लहान मुलांना पित्त उठणे कारणे आणि उपाय जाणून घ्या

लहान मुलांना पित्त उठणे

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातील उष्णता अधिक प्रमाणात वाढते. यामुळे तापमानात वेगवेगळे बदल निर्माण होतात. उन्हाळ्यात आपल्याला पित्त उठणे अशा समस्या निर्माण होतात. यामध्ये पुरुष किंवा स्त्री या असे भेद नसतात हे कोणालाही होऊ शकते. पित्त उठणे ही समस्या जसे तरुण पिढी होते तशीच ती लहान मुलांना सुद्धा होते. लहान मुलांना सुद्धा अनेकदा पित्त उठणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. पित्त उठल्यामुळे त्यांना सारखा ताप येणे, छातीत किंवा पोटामध्ये जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आपण लहान मुलांना पित्त उठणे कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.

त्याचबरोबर लहान मुलांना पित्त झाल्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात. उन्हाळ्यात बरेचदा वाढलेल्या तापमानामुळे किंवा उन्हाळ्यात आवश्यक असणारा पौष्टिक आहार न मिळाल्यामुळे पित्त उठणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

पित्त उठल्यावर ती जागा लाल सर होते आणि तेथे सूज निर्माण होते. पित्त उठणे याला पुरळ येणे असेसुद्धा म्हटले जाते. पित्त उठल्यामुळे ती जागा सुजू शकते पण तेथे सारखी तीव्र खाज येते.

लहान मुलांना पित्त उठण्याची कारणे :-

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मुलांना पित्त होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत?आणि यावर आपण कोणते घरगुती व प्रभावशाली उपाय करू शकतो?चला तर मग बघूया!

१. तापमानातील बदल :-

अनेक वेळा आपल्या शरीराला तापमानात झालेल्या बदलांमुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. पित्त उठणे याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात तापमानात झालेले बदल. बऱ्याच लहान मुलांच्या शरीराला हे तापमानातील झालेले बदल सहन होत नाही व त्यांना पित्त उठणे अशा समस्या निर्माण होतात.

२. एलर्जी असणे :-

लहान मुलांना अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे ऍलर्जी होऊ शकते. या झालेल्या ऍलर्जीचा साईड इफेक्ट लहान मुलांना दिसून येतो. ते झाल्यामुळे सुद्धा पित्त उठणे अशा समस्या लहान मुलांना निर्माण होतात. त्यामुळे पूरक असेल असे पदार्थांचे सेवन करावे आणि कोणतेही केमिकल युक्त गोष्टी लहान मुलांना देऊ नये. त्यामुळे त्यांना त्यांचा साईड इफेक्ट होऊ शकतो.

३. उष्ण पदार्थांचे सेवन करणे :-

लहान मुलांना शरीरातील उष्णता वाढल्यामुळे पित्त होणे अशा समस्या निर्माण होतात. याचे मुख्य कारण म्हणजे पदार्थांचे सेवन केल्यामुळे सुद्धा त्यांना समस्या निर्माण होतात. अतिप्रमाणात उष्ण पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता अधिक प्रमाणात वाढते. आणि त्यामुळे पित्त उठणे अशा समस्या लहान मुलांना निर्माण होतात.

लहान मुलांना पित्त उठणे यावर उपाय :-

वरील भागात आपण बघितले पित्त उठणे याची मुख्य कारणे कोणकोणते आहेत ?आता आपण जाणून घेणार आहोत पित्त उठले असेल तर यावर कोणते घरगुती उपाय करावे?

● गुळवेलचा काढा प्यावा :-

आपल्या आयुर्वेदानुसार गुळवेल ही वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे. जर पित्त उठणे अशी समस्या होत असेल तर –

  1. तुम्ही त्यांना गुळवेलचा काढा प्यायला द्यावा.
  2. दोन-तीन गुळवेलाची पाने घेऊन पण पाण्यात उकळावी.
  3. नंतर ते पाणी गाळून घेऊन त्यामध्ये थोडेसे मध टाकावे आणि हा काढा लहान मुलांना प्यायला द्यावा.
  4. दोन दिवस हा काढा त्यांना द्या पित्त उठणे या समस्येपासून त्यांना आराम मिळू शकेल.

● पुदिनाचे पाणी प्यावे :-

पुदिना हा सुद्धा वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे. जर पित्त झाले असेल तर पुदिनाचे पाणी त्यांना जरूर द्यावे. पुदिना हे आपल्या पोटातील आमल्याचे प्रमाण कमी करतो.

पुदिनाचे पाच-सहा पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन ते कोमट पाणी दर दोन तासांनी लहान मुलांना द्यावे. यामुळे त्यांना ही समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

● थंड दूध प्यावे :-

अनेक वेळा पित्त झाल्यावर त्यांच्या छातीत किंवा पोटात जळजळणे अशा समस्या निर्माण होतात. ही जळजळ थांबवण्यासाठी लहान मुलांना थंड दूध पिण्यासाठी द्यावे. दुधामध्ये उपलब्ध असलेल्या कॅल्शियमचे प्रमाण पोटामधील जळजळ कमी करण्यास मदत करते आणि पित्ताचा त्रास दूर करण्यास उपयोगी ठरते.

●आहारात बदल करावा :-

उन्हाळ्यात अति प्रमाणात उष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे देखील पित्त उठणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे लहान मुलांना उन्हाळ्यात शीत पदार्थ जास्त द्यावे. जसे की दूध, फळे असे वेगवेगळे पदार्थ त्यांना द्यावे. या आहारातील बदल केल्यामुळे त्यांना पित्त उठणे अशा समस्या पासून आराम मिळेल.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले छोट्या मुल मुलीना पित्त उठणे ची कारणे कोणती? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *