नमस्कार, हल्ली प्रत्येकाला वाटते की, आपले चेहऱ्याचे सौंदर्य खुलावे, आपण एकदम छान दिसावे, आपल्या चेहऱ्यावरची प्रथम इंप्रेशन आपल्या ओठांवरून कळते, आपले ओठ गुलाबी चमकदार असले की, अजून आपले चेहऱ्याचे सौंदर्य खुलते. पण जर आपले ओठ फाटलेले किंवा त्यातून रक्त, ड्राय असले, तर आपले चेहऱ्याचे सौंदर्य हे कमी होते. आपण नाराज होतो. मग अशावेळी आपण आपल्या ओठांसाठी काय करायला हवे ? ते एकदम चमकदार आणि तेजस्वी असायला हवे, पण कोणत्या कारणांमुळे ओठ फाटतात, तर आपले ओठ वातावरणातील बदलामुळे फाटतात, व थंडीच्या दिवसात ही भरपूर जणांचे ओठ फाटणे च्या समस्या असतात , तसेच व्हिटॅमिन बी आणि विटामिन च्या कमतरतेमुळे सुद्धा आपले ओठ फाटतात.
ओठ फाटणे घरगुती उपाय काय आहेत जाणून घेउया :
काही गंभीर आजारातून आपण बरे झाल्यावर अशक्तपणा आल्यामुळे ही आपले ओठ फाटतात. तसेच तुम्ही कोणतेही लिपस्टिक लावल्यामुळे सुद्धा ओठांवर काळपटपणा आणी कोरडेपणा येतो, मग अशा वेळी आपण आपल्या ओठांची काळजी कशी घ्यावी, आपल्या ओठांवर काय घरगुती उपचार आपण करायला हवेत.
चला, तर मग आपण ओठ फाटणे ओठांवर कोरडेपणा येणे, यावर काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
तुम्ही दुधाची साय ओठांवर लावून बघा :
हो, दुधावरची साय ओठांसाठी फार फायदेशीर ठरते. दुधावरची साय म्हणजेच मलई असते. दुधाच्या सायमध्ये पोषक गुणधर्म असतात, जी आपल्या चेहर्यासाठी फार फायदेशीर असतात.
तसेच ओठांसाठी दुधाच्या साय मधील तेलकट, तुपकट स्निग्धता फायदेशीर ठरते. तुम्ही रात्री झोपताना दुधाची साय तुमच्या ओठांना लावून ठेवावी, सकाळी उठल्यावर तुम्हाला फरक जाणवेल. असे दोन ते तीन आठवडे केल्यास तुमचे ओठ चमकदार व मुलायम होतील. हा एकदम साधा आणि सोपा उपाय आहे, तो प्रत्येकाच्या घरातही आहे, नक्की करून बघा.
बदामाचं तेल वापरून बघा
बदाम हे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. तसेच चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी ही बदाम फार फायदेशीर असतात. बदामामध्ये विटामिन सी चे मात्र मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ते आपल्या ओठांसाठी फार फायद्याचे ठरतात.
त्यासाठी तुम्ही बदामाचं तेल रात्री झोपताना ओठांवर लावून बघा, त्याने तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तसेच तुमचे त्याने चमकदार होतील.
तुम्ही गाईची दूध व केसर चा वापर करून बघा
तुम्ही केसर आणि गाईच्या दुधाचा वापर तुमच्या ओठांसाठी करू शकतात. कारण केसर हे नैसर्गिक रंगाचा रूप आहे. तुम्ही रात्री झोपताना जर दुधामध्ये केसर टाकून तुमच्या ओठांना लावले, तर तुमच्या ओठांना नैसर्गिक सुंदरता येईल.
बीट वापरून बघा :
ओठांसाठी बीट हे फायदेशीर असते. कारण आपण कोणतेही बाजारू लिपस्टिक लावल्यामुळे आपल्या ओठांवर फार काळवटपणा येतो. अशा वेळी बीट हे नैसर्गिक सौंदर्य व रंग आपल्या ओठांवर आणतो. त्यासाठी तुम्ही बीट चा किस करून त्याचा रस गाळून त्यात दुधाची साय मिक्स करून तुमच्या ओठांना लावा, त्याने तुमच्या ओठांना चमक येईल व नैसर्गिक कलर ही येईल. तसेच तुम्ही बीटचा रस त्यात खोबरे तेल हे मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटे तुमच्या ओठांवर दोन ते तीन आठवडे लावून बघा. त्याने तुमचे एकदम गुलाबी होतील, हा एकदम सोपा उपाय आहे, करून बघा.
हळद आणि तुपाचा वापर करून बघा :
हळदी ऑंटीबॅक्टरियल असते, तसेच एंटीसेप्टिक चे ही काम करते. त्यामुळे ओठ फाटल्यावर, हळद आणि तुपाचा वापर केल्यावर आपल्या ओठांमधुन रक्त येणे थांबते व हळू फाटलेली ओठ ही चांगली होतात व हळूहळू मुलायम होऊ लागतात, खरंच हा उपाय तुम्ही थंडीच्या दिवसात ही करू शकतात खूप लाभदायक आहे.
चला, तर आज आम्ही तुम्हाला ओठ फाटल्यावर कोण कोणते घरगुती उपचार करावे? ते सांगितलेले आहे, तसेच तुम्हाला ओठ फाटून रक्त येऊन अधिक त्रास होत असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या, आणि आम्ही सांगितलेल्या काही घरगुती उपायांमध्ये जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा.
धन्यवाद .
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.