आपल्या मुलाचं आरोग्य उत्तम असावं , एकदम निरोगी असाव असे सर्व पालकांचे म्हणणे असते, पण त्यासाठी मुलांनी पोटभर जेवण करायला हवे सकस आहार घ्यायला पाहिजे . अनेक पालकांची अशी कारणे आहेत की माझा मुलगा जेवत नाही तो खूप बारीक झाला अशी चिंता पालकांना पडते, त्यांना त्यांच्या आरोग्याची चिंता वाटू लागते लहान मुलांनी पोटभर जेवण नाही केलं, तर त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक बौद्धिक मानसिक विकासावर पडतो. त्यामुळे आपण आता जाणून घेणार आहोत कि लहान मुलांना जेवण नीट जात नाही या साठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो ते.
लहान मुलांना जेवण न जाण्याची कारणे :
आजच्या युगातील लहान मुलांना घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे जंकफूड आवडते, तसेच काही मुलांना दुग्धजन्य पदार्थ गोड पदार्थ आवडतात पण अशा पदार्थांच्या जास्ती सेवनामुळे मुलांच्या पोटात जंत (कृमी ) होतात. लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्याचा परिणाम त्यांच्या जेवनावर होतो लहान मुलांना भूक लागत नाही त्यांची पोट भरल्यासारखे वाटते त्यांचे पोट नीट साफ होत नाही. लहान मुलांना जेवण न जाण्याची अनेक कारणे आहेत ते आपण जाणून घेऊया.
अस्वच्छता ठेवल्यामुळे :
लहान मुलं दिवसभरात काय करतात काय खेळतात याकडे आपण बारकाईने लक्ष दिले पाहिजे, तसेच ते जेवणाच्या आधी हात धुतात की नाही याकडे लक्ष द्यावे, त्यांना बाहेरून फिरून आल्यावर हात धुवायला सांगूनच काही खायला द्यावे त्यांना स्वच्छ राहण्याची शिकवावे, त्यांनी काही खाण्याच्या आधी हात स्वच्छ धुऊन खाल्ले तर त्यांचे पोटात त्यांच्या बाहेर हे किटाणू जाणार नाही.
अनेक आजारामुळे लहान मुलांची भूक कमी होते जसे की ताप ,अपचन ,पोटाचे विकार ,सर्दी खोकला, कावीळ, बुद्धकोष्टता अशा अनेक आजारातून निघाल्यावर सुद्धा मुलांची भूक मंदावते.
आवडीचे जेवण नसल्यामुळे :
पालकांनी मुलांच्या आवडीनिवडी जपायला हव्यात त्यांना खायला काय आवडते, तेच पदार्थ त्यांना निरनिराळ्या प्रकारे बनवून खायला शिकवा.
पोटात जंतू (कृमी) झाल्यामुळे :
लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांची भूक मंदावते तसेच जेवणा उलट त्यांना बाहेरील माती खडे ,खडू असे अनेक मातीचे पदार्थ खावेसे वाटतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तू ,मोबाइल अतिवापरामुळे :
लहान मुलांचा टीव्ही, मोबाईल, गेम, लॅपटॉप अशा गोष्टींकडे त्यांचा कल असतो, यामध्ये ते खानपान विसरतात त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
बेकरी प्रोडक्ट आणि जंकफूड मुळे :
मुलांना पाव, बिस्किट ,चहा ,चॉकलेट ,चायनीज, शीतपेय अशा गोष्टी खाल्ल्यामुळे त्यांचे पोट त्यांना भरल्यासारखे वाटते व त्यांची जेवणाची इच्छा होत नाही.
लहान मुलं जेवण नीट जात नसेल तर काय करायला हवे ?
अशावेळी पालकांनी काय करावे ते आपण जाणून घेऊया व त्यावर, काही घरगुती उपचार आहेत ते आपण जाणून घेऊया
जंताचे औषध द्यायला हवे :
पालकांनी आपल्या मुलांना सहा महिन्यातून एकदा जंताचे औषध द्यावी.
आयुर्वेदीक उपचार करून पहा :
मुलांना सकाळ संध्याकाळ एक चमचा च्यवनप्राश द्यावे , त्याने सुद्धा लहान मुलांची भूक वाढते . तसेच मुलांचे वय जर सहा ते सात वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना झंडू पंचारिष्ट हे आयुर्वेदिक औषध भूक वाढीसाठी आहे ते सुद्धा देऊ शकतात.
हिंग वापरून बघा :
सगळ्यांच्या घरात हिंग हा असतोच त्याने सुद्धा पोटातील जंत मरतात व तो भूक वाढीसाठी योग्य आहे त्याने मुलांच्या पोटात गॅस होत नाही . हिंग मुलांना एक ग्लास पाण्यात चिमटीभर उपाशीपोटी प्यायला द्या.
आवडीनिवडी जपा :
पालकांनी आपल्या मुलांसाठी त्यांचे आवडी-निवडीचे पदार्थ करायला हवे. त्यासोबत त्यांना पुदिना अद्रक लसणाची चटणी द्या त्यामुळे त्यांच्या तोंडाला चव घेऊन ते जेवणाला स्वतः पुढे येतील.
खेळ खेळताना खायला द्या :
लहान मुलांना संध्याकाळी खेळताना शेंगदाणा लाडू खायला द्या शेंगदाणा लाडू खाल्ल्यामुळे त्यांची भूक वाढते ते तर ते अजून त्यांची उंची सुद्धा वाढते. तसेच तुम्ही लहान मुलांना हरभर्याची (चणे) भिजवलेली उसळ सुद्धा करून खायला देऊ शकतात त्यांनी सुद्धा त्यांची भूक वाढते.
व्यायाम करायला शिकवा :
लहान मुलांना सकाळी उठून व्यायाम करायला सांगा व्यायामाने सुद्धा मुलं थकतात आणि त्यामुळे त्यांना भूक लागते तसेच त्यांना संध्याकाळी सुद्धा आऊटडोअर गेम खेळायला सांगा.
जेवणानंतर बडीशोप चा वापर :
मुलांना जेवणानंतर बडीशेप खडीसाखर मिक्स करून खायला द्या बडीशोप धने पचनसंस्था चांगली होते व त्यांचे पोट साफ होते.
हळदीचे दूध घ्या :
मुलांना हळदीचे दूध पाजा हळदीमध्ये अँड बॅक्टेरिया असतो त्याने मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि त्यांचे रक्त सुद्धा शुद्ध होते.
अशी अनेक उपाययोजना आहेत हे करून सुद्धा मुलांचे न जेवण्याचे कारणे असतील तर तुम्ही त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवा तसेच अजून काही शंका असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. धन्यवाद
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.