मधुमेहाचे सुरुवाती लक्षण काय आहे ? जाणून घ्या

मधुमेहाचे सुरुवाती लक्षण

मधुमेह हा आज काल खूप गंभीर आजार झालेला आहे. कारण हा आजार लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. तसेच आज-काल याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलते राहणीमान यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा आपल्याला मधुमेहाची लक्षणे दिसून येत नाही. तसेच बऱ्याचदा आपल्याला मधुमेहाची लक्षणे माहीत नसते. म्हणून खूप गैरसमज आपल्या मनामध्ये तयार होतात. याच प्रकारे जर आपल्याला लवकर समजले नाही की आपल्याला मधुमेहाचा त्रास आहे तर आपल्या शरीरावर वर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण वेळीच सावध होणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण मधुमेहाचे सुरुवाती लक्षण काय आहे ? हे जाणून घेणार आहोत.

तर आपण आज मधुमेहाचे सुरुवाती लक्षण कोणकोणते असतात तसेच ते कसे ओळखावे हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तसेच आपण बघू या ही मधुमेहाची लक्षणे आपल्याला कोणत्या प्रकारे दिसून येतील.

मधुमेहाचे सुरुवाती लक्षण कसे जाणून घ्यावे ?

चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊ आपल्याला कसे माहित होईल की आपल्याला मधुमेह झाला आहे किंवा होण्याची शक्यता आहे चला तर मग मधुमेहाचे लक्षण जाणून घेऊया.

वजन अचानक कमी होने :

बऱ्याचदा आपल्याला असे बघायला मिळते की आपले वजन पटापट कमी होत आहे. तसेच आपल्याला जास्त भूक लागत नाही तसेच खाल्ले लवकर पचत नाही आपली तब्येत सुदृढ राहत नाही. जर असे आपल्याला जाणवत असेल तर आपल्याला मधुमेह असू शकते हे मधुमेहाचे सुरुवाती लक्षण असू शकते.

खूप भूक लागणे :

अनेक वेळा आपण पोट भरून जरी खाल्ले तरी कधीकधी खूप भूक लागते. नेहमीपेक्षा आपण जास्त खातो तसेच नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. असे जर थोड्यावेळासाठी होत असेल तर ही चिंतेची बाब नाही. पण जर हे सतत आपल्यासोबत घडत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते मधुमेहाचे सुरुवाती आपल्याला जास्त भूक लागणे हे सहाजिक आहे.

सतत गळा सुकणे :

आपण खूप पाणी पिले किंवा काही इतर पातळ पदार्थ खाल्ले तसेच फळांचा रस पीला तरी आपला गळा कोरडा पडतो. तसेच सतत जर गळ्याला कोरड पडत असेल तर ही गंभीर बाब आहे. तसेच हे मधुमेहाचे होन्याचे लक्षण असू शकते.

हाता पायाची आग होणे, भुरकट दिसणे :

कधी कधी आपण काही काम करत असू किवा बसलेले असेल तर अचानक आपल्या हातापायाला आग सुरू होते. तसेच आपल्याला भुरकट दिसू लागते म्हणजेच आपली दृष्टी कमकुवत होते. वयानुसार ही एक साधारण बाब आहे पण मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हे सुरुवाती लक्षणे असू शकते.

पोटामध्ये अचानक आग पडणे :

अचानक पोटामध्ये आग पडते हे लक्षण वयस्कर लोकांमध्ये जास्त आढळून येत नाही. पण तरुण लोकांना जर मधुमेहाचा त्रास असेल तर त्यांना हे लक्षण दिसून येते. त्यांच्या पोटामध्ये अचानक आठ पडते तसेच त्यांना अति भूक लागते तुम्हाला जर असे लक्षण दिसले तर आपण आपल्या जवळच्या दवाखान्यात जाऊन मधुमेहाची चाचणी करून घ्यावी.

चक्कर येणे अथवा गुंगी सारखे वाटणे :

बऱ्याचदा मधुमेहाच्या सुरुवाती आपल्याला चक्कर येणे अथवा गुंगी सारखे वाटणे हे साधारण बाब आहे. कारण आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने तसेच हिमोग्लोबीन कमी जास्त होत असल्याने आपल्याला चक्कर अथवा थोडीशी गुंगी येऊ शकते. तसेच हे मधुमेहाच्या सुरुवाती लक्षण असू शकते याचे आपण दक्षता घ्यावी.

ही झाली मधुमेहाची लक्षणे पण बरेच वेळा मधुमेह ची लक्षणे कोणाला दिसून येतात तर कोणाला दिसून येत नाही. तसेच काही लोकांचे हे म्हणणे आहे की त्यांना जेव्हा मधुमेह झाले तेव्हा त्यांना यामधील कोणताही त्रास जाणवला नाही. म्हणून हे गरजेचे नाही की मधुमेह जर होत असेल तर हे लक्षण दिसली पाहिजे. पण तरीही ही लक्षणं तुम्ही लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे कारण तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना जर हे लक्षण दिसून येत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरकडे जाऊन त्यांची मधुमेहाची चाचणी करून घ्यावी, जर त्यांची चाचणी सुरळीत आली तर आपण दर दोन वर्षांनी मधुमेहाची चाचणी करून घ्यावी.

तसेच आपण पण अति साखरेचे पदार्थ खाणे कमी करावे अथवा टाळावे. तसेच साखळीच्या ऐवजी आपण गूळ वापरावा तुम्ही जर साखरेच्या व्यतिरिक्त तुमच्या आहारामध्ये गुळाचा समावेश केला तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता फार कमी असते

तर आज आपण बघितली की मधुमेहाची सुरुवाती लक्षण कोणकोणती आहे ? याच बरोबर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तसेच डॉक्टरांकडे मधुमेहाची चाचणी करून घ्यावी. तुम्हाला काही अडचण तसेच काही सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, तसेच ही माहिती अधिक लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *