जेवणाआधी किंवा जेवणानंतर पाणी का नाही प्यावे ?

मित्रांनो बरेच जणांना प्रश्न पडलेला असतो पाणी नेमके कधी प्यावे जेवणाआधी किंवा जेवणानंतर ? अनेकदा काही लोक जेवताना सुद्धा पाणी पितात पण असे करणे चुकीचे आहे, कारण जेवताना जर आपण पाणी पिले तर आपल्याला जास्त भूक लागत नाही व आपण जे अन्न खात आहोत त्यातले पूर्ण फायदे आपल्याला मिळत नाहीत. तसेच विज्ञान आणि एक्सपर्ट सुद्धा हेच सांगतात की जेवताना पाणी जास्त पिऊ नये. जर तुम्हाला जेवण गिळायला जड जात असेल तरच तुम्ही एक ते दोन घोट पाणी घेऊ शकता पण जास्त घेणे योग्य नाही.

तर अनेक जण असा विचार करतात जर आपण जेवताना पाणी पिऊ शकत नाही तर मग जेवणाआधी तर पाणी पिऊ शकतो, पण असे करणे सुद्धा चुकीचे आहे, कारण की जेवणाआधी जर आपण पाणी पिले तर आपले जठरामधील द्रव्याचे संतुलन बिघडते.

तसेच आपल्याला जास्त भूक लागत नाही किंवा मग जास्त अन्न खाल्ले जात नाही अथवा पुरेसे जेवण जेवले जात नाही, त्यामुळे जेवणाआधी ही पाणी पिणे टाळावे. जर अगदीच जेवणाआधी पाणी प्यावे असे वाटले तर दोन घोट किंवा अर्धा ग्लास पाणी प्यावे, त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नये.

काही लोक जेवणाआधी,जेवताना आणि जेवण झाल्यानंतर पाणी पित नाही, कारण त्या लोकांना पाणी जेवणाआधी जेवताना व जेवणानंतर का पिऊ नये याबाबतची कारणे माहीत असतात. तर काही लोकांना याचे दुष्परिणाम माहीत नसल्यामुळे ते कधीही जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पितात.

तर आपण ह्या संदर्भात आज बघणार आहोत की जेवताना किंवा जेवणाआधी अथवा जेवणानंतर पाणी कधी व किती प्यावे ? चला तर मग बघुया.

जेवणाआधी पाणी पिण्याचे नुकसान :-

अनेक लोकांना असे वाटते जेवणाआधी पाणी पिल्याने जेवताना पाणी पिण्याची इच्छा किंवा गरज निर्माण होत नाही.पण आपल्या आयुर्वेदानुसार जेवताना,जेवणाआधी व जेवणानंतर किती व कसे पाणी प्यावे हे दर्शविले आहे.

  1. काही लोकांना वाटते जेवणाआधी जर आपण पाणी पिले तर आपले वजन कमी होते आणि चांगली भूकही लागते. पण असे नाही आहे जर तुम्ही जेवणाआधी पाणी प्यायले तर तुमची भूक कमी होते. त्याचबरोबर पुरेसे अन्न खाण्याची इच्छा होत नाही आणि अपचन होते.
  2. जेवण आधी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील अन्न पचवण्याचे द्रव्य असते ते पातळ होऊन जाते व त्या मुले जास्त वेळ अन्न पोटात पडून असते.
  3. जेवण आधी जास्त पाणी प्यायल्याने आपण जे हि अन्न खाऊ ते लवकर उर्जेत बदलत नाही.

त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेवणाआधी कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे आपल्याला नुकसानच होणार आहे. जेवणाआधी जर तुम्ही चुकून एका दिवशी पाणी प्यायले तर त्यात काही हरकत नाही.

जेवणानंतर पाणी पिण्याचे तोटे :-

वरील प्रमाणे आपण बघितले जेवणाआधी पाणी पिले तर आपल्या शरीराला कोणकोणते नुकसान होऊ शकतात. तसेच जेवणानंतर ही आपण जर लगेच पाणी प्यायला तर आपल्याला अनेक नुकसान होऊ शकतात.काही लोक जेवण झाल्या झाल्या लगेच दोन-तीन ग्लास पाणी पितात. पण हे चुकीच आहे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण –

  1. आपले अन्न हे जठरापर्यंत जायला थोडा वेळ लागतो. पण जर आपण लगेचच जेवण झाल्यावर पाणी पिले तर ते अन्न लगेच जठरापर्यंत पोहोचते व आपल्याला अन्न अंगी लागत नाही.
  2. तसेच आपल्याला अपचन, ऍसिडिटी असे वेगवेगळे त्रास व्हायला सुरु होतात.त्यामुळे जेवणानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे.
  3. जेवण केल्यावर कमीत कमी ४५ मिनिटे पाणी प्यायला नको हवे कारण अन्न खाल्ल्यावर आपल्या पोटात जो जठराग्नी असतो तो अन्न लवकर पचविण्याचे काम करतो, पाणी प्यायल्याने जसे एखाद्या आगे च्या विस्तवावर आपण पाणी टाकतो तसे आपल्या पोटात होते व त्या मुले सारखे अपचन होणे व गैस होने व एसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात.
  4. काही लोक तर जेवणानंतर चहा किंवा कॉफी यांचे सेवन करतात पण हे ही चुकीचे आहे. जेवणानंतर चहा कॉफी पिल्याने आपल्या पोटातील अन्न पचत नाही. तसेच वेगवेगळे त्रास आणि आजार व्हायला सुरुवात होते.
  5. तसेच जर आपण जेवणानंतर पाणी प्यायले तर आपले वजन वाढण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते .आणि हृदयाचे आजार व्हायलाही सुरुवात होते. त्यामुळे जेवणानंतर पाणी पिण्याचे नेहमी टाळावे.

जेवणानंतर थोड्यावेळाने पाणी पिण्याचे फायदे :-

वैज्ञानिक व एक्सपर्ट च्या सल्ल्यानुसार पाणी हे जेवणानंतर 45 मिनिटांनी प्यावे, त्याचबरोबर पाणी पिताना हळूहळू दोन-दोन घोट पाणी प्यावे. जलद गतीने पाणी पिऊ नये,त्यामुळे आपल्या अंतर आतड्याना त्रास होत नाही.

  1. आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी पाणी पिणे हे चांगले आहे पण पाणी जेवणानंतर थोड्यावेळाने पिले तर आपल्याला अपचन ,ॲसिडिटीचा त्रास होत नाही.
  2. तसेच जर आपण जेवणानंतर थोड्या कालावधीनंतर पाणी प्यायले तर आपले वजन वाढणार नाही आणि आपल्या शरीरातील पचनक्रिया ही संतुलित राहील. त्याचबरोबर आपली पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदतसुद्धा होईल.
  3. आपण जर थोड्या कालावधीनंतर पाणी प्यायले तर जठराला सुद्धा आराम भेटतो. त्यानंतर आपण खाल्लेले अन्न आपल्या शरीरात पचायला पुरेसा कालावधी मिळतो.

जेवण झाल्यानंतर कोणत्याही अंमली पदार्थांचे म्हणजेच अल्कोहोल असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. जर आपण कोणत्याही अल्कोल असलेल्या पदार्थांचे सेवन केले तर ते पदार्थ आपल्या शरीरास नुकसानदायक किंवा मग हानिकारक ठरते त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन करू नये.

तर आज आपण बघितले जेवणाआधी किंवा जेवणानंतर नंतर कधी व किती वेळाने पाणी प्यावे. तुम्हाला याबाबत अजून माहिती हवी असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

Leave a comment