळ्या होतील. तसेच जर तुम्हाला जास्त तीन ते चार महिने मान दुखी चा त्रास होत असेल, तर तुम्ही त्वरित तज्ञांच्या मदतीने उपचार घ्यावे.
तुम्ही पुरेशी झोप घ्यायला हवी :
पुरेशी झोप ही आपल्या आरोग्याचे वरदान आहे. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला मान दुखी सारख्या चिडचिड अशा अनेक शारीरिक तक्रारी होऊ शकतात. मानदुखी च्या कारणांमुळे तुमच्या शरीरावर आलेला असतो. तर तुम्ही जर पुरेशी झोप घेतली, तर तो कमी होईल. कमीत कमी तुम्ही सात ते आठ तास तुमच्या शरिराला झोप घ्यायला हवी. त्यामुळे तुमची तब्बेत, प्रकृती एकदम सुधारली जाईल. झोपताना तुम्ही मानेखाली एकदम नरम अशी कमी उंचीची उशी घ्यावी, ही काळजी घ्यावी.
तुम्ही मेंथॉल आणि कापूर चा वापर करू शकतात :
मान दुखी च्या आजारावर काही उपचार हे घरीही करता येतात. त्यासाठी तुम्ही मेंथॉल आणि कापूर याचा उपाय करू शकतात, यासाठी तुम्ही ते दोघं समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण करून बोटांनी तुमच्या मानेच्या दुखीवर चोळून, त्या भागातला तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होऊन, तुमची मानदुखी ची समस्या कमी होईल. हा उपचार तुम्ही एखाद्या घरगुती डॉक्टराला, विचारून घरी करू शकतात.
होमिओपॅथीचे उपाय करून बघा :
मान दुखी मध्ये होमिओपॅथी फायदेशीर असते. त्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक केमिस्टकडे जाऊन होमिओपॅथी उपचार करा. त्याने तुमच्या मान दुखी चे समस्यांवर लवकर आराम मिळेल.
आज आम्ही तुम्हाला मानदुखी वरील काही घरगुती उपचार कोणते कोणते करावे, ते सांगितलेले आहेत. तसेच मान दुखीचा त्रास तुम्हाला पंधरा दिवसाच्या वर असेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडून त्याचा उपचार करावा, तसेच कोणताही मसाज तुम्ही कोणाकडूनही न करून घेता तज्ञांकडून करून घ्यावा, कारण मसाज करताना खूप काळजी घ्यावी लागते, तसेच आम्ही सांगितले घरगुती उपचारांमध्ये जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.
धन्यवाद
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.