मान काळी होत असेल तर करा हे सोपे घरगुती उपाय


आपल्या मानेवर बर्याचवेळा काळा पट्टा तसेच काळे डाग निर्माण होतात, मग सर्वांना प्रश्न पडतो की ते काळे डाग कसे घालवावे ? त्यासाठी मान काळी होत असेल तर आपण विविध घरगुती उपाय करून बघतो. पण बर्याचवेळा आपल्याला काही फरक दिसून येत नाही म्हणून आपण निराश होतो. आपल्याला या साठी निराश होण्याची आवश्यकता नाही आहे.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण आपल्या शरीराला किती जपत असतो, कारण आपण त्याच्यानेच अधिक आकर्षक दिसतो. तसेच आपले चेहऱ्याकडे लक्ष देताना बर्याचवेळा मानेकडे मात्र आपल्याकडून दुर्लक्ष होते.

आपण दिवसातून चेहरा खूप वेळेस साफ करत असतो. पण माने कडे मात्र आपण लक्ष देत नाही. म्हणून जसजसे दिवस जातात व जसे वय वाढत जाते तसे आपली मान काळी पडत जाते. मग आपण नंतर बाहेर जाणे टाळतो तसेच मान झाकून आपण बाहेर जातो.

म्हणून आपण आज बघणार आहोत की जर मानेवर काळे डाग निर्माण झाले असतील काळे पट्टे निर्माण झाले असतील, तर आपण काय केले पाहिजे. तसेच यावर सोपे व प्रभावशाली घरगुती उपाय कोणते चला तर मग बघुया.

आपली मान काळी होण्याची प्रमुख कारणे कोणती ?

1. अति घाम आल्यामुळे
2. शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे
3. प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्याने
4. केमिकल्सचा जास्त वापर केल्याने
5. गळ्यामध्ये चैन किंवा अन्य काही वस्तू घातल्यामुळे

अशी बरीचशी कारणे असू शकतात. आपल्या मानेखाली काळे डाग निर्माण होण्याची बरीच कारणे असतात जसे की अति घाम मुळे हे डाग निर्माण होतात, तसेच आपण मानेकडे दुर्लक्ष करतो किंवा प्रखर उन्हामध्ये जातो त्यामुळे हे आपली मान काळी पडण्याची शक्यता असते. तसेच आज काल आपण खूप केमिकलयुक्त गोष्टींचा जसे कि साबण शांपू वापर करतो तसेच खूप सार्‍या सोन्या चांदी च्या चैनी किंवा अन्य वस्तू आपण गळ्यामध्ये घालतो. त्यामुळे गळ्यावर काळे पट्टे निर्माण होण्याची दाट शक्‍यता असते.

मान काळी होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय करा

तर आपण बघितली कि मान काळी होण्याची कारणे कोणकोणते आहेत. तर आता आपण बघणार आहोत जर मान काळी झाली असेल तर त्यावर कोणते घरगुती उपाय केले पाहिजे व कोणत्या प्रकारे करावे ते आपण बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया यावरचे उपाय.

लिंबू करेल कमाल :

लिंबू हा आपल्या सर्वांच्या घरी सहज उपलब्ध असतो तसेच सर्वांच्या किचनमध्ये असतो. लिंबू आपल्या मानेवर लावल्याने आपल्या मानायचे काळे डाग सहज निघून जातात. कारण लिंबू मध्ये ऑक्साईड व विटामिन तसेच ब्रीचींग प्रॉपर्टी असतात. आपण जे तुमच्या शरीराचे डाग नाहीसे करण्यास मदत करतात. तर हा लिंबू कसा वापरायचा ते आपण बघूया –

 1. आपण सुरुवातीस अर्धा लिंबू घ्यावा.
 2. आपल्या मानेवर दहा ते पंधरा मिनिटं घासून घ्यावा.
 3. त्यानंतर मान स्वच्छ पाण्याने धुवावे असे दहा ते पंधरा दिवस करावे.

असे केल्याने तुमच्या मानेवर चे डाग नाहीसे होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा आणि दही लावून बघा :

बेकिंग सोडा लावल्याने आपल्या मानेचे काळे डाग जाण्यासाठी मदत होते. तर कसा वापरावा बेकिंग सोडा ते आपण बघू या –

 1. सर्वप्रथम आपण थोडासा बेकिंग सोडा घ्यावा साधारण एक चमचा बेकिंग सोडा घ्यावा.
 2. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दही टाकावी.
 3. त्यानंतर ते मिश्रण थंड करून आपल्या मानेवर लावावे.
 4. साधारणता दहा ते पंधरा मिनिटात ते आपल्या मानेवर ठेवावे.
 5. त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.

असे काही दिवस केल्याने तुमची या काळ्या चट्टाच्या त्रासापासून सुटका होऊ शकते.

कच्ची पपई वापरून बघा :

कारण कच्ची पपई ही आपले त्वचेसाठी खूप गुणकारी ठरते. तसेच जर अन्य आजार असतील तर आपण पपईच्या पानांचा रस पितो. तसेच कच्ची पपई ही तेवढेच फायदेशीर असते.

 1. आपण कच्ची पपई घ्यावी.
 2. आपण कच्च्या पपईचा रस करून घ्यावा.
 3. त्यानंतर तो रस रोज सकाळी अंघोळीच्या आधी मानेवर लावा.
 4. अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी.
 5. असे दहा ते पंधरा दिवस करावे.

असे केल्याने तुमची मानेच्या डागा पासून सुटका होऊ शकते.

कोलगेट लावून बघा

आपण आपल्या घरी कोलगेट ब्रश करायला वापरतो पण त्या व्यतिरिक्त कोलगेट चे अनेक फायदे आहेत. कारण कोलगेट मध्ये एंटीक्साइड तसेच ब्लिचिंग प्रॉपर्टी असतात. त्यामुळे तुम्ही जर कोलगेट तुमच्या मानेला लावले तर तुमच्या मानेचे काळे डाग जाण्यासाठी मदत होते. याचप्रमाणे तुम्ही दिवसातून दोन एक वेळेस तुमच्या मानेवर कोलगेट लावू शकता. पण कोलगेट सफेद वाले असावे त्यात कुठलाही फ्लेवर नसावा.

कोरफड वापरून :

कोरफड चा वापर करून तुम्ही घर बसल्या तुमच्या मानेवर आलेले काळे डाग आपण घालवू शकतात, त्यासाठी तुम्हाला –

 1. कोरफडचा गर काढून ते एक चमचा घेऊन त्यात एक कप गरम पाणी मिसळायचे आहे.
 2. दोघं चांगले एकत्र झाल्यानंतर एका कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ते तुम्हाला मानेवर काळी पडलेली त्वचेच्या भागावर लावायचे आहे.
 3. वीस मिनिटे राहू द्या व ते पाणी वापरून साफ करून घ्या.

सन स्क्रीन लावावे

बऱ्याच वेळेस आपण प्रखर उन्हामध्ये बाहेर जातो तसेच प्रखर उन्हाळा मध्ये काम करतो. त्यामुळे आपल्या त्वचेवर साईड इफेक्ट होतात. या सर्वांपासून वाचण्यासाठी आपण उन्हामध्ये जाण्याआधी त्वचेवर सनस्क्रीन लावावी. सन स्क्रीन लावल्याने तुमच्या त्वचेवर पडणाऱ्या सूर्य किरणांचा त्रास होत नाही व त्वचा काळी पडत नाही.

तर आज आपण बघितले जर आपल्या मानेवर काळे डाग पडले असतील तर त्याची कारणे कोणती तसेच आपण बघितले त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते. हे उपाय तुम्ही करून बघितले तर तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हि घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *