प्रत्येकाला वाटते की, आपला चेहरा एकदम सुंदर तजेलदार दिसावा. आपल्या चेहऱ्यावरचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते, पण आपल्या ओठांवर काळपटपणा राहिला, तर आपल्या सौंदर्यात कमतरता येते. मग आपण त्यावर लिपस्टिकचा मारा करून, आपले ओठ झाकून आपल्या चेहरा सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपण जगासमोरच, पण आपल्या स्वतःच्या मनाला माहिती असते की, आपल्या ओठांवर काळपटपणा आलेला आहे, पण आपण लिपस्टिक चा मारा करून आपल्या ओठांना झाकून ठेवू शकत नाही. उलट त्याने आपल्या ओठांवरील काळपटपणा हा जास्त प्रमाणात वाढतो, ओठ काळे होण्याची अनेक कारणे आहेत. जसे की अशक्तपणा, शरीरात रक्ताची कमतरता, कशाचीतरी एलर्जी, बाहेरील प्रदूषणामुळे, सौंदर्य प्रसाधनचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे, तसेच उन्हाळ्यात आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो, पण आपल्या ओठांची काळजी घेण्याची राहते, त्यामुळे ही आपल्या ओठांवर प्रदूषणाचा हल्ला होतो.
तसेच थंडीच्या दिवसातही ओठांना कोरडेपणा येऊन, तडे पडून, त्यातून रक्त येऊन आपले ओठ काळे होण्याची समस्या निर्माण होतात. तर मग आपण आपल्या ओठांवरील काळेपणा कसा दूर करायचा, त्यासाठी कोणकोणती काळजी घ्यायची, कोणते पदार्थ खायचे, ज्याने आपल्या ओठांचे सौंदर्य खुलेल.
ओठ काळे का पडतात ?
चला, तर मग जाणून घेऊया, की तुमच्या ओठांवरील काळेपणा कशाप्रकारे दूर करावा, आणि ओठांवरचा नैसर्गिक रित्या गुलाबी रंग कसा आणावा, त्यासाठी काही घरगुती उपाय.
ग्लिसरीन चा वापर करून बघा :
हो, खरंच ग्लिसरीन हे ओठांसाठी फार फायदेशीर असते. त्यासाठी तुम्ही ग्लिसरीन चे दोन ते तीन थेंब+ मध + लिंबू यांचे समप्रमाणात मिश्रण करून रात्री झोपताना तुम्ही ओठांवर पाच ते दहा मिनिटे मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला त्वरित फरक जाणवेल खरच करून बघा.
बीट च्या रसचा चा वापर करून बघा :
बीट हे नैसर्गिक रंगांनी भरले आहे. बीट चा रस ओठांना जर वापरला तर, तुमच्या ओठांना नैसर्गिक लाल कलर हा येईल, त्या रसाने तुमचे ओठ चमकदार व गुलाबी होतील, तसेच तुम्ही बीट चा रस एका बॉटलमध्ये भरून, त्यात खोबरेल तेल टाकून या रसाचा वापर तुम्ही रात्री झोपताना ओठांना लावा. सकाळी उठून धुवा बघा तुमचे दोन ते तीन आठवड्यात ओठांना गुलाबी व चमकदार पणा येतो, तसेच तुम्ही बीटचा रसात दुधाची साय टाकून ती तुमच्या ओठांना लावू शकतात, त्याने तुमच्या ओठांना मुलायमपणा येईल.
जास्तीत जास्त पाणी प्या :
हो, पाण्याचा आणि ओठांचा काय संबंध, तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव आपल्या शरीरावर तसेच ओठांवरही होतो. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा सारखे जाणवते आणि ओठांवर काळसर पणा येतो. पाणी जास्तीत जास्त पिल्याने आपल्या शरीरातील डीहायड्रेशन पणा निघून जातो, आपल्या शरीरात पाणी पुरवठा व्यवस्थित राहिला, तर आपली चेहरा चमकदार तसेच ओठ कोरडे व काळे पडणे एवजी चांगले गुलाबी नैसर्गिक होऊ शकतात. हा साधा घरगुती उपाय आहे करून बघा.
डाळिंब, स्ट्रॉबेरी चा रस वापरून बघा :
आपल्या शरीरासाठी जेवढी फळे तेवढे आपले शरीर सुदृढ असते, तसेच फळांचा वापर हा फक्त खाण्यासाठी नसून तर चेहऱ्यासाठी तसेच ओठांसाठी ही फार फायदेशीर असते. ओठांवरील काळपटपणा जाण्यासाठी तुम्ही डाळिंबाचा रस आणि स्ट्रॉबेरी रस एकत्र करून ओठांना लावला, तर तुमचे ओठ नैसर्गिक रित्या गुलाबी होतील, आणि त्याने तुमच्या ओठांना मुलायम पणा येईल. तसेच तुम्ही डाळिंबाने स्ट्रॉबेरीचा वापर हा खाण्यात केला तरी त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर ओठांवर होईल. तुमच्या शरीराला लागणारे ते मॅग्नेशियम पोटॅशियम तुमच्या शरीराला मिळतील, त्याने चेहर्यावर चमकदार पणा येईल.
लिंबूचा रस वापरून बघा :
लिंबूचे रसात विटामिन सी असते. विटामिन सी युक्त फळे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. त्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून, ते मिश्रण एकजीव करून तुमच्या ओठांना त्याने मसाज करा. तुम्हाला कशाची ऍलर्जी होऊन ओठ काळे पडले असेल, तसेच उन्हामुळे ओठ काळे पडले असतील, तर तेही त्याने दूर होईल आणि नैसर्गिक मुलायम पणा येईल. पण जर कोणाला लिंबू पासून ऍलर्जी असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
चला, तर आज आम्ही तुम्हाला तुमचे ओठ काळे का पडतात? व ते कशाप्रकारे दूर करता येईल, त्यासाठी काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच तुम्हाला आम्ही सांगितलेल्या काही घरगुती उपायांमध्ये कशाची ऍलर्जी असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, तसेच आम्ही सांगितलेल्या काही घरगुती उपायांमध्ये तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा.
धन्यवाद
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.