किडनी स्टोन वर घरगुती उपाय नक्की जाणून घ्या

किडनी स्टोन वर घरगुती उपाय

आज काल किडनी स्टोन (मुतखडा) हा आजार खूपच सामान्य झाला आहे. कारण एका विश्लेषण अनुसार प्रत्येक शंभर माणसांमधील सात लोकांना किडनी स्टोन असतो. कारण बदलते राहणीमान तसेच बदलते वातावरणामुळे देखील अशा प्रकारचे बरेचसे आजार आपल्याला होऊ शकतात. मुतखडा का होतो तसेच याची कारणे कोणती यावर घरगुती उपाय कोणते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मुतखडा होण्याची कारणे :

सर्वप्रथम म्हणजे तुमच्या पोटामध्ये अधूनमधून दुखत असेल तसेच पोटाच्या बाजूला सूज आली असेल किंवा पोटामध्ये कळा मारत असतील तर समजावे की तुम्हाला किडनी स्टोन असू शकतो. पण याची पूर्ण शाश्वता नाही कारण हे फक्त सुरुवातीस लक्षणे असू शकतात.

लघवी करताना पोटात कळ मारणे किंवा लघवी करताना त्रास होणे अशी बरीचशी लक्षणे मुतखड्याची असू शकतात. तसेच तुम्हाला ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण मुतखड्या कडे जर तुम्ही दुर्लक्ष केली तर तो मुतखडा वाढत जातो व एकावेळी नंतर ते दुखणे असह्य होते म्हणून सुरुवातीसच अशी लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

  1. पाणी कमी प्रमाणामध्ये पिणे.
  2. सतत फास्ट फूड सेवन.
  3. खूप वेळ लघवी थांबवणे
  4. लहानपणी खाल्लेली माती, खडू मोठ्यापणी मुतखडा बनून उमळू शकतो.

बऱ्याच वेळेस आपण कमी प्रमाणामध्ये पाणी पितो म्हणून शरीराला पुरेशे असलेले पाणी मिळत नाही. त्यामुळे मूतखडा होण्याची शक्यता असते याच प्रकारे सतत बाहेरचे खाणे म्हणजेच फास्टफूड चे सेवन करणे खूप वेळ लघवी थांबून ठेवणे यामुळेदेखील मुतखडा होऊ शकतो. लहानपणी आपण माती खाल्लेले असते किंवा खडू खाल्लेला असतो तर मोठेपणी ते मुतखडा म्हणून उमळू शकते. याचे कारण म्हणजे हळूहळू आपल्या शरीरामध्ये मुतखडा निर्माण होतो. त्याचा आकार कालांतराने वाढत जातो म्हणून लवकरात लवकर त्याची लक्षणे ओळखून त्यावर योग्य ती शस्त्रक्रिया करून हा मुतखडा काढावा जर मुतखड्याचा आकार छोटा असेल तर तो शस्त्रकिया विना देखील आपण मुतखडा नाहीसा करू शकतो.

मुतखडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय :

आता आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला मुतखडा झाला असेल किंवा लक्षणे दिसत असेल तर तो कसा दूर करावा.

पुरेसे प्रमाणात पाणी प्या.

बऱ्याचदा मुतखडा होण्याचे कारण म्हणजे आपण पुरेशा प्रमाणामध्ये पाणी शरीराला देत नाही. तसेच आपण जेव्हा जेव्हा पाणी पितो तेव्हा ते पाणी आपल्या मुत्रपिंड (किडनी) ला स्वच्छ ठेवायचे काम करतात. तसेच आपण दिवसभरामध्ये जे काही खातो त्यानुसार आपल्याला दररोज चार ते पाच लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

जर लहान मुले असतील तर त्यांना कमीत कमी एक लिटर पाणी पिणे तरी गरजेचे आहे जेणेकरून पुढे जाऊन त्यांना किडनी स्टोन किंवा मुत्रपिंड निगडीत कोणतेही आजार होणार नाही. याच प्रकारे जर तुम्हाला आधीच किडनी स्टोन झाला असेल आणि तोच स्टोन खूप लहान असेल तर त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही तुम्ही तो पाणी पिऊन देखील काढू शकता तरी देखील एकदा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

बीट व डाळींबाचे सेवन कराव :

किडनी स्टोन जर छोटा असेल तरच आपल्याला शस्त्रक्रियेविना तो शरीराच्या बाहेर काढता येतो. जर किडनी स्टोन मोठा असेल तर तो तज्ञांच्या सल्ल्याने विना बाहेर काढता येत नाही.

जर तुम्हाला किडनी स्टोन ची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही रोजच्या आहारामध्ये बीट चा समावेश केला पाहिजे व जेवण झाल्यानंतर एक तरी डाळिंब खाल्ली पाहिजे. डाळिंब खाल्ल्याने आपले रक्त शुद्ध होते तसेच किडनी स्टोन नाहीसा होण्यास मदत देखील होते.

सफरचंदाचा रस करेल मदत :

तुम्ही जर सफरचंदाचा रस पिला तर हा किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्यावर रामबाण उपाय आहे. कारण सफरचंदाच्या रसामुळे किडनी मधील बरेच बॅक्टेरिया किंवा काही इतर छोटे जंतू असतील तर ते नाहीसे होण्यास मदत होते. 

सफरचंदाच्या रसामुळे पोटामधील इम्युनिटी सिस्टिम (रोगप्रतिकारक शक्ती) देखील वाढते. व यामुळे पोटाच्या व किडनीच्या संदर्भातील आजार होण्याची संभावना फार कमी असते तसेच असे म्हटले जाते की दिवसा मधून एक सफरचंद खा व सर्व आजारांपासून दूर राहा.

तर आज आपण बघितले किडनी स्टोन ची लक्षणे व किडनी स्टोन झाला असेल तर त्यावर काही घरगुती उपाय, तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *