लिंबू खाण्याचे फायदे व तोटे नक्की कोण कोणते ? जाणून घ्या

लिंबू खाण्याचे फायदे व तोटे

लिंबू म्हटले की आपल्या डोळ्यासमोर हिरव्या पोटी पिवळसर रंगाचे फळ येते , बरोबर तसेच त्या फळाची चवही आंबट असते, लिंबाला कागदी निंबु व ईडलिंबू अशी दोन नावे आहेत . यास लिंबाने आपण लोणचे , सरबत करतो. तसेच तो रोजच्या आहारात सुद्धा वापरतो म्हणून हा लिंबू इतकेच वापरासाठी नसतो, तर त्याचे अनेक गुणधर्म सुद्धा आहेत, म्हणून आज आपण जाणून घेऊया की लिंबू खाण्याचे कोणकोणते फायदे व तोटे होऊ शकतात ?

लिंबू खाण्याचे फायदे :

तसे बघायला गेले तर लिंबापासूनआपल्याला खूप सारे फायदे मिळतात, लिंबा मध्ये विटामिन सी असल्या मुळे आपल्याला विटामिन सी ची कमतरता सतत जाणवत नाही आणि यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होऊ शकतात.चला तर मग बघुया की लिंबा पासून होणारे फायदे काय आहे ते ?

तोंडाला चव येण्यासाठी :

तुमच्या तोंडाला जर चव लागत नसेल तर तुम्ही जिरेपूड, काळे मीठ व लिंबाचा रस असे मिक्स करून त्याचे चाटण तुम्ही करू शकतात, त्याने तोंडाला तुमच्या चव येईल.

वजन नियंत्रणात ठेवते :

हो खरच एवढा छोटा लिंबू आपलं वजन नियंत्रणात ठेवू शकतो खरंच ! आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अवेळी खानपान, एकाच जागेवर बसून काम , पुरेशी झोप न होणे याने वजन वाढीची समस्या होऊ शकते अशा वेळी तुम्ही सकाळी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू एकत्र करून प्या, कारण लिंबा मध्ये विटामिन सी ची मात्रा असते तसेच लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड चा समावेश असतो यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी नियंत्रणात ठेवते.

तुमचे सौंदर्य निखारते :

लिंबू मध्ये विटामिन सी ची मात्रा असते आणि विटामिन सी आपल्या चेहर्यासाठी उपयोगी आहे. जर तुमची, त्वचा तेलकट असेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस + मध +मुलतानी माती एकत्र करून ती पेस्ट तुमचे चेहऱ्याला लावली तर तुमचे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होईल.

जर तुमचे हातापायाची ढोपर व मानेवरील काळसर पणा तसेच काखेत काळसरपणा असेल तर तुम्ही मध आणि लिंबू एकत्र करून त्याचा रस त्या काळसर पणा वर पाच ते दहा मिनिटे लावा थोड्यावेळाने धुऊन टाका, असे सलग तुम्ही दोन-तीन आठवडे केले तर तुमचीच त्वचेवरील काळसरपणा कमी तर होईलच आणि वांग चे डाग सुद्धा असल्यास ते सुद्धा कमी होतील.

केसातील कोंडा कमी होतो :

तुम्ही सकाळी केस धुण्याच्या अर्ध्या तासापूर्वी दही व लिंबू एकत्र करून केसांना लावून ठेवले तर तुमचे केसातील कोंडा कमी होईल तसेच दोन तोंडी केस सुद्धा कमी होतील केसांना तुमच्या चमक येईल आणि ते नरम होतील.

ताजेतवाने वाटते :

तुम्हाला जर थकल्यासारखे वाटत असेल अशक्तपणा वाटत असेल , तर तुम्ही लिंबूपाणी दिवसभरात चार ते पाच वेळा प्या त्याने तुम्हाला एकदम प्रसन्न आणि ताजेतवाने वाटेल , खरंच हे तुम्ही नक्की करून बघू शकतात.

कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून रोखतो :

हो तुम्हाला हे जाणून नक्की आश्चर्य वाटेल की लिंबू कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून कसं रोखू शकतो तर मग बघा , तुम्ही एक लिंबू फ्रिज च्या फ्रीजर मध्ये सात ते आठ तास ठेवा , ज्यावेळी तुम्ही नाश्ता पोहे म्हणा उपमा म्हणा किंवा जो काही तुमच्या आवडीचा पदार्थ असेल, त्यावर तुम्ही तो लिंबू सालीसकट किसून त्या पदार्थावर टाकुन खा कारण लिंबाच्या सालीमध्ये सर्व सर्व प्रकारचे विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर काढण्याची टाकत असते लिंबाच्या साली कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करण्यास मदत करते.

आता आपण लिंबाचे अनेक फायदे जाणून घेतले आहे आता तोटे जाणून घेऊया.

लिंबाचे तोटे तसे काही जास्त नाही पण ज्यांना लिंबाची ॲलर्जी आहे त्यांनी तो खाऊ नये ते कोणी? आपण जाणून घेऊया,

लिंबाचे अतिरिक्त सेवन केल्याने होणारे नुकसान :

  1. ज्यांचे दात संवेदनशील असतील अशा व्यक्तींना लिंबाचं सेवन जास्त प्रमाणात नाही करायचे आहे.
  2. ज्यांना दमाचा त्रास असेल त्या व्यक्तीने सुद्धा लिंबाचे सेवन कमी करायचे आहे
  3. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास असून त्यांच्या छातीत जळजळ होत असेल त्यांनी सुद्धा याच सेवन कमी करावे.

आम्हाला खात्री आहे, तुम्हाला या बहुगुणी लिंबाची इतकी माहिती दिली, ती तुम्हाला नक्की आवडली असेल तसेच लिंबाची किती सारे गुणधर्म आहेत हे हि तुम्हाला कळलेच असेल , चला तर मग आज पासून जर कोणी या बहुगुणी लिंबाचे सेवन करत नसेल तर त्यांनी त्याचा शुभारंभ करा . रोज एक किंवा अर्धा लिंबू रोजच्या आहारात घ्या, तसेच तुम्हाला जर अजून काही शंका असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. धन्यवाद


One response to “लिंबू खाण्याचे फायदे व तोटे नक्की कोण कोणते ? जाणून घ्या”

  1. लिबुसेवन करनेसे सेरम पोटेशियम बढ़ता है

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *