आजकाल खूप सार्या लोकांना मी वेगळ्या प्रकारची समस्या आरोग्याच्या बाबतीमध्ये असतात. त्यातली एक समस्या म्हणजे सारखी सर्दी होणे व जुनाट सर्दी असणे. या समस्यांमुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करण्यात भरपूर अडथळे येतात व त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला लागतो. त्यासाठी आम्ही आज जुनाट सर्दी घालवण्यासाठी काय घरगुती उपाय करायला हवे जेणेकरून तुम्हाला त्या सर्दी पासून सुटकारा मिळाला मदत होईल याबद्दल माहिती देणार आहोत.
बऱ्याचदा आपण बघतो की आपली सर्दी थोडा वेळ जाते पण परत येते. मग अशा वेळेला खूप त्रास होतो. कारण सर्दी जर असली तर आपले डोके खूप दुखते तसेच नाकाचा शेंडा लाल होतो, श्वास द्यायला त्रास होतो. जर सर्दी दोन-तीन दिवसांनी जात असेल तर ती सामान्य सर्दी आहे.
आपल्याला दोन प्रकारची सर्दी असू शकते पहिली म्हणजे कोरडी सर्दी दुसरी म्हणजे ओली सर्दी. तर कोरड्या सर्दीमध्ये कफाचे प्रमाण कमी असते आणि ओल्या सर्दीमध्ये कफचे प्रमाण अधिक असते.
बऱ्याचदा सर्दी जाण्याचं नावाच घेत नाही पण सर्दी न जाणे अथवा ती परत परत येणे ही खूप गंभीर बाब आहे. आपण त्यावर वेळीच काहीतरी केले पाहिजे तसेच आपण वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. सारखी सर्दी होत असल्यामुळे, आपल्याला नाकाचे हाड सडल्याचे जाणवते किंवा बऱ्याच वेळा सायनस चा सुद्धा त्रास व्हायला लागतो.
तसेच आपल्याला ही सर्दी घालवण्यासाठी घरच्या घरी काय करता येईल का याचा विचार करतो. तसेच खूप सारे उपाय करून बघतो पण कित्येक वेळा अपयश येते. कारण त्यांना पुरेशी माहिती नसते. तर मित्रांनो आज आपण याबाबत चर्चा करणार आहोत की जुनाट सर्दी न जाण्याची कारणे कोणती ? तसेच सर्दी घालवण्यासाठी घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? चला तर मग बघूया.
जुनाट सर्दीची प्रमुख कारणे :
1. सतत वातावरणातील बदल
2. थंड पदार्थांचे सेवन
3. स्वच्छ हवेत श्वास न घेणे
4. एलर्जी असणे
5. जंतुसंसर्ग झाल्यामुळे
6. छातीमध्ये कप असल्यामुळे
7. नाकाचे हाड वाढणे
आपण सतत बाहेर कुठे न कुठे जात असतो. तसेच आपण जर काम करत असाल तर, आपण बाहेर जास्त वेळ राहतो त्यामुळे सतत येणाऱ्या वातावरणाचा बदलामुळे तसेच स्वच्छ हवा न भेटल्यामुळे आपल्याला सर्दी होते.
याच प्रकारे आपण खूप वेळा अति थंड पदार्थांचे सेवन करतो तसेच आपल्याला जर ॲलर्जी असेल तरी थोडीशी जरी धुळ आपल्या नाकामध्ये गेली तरी आपल्याला सर्दी होण्याचे शक्यता असते.
आपल्याला बऱ्याचदा काही वेगळे आजार असतात त्यामुळे आपल्या गोळ्या औषधे चालू असतात. तसेच खूप वेळा आपल्या छातीमध्ये कफ साचून राहतो, तो बाहेरच पडत नाही म्हणून देखील आपल्याला सर्दी होते. तर अशी बरीच कारणे असू शकतात आपली जुनाट सर्दी परत येण्याची.
जुनाट सर्दी घालवण्याचे सोपे घरगुती उपाय :
आपण तर बघितली की सर्दी होण्याची कारणे कोणकोणते असतात. आता आपण जाणून घेणार आहोत जुनाट सर्दी घालवायचे घरगुती व प्रभावशाली उपाय, चला तर मग जाणून घेऊया सर्दी कशी पळवायची.
निलगिरी ची वाफ घ्या :
आपल्याला जर सर्दी झाली असेल आणि आपले नाक मोकळे नसेल तर, आपण गरम वाफ घेतली तर आपल्याला बराच फरक पडतो. त्यासाठी –
- आपण एक तांब्या गरम पाणी करून घ्यावे.
- त्यानंतर त्या गरम पाण्यामध्ये दोन थेंब निलगिरी व थोडेसे विक्स वेपोरब टाकावा .
- त्यानंतर गरम पाण्याचा वाफारा घ्या.
असे काही दिवस केल्याने तुमची सर्दी जाण्यास मदत होईल व तुमचा कफ कमी होण्यास मदत होईल.
ओव्याचा धुर घेऊन बघा :
आपल्याला जर सर्दीचा खूप त्रास होत असेल तसेच सर्दी जर जातच नसेल, तर
- आपण ओव्याचा धूर घ्यावा.
- आपण तव्यावर ओवा भाजाव्यात.
- ओवा भाजतांना जो धुर येईल तो धुर तुम्ही नाकावाटे आत मध्ये घ्या व तोंडावाटे सोडा
असे केल्याने तुमचा कफ कमी होण्यास मदत होईल. कारण ओव्याचा वासाने तुमची नाक मोकळे होते याचबरोबर तुमचे सर्दी ही नाहीशी होऊ शकते. जर तुम्हाला ओंवा पासून एलर्जी असेल तर कृपया हा उपाय करू नये.
कांद्याचा रस घेऊन बघा :
कांद्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनात शक्तीला पळू शकतात त्यासाठी तुम्हाला –
- आपल्या सर्वांच्या घरी कांदा तर असतो. तर सर्वप्रथम आपण कांद्याचा काढण्यात रस काढून घ्यायचा.
- रस काढून घेतल्यानंतर तो औषधाप्रमाणे होईल इतके गरम करून घ्यावे.
- गरम झाल्यानंतर ते थोडेसे कोमट असतानाच पियावे हा कांद्याचा रस तुम्ही सात दिवस पियावा.
असे केल्यास तुमची कितीही जुनी सर्दी असेल तर ती झटक्यात पाळून जाईल.
हळद, मिरी व मध हे घेऊन बघा जुनाट सर्दी घालवा:
जुनाट सर्दी साठी आपण आता हळद मिरी व मध हे वापरून घरगुती उपाय करू शकतो, यासाठी आपल्याला –
- सुरुवातीस आपण अर्धा चमचा इतके हळद घ्यावी .
- त्यामध्ये दोन मिरी बारीक करून त्याची पावडर टाकावी.
- त्यानंतर त्याच्या मध्ये थोडेसे मध टाकावे मध शुद्ध असावे याची दक्षता घ्यावी.
- हे तिन्ही मिश्रण एकत्र करून रोज सकाळी उठल्यानंतर घ्यावे.
- हे मिश्रण अगदी थोड्या प्रमाणात मध्ये घेतले तरी चालेल.
तसेच हा उपाय काही दिवस करून बघा तुमची जुनाट सर्दी जाण्यास मदत होईल.
गुळाचा खडा खावे :
आपल्याला गुळाचे फायदे तर माहितीच आहे. गुळ हा आपल्या शरीरा करता खूप उपयुक्त ठेरतो. तसेच आपल्याला जर मोठ्या प्रमाणामध्ये सर्दी झाली तर आपल्याला समजत नाही तसेच डोके भरून येते. पण आपण नियमितपणे रोज जेवण झाल्यावर जर एक गुळाचा खडा खाल्ला तर आपली कितीही जुनाट सर्दी असली तरी ती कमी होण्यास मदत होते.
जुनाट सर्दी साठी हे सुद्धा करून बघा :
आपल्याला बरेचदा सर्दी ही धुळीच्या छोटे छोटे कण आपल्या नाकावाटे शरीरामध्ये गेल्याने होते. तसेच आपल्या जंतुसंसर्ग झाल्यामुळे होते म्हणून आपण नेहमी धुळीच्या ठिकाणी जाताना आपले नाक रुमालाने झाकावे तसेच सतत बदलणाऱ्या वातावरणामध्ये जाणे टाळावे. व जर जास्त त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.