मळमळ होत आहे का ? यावर काही घरगुती उपचार जाऊन घेऊया

मळमळ होतेय

अगं बाई, अरे यार, मला कसतरी वाटते, उलटी सारखं होतंय, मळमळ होते, नको मला नाही खायचे, असे अनेक जणांना होत असते, असे केव्हा होते, तर तुमच्या पचन संस्थेत जठराग्नी आपली क्रिया मंदावली, तर आपल्या शरीरातील अन्न बाहेर टाकण्याची क्रिया होते, पण जठरातील अन्न बाहेर टाकण्याची क्रियास जर अडथळा आला, तर आपल्याला उलटी सारखे होते. त्यालाच मळमळ होणे असे म्हणतात. आता मळमळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की अपचन, पोटात बिघाड, पित्ताचा त्रास असल्याने, मानसिक ताण, गर्भवती होणे, पोटात जड वाटणे, अपूर्ण झोप, डोकेदुखी, तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी अनेक जणांना मळमळ होते, प्रवास करतानाही अनेक जण होते, तिव्र डोकेदुखी अशी अनेक कारणे आहेत. ज्या लोकांना सारखे सारखेच मळमळणे होत असेल, तर त्यांना पोटाशी निगडित काही आजाराचे समस्या होऊ शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला मळमळ होणे, यावर काही घरगुती उपचार सांगणार आहोत. तसेच तुम्हाला मळमळणे होण्याचा अधिक त्रास होत असेल, तर तुम्ही जरूर डॉक्टरांना दाखवा. 

मळमळ होत असल्यास काय करावे ?

चला, तर आज आम्ही तुम्हाला मळमळ होण्यावर काही घरगुती उपचार सांगणार आहोत. 

मळमळ होत असेल तर निंबू वापरून बघा :

तुम्ही जर प्रवास करत असाल, त्यावेळी तुमच्याजवळ निंबू बाळगा. लिंबूच्या वासाने तुम्हाला त्रास कमी होईल, लिंबू मध्ये विटामिन सी चा प्रभाव अधिक प्रमाणात असतो, त्यामुळे आपल्याला मळमळ होण्याच्या समस्यांपासून आपण वाचतो. तसेच घरी तुम्हाला केव्हाही मळमळ वाटत असेल तर तुम्ही लिंबूचे टरफलचा वास घेऊ शकतात, तसेच लिंबूच्या रसात मध घालून त्याचे चटणीही करू शकतात त्यावर तुम्हाला नक्की आराम मिळेल. 

जीरे वापरून बघा :

जिरे हे आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मळमळ सारखे वाटत असेल, त्यावेळी तुम्ही जिऱ्याचे भुकटी थोड्या पाण्यात मिसळून ते पाणी पिऊ शकता, तसेच तुम्ही जिरे, काळे मिरेपूड, जायफळ घालून त्याचे पाणी पिऊ शकतात. त्याने तुम्हाला फरक जाणवेल. 

बडीशोप ओवा चा वापर करून बघा :

मळमळ होत असल्यास, तुम्ही बडीशोप चा वापर करून बघा. कारण बडीशोप मध्ये बायोॲक्टिव घटक असतात. त्यामुळे तुमच्या पोटाशी निगडित कोणते समस्या असेल, तर त्यावर तुम्हाला आराम मिळेल, तसेच तुम्ही ओवा+ बडीशोप+ काळे मीठ यांचे मिश्रण एकत्र करून जेवणानंतर ही खाऊ शकतात. त्याने तुम्हाला पोटाच्या समस्या होणार नाहीत आणि मळ मळ चा त्रास कमी होईल. 

तुळशीचे पान आणि आल्याचा वापर करून बघा :

तुळशीचे पान हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याचप्रमाणे आले आरोग्यासाठी  फायद्याचे असते. तुम्ही तुळशीच्या पानांचा रस+मध+आल्याचा रस एकत्र करून त्याचे चाटण केल्यास मला मळ मळ होण्याचा त्रास कमी होईल. तसेच प्रवास करताना तुम्ही तुमच्या बॅगेत तुळशीची पाने ठेऊ शकतात. त्याने तुम्हाला प्रवास करताना मळमळ वाटत असेल, तर तुळशीच्या पानांच्या वासाने, तुमची मळ मळ कमी होईल हा प्रयोग तुम्ही करून बघू शकतात. 

लवंग चा वापर करून बघा :

लवंग मध्ये पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे गुणधर्म असतात. तसेच तुम्हाला मळ मळ होत असेल किंवा उलटी सारखे वाटत असेल, तर तुम्ही दाढी मध्ये लवंग दाबून तिचा रस चघळत राहा, त्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल. 

मळमळ होत असेल तर आहारात थोडा बदल करा :

जर तुम्हाला मळ मळ होत असेल, तर तुम्ही एकदम हलका सहज पचणारा असा आहार घ्या. त्यासाठी तुम्ही मुगाची डाळीची खिचडी, वरण-भात, सूप, तसेच लाह्या, चुरमुरे असा हलका आहार घ्या. फळांमध्ये तुम्ही संत्री, मोसंबी, सफरचंद, केळी यासारखी फळे खाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही पुरेसे पाणी प्यायला हवे, तुम्ही नारळाचे पाणी लिंबू पाणी संत्री चा ज्यूस पिऊ शकतात. तुम्ही तेलकट, मसालेदार, मैद्याचे पचायला जड असे पदार्थ खाऊ नका. त्याने तुमची मळमळ ची समस्या कमी होईल. 

डोकेदुखी मुळेही मळमळ होते :

अनेक जणांना डोकेदुखी होते, मायग्रेन होते, तसेच तीव्र प्रकाशही त्यांना सहन होत नाही. अशा वेळी त्यांना मळ मळ आणि उलटी च्या समस्या होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी लिंबूवर्गीय, संत्री युक्त फळे खा. तसेच त्यांनी भरपूर पाणी प्यायला हवे, नैसर्गिक ठिकाणी जायला हवे, आंबटचिंबट पदार्थांचे सेवन करायला हवे. त्याने तुम्हाला मळ मळ ची समस्या कमी होईल. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या :

तुम्हाला जास्तच मळ मळ तसेच उलट्यांचा त्रास होत असेल, तसेच उलटी होत असेल, त्यांना उलटी करताना पोटातील आतड्यात ताणल्यासारखे वाटत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना विचारून औषधी घ्या. थोडा आराम करा, टेन्शन घेऊ नका. तसेच तुम्ही शांत मधुर अशी संगीत ऐका तुम्हाला त्यातून हळू फरक जाणवेल. 

      चला, तर आज आम्ही तुम्हाला आमच्या कडून      मळमळ कशामुळे होते, त्याची कारणे तसेच त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा. 

धन्यवाद


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *