जखम झाल्यास घरगुती उपाय काय आहेत ते ? जाणून घ्या

जखम झाल्यास घरगुती उपाय

आपण बरेचदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अत्यंत जलद गतीने करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या धावपळीमध्ये आपल्याला कधी तरी आपल्या शरीराला इजा होते किंवा आपल्या हातापायांना जखम होते. लहान मुलांना इजा अति प्रमाणात होतात. लहान मुलांना वेगवेगळे खेळ खेळताना किंवा धावताना वेगवेगळ्या इजा होऊ शकतात

यालाच जखम सुद्धा म्हटले जाते. जखमेवर जर आपण वेळीच उपचार केला नाही तर ती जखम अजून वाढू शकते किंवा तिचा अधिक त्रास आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या जखमेवर प्रथम उपचार किंवा आपल्या घरगुती उपायांनी सुद्धा ही जखम भरली जाऊ शकते.

जर तुम्हाला कोणतीही जखम झाली असेल तर त्यावर सर्वात आधी प्रथम उपचार न करता ती लागलेली जागा स्वच्छ पाण्याने चांगली धुऊन घ्यवी. नंतर ती लागलेले ठिकाण कोरडी करून घ्यावी आणि लागलेली जाग कोरडी झाल्यावर तुम्ही घरगुती उपाय किंवा प्रथम उपचार करू शकतात.

जखम झाल्यावर घरगुती उपाय :-

जखमेवर लावण्यासाठी वेगवेगळे केमिकलयुक्त क्रीम्स सुद्धा आहेत. पण काही क्रीम या जर तुम्ही तुमच्या जखमेवर लावल्या तर तुम्हाला त्याचा साईट इफेक्ट सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन जखमेवर लावण्यासाठी कोणती क्रीम योग्य आहे ते सुनिश्चित करून घ्यावे.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जखम झाल्यावर त्यावर कोण कोणते घरगुती उपाय करावे ?चला तर मग बघूया!

● जखमेवर हळद लावावी :-

हळद ही आपल्या आयुर्वेदानुसार वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे असे दर्शविले आहे. त्याच बरोबर हळद ही वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत उपयुक्त उपाय म्हणून सुद्धा वापरली जाते. जर तुम्हाला जखम झाली असेल तर ती जखम चांगली धुऊन कोरडी करून घेऊन त्या जखमेवर हळद लावावी. हळदी मध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या जखमे मधून येणारे रक्त थांबण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. त्याच बरोबर जखमेमध्ये असणारे कोणतेही जंतू नष्ट करण्यास सुद्धा हळद तुम्हाला मदत करू शकते. त्यामुळे हळद हा एक अत्यंत उपयुक्त असा घरगुती उपाय आहे.

● कोरफडीचे जेल लावावे :-

कोरफड ही सुद्धा वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत गुणकारी म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर कोरफडी मध्ये असणारे नैसर्गिक गुणधर्म अनेक समस्यांचे उपाय म्हणून उपयुक्त ठरते. जर तुम्हाला कोणतीही जखम झाली असेल तर ते लागलेले चांगले धुऊन व कोरडी करून घेऊन त्यावर ताज्या कोरफडीचे जेल लावावे. कोरफड मध्ये अनेक वेगवेगळे गुणधर्म असतात जे तुमच्या जखमेत असणारे कोणतेही जंतू नष्ट करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही हा घरगुती उपाय सुद्धा करू शकतात.

● तुळशीचा पाला लावा :-

तुळस ही सुद्धा वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे. त्याचबरोबर तुळस जोशी मध्ये असणारे वेगवेगळे महत्त्वाचे गुणधर्म आपली जखम भरून काढण्यास मदत करते. तुम्ही तुळशीची पाच सहा पाने घेऊन ते चांगले कूच किंवा बारीक करून घ्या तुळशीचा बारीक केल्या तो रस किंवा तो पाला आपल्याला ज्या ठिकाणी जखम झाली आहे त्या ठिकाणी लावा. असे केल्याने तुमच्या जखमी मधून येणारे रक्त थांबण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. त्याचबरोबर जखमेवर होणारा त्रास सुद्धा तुम्हाला कमी जाणवू शकतो.

● कडुनिंबाचा पाला लावा :-

कडूनिंब हे जरी कडू असले तरी याचे उपाय अत्यंत गुणकारी व गोड आहेत. कडूनिंब सुद्धा वेगवेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून वापरले जाते. त्याच बरोबर वेगवेगळ्या पवित्र समारंभात सुद्धा कडुनिंबाचा पाला वापरला जातो. तुम्हाला ज्या ठिकाणी जखम झाली आहे त्या ठिकाणी कडुलिंबाचा पाला लावा. कडुनिंबाची पाच-सहा पाने घेऊन ती चांगली बारीक करून घेऊ ती त्याचा रस व तो पाला ज्या ठिकाणी आपल्याला जखम झाली आहे त्या ठिकाणी लावावा. असे केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. त्याच बरोबर तुमची जखम लवकरात लवकर भरण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते.

● जुने तूप लावावे :-

तूप हे सुद्धा वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे. जर तुमच्या जखमेतून रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही जुने तूप लावून हा रक्तस्राव थांबू शकतात. तुप हे जखमेवर दहा ते पंधरा मिनिट लावावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने ती जखम पुन्हा धुऊन घ्यावी. जास्त वेळ तो जखमेवर ठेवू नये किंवा लावू नये त्यामुळे जखमेला अजून त्रास होऊ शकतो जखम वाढू शकते. त्यामुळे तूप थोडा वेळच जखम झालेल्या ठिकाणी ठेवावे किंवा लावावे.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले जखमेवर कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *