हाताची नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत ? माहितीय का ?

हाताची नखे ही स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण नखामुळे स्त्रियांच्या हाताचे सौंदर्य वाढते. त्याच बरोबर त्यांच्या हाताचे सौंदर्य शोभून दिसते. पण काही स्त्रियांच्या किंवा काही लोकांचे नखे एवढे कमकुवत असतात की नखे वाढतात आणि ती लगेच तुटतात, तर काही लोकांच्या नखांची वाढ होत नाही.

नखे कमकुवत किंवा कमजोर असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या हाताच्या सौंदर्यावर दिसून येतो. नखे न वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे नखांमध्ये विटामिन सी ची असलेली कमतरता. यामुळे मुख्यता नखांची वाढ होत नाही, त्याच बरोबर बरेच लोकांची नखे अवेळी तुटतात.

लांब आणि सुंदर नखे हे प्रत्येक स्त्रियांना किंवा मुलींना आणि हवीहवीशी वाटत असतात. त्याशिवाय चांगली नखे असणे आपले शरीर निरोगी आहे असे सुद्धा दर्शवते. अनेक लोकांना नखे वाढण्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागतात, त्याच बरोबर नखांची काळजी घ्यावी लागते.

बरेचदा स्त्रियांची नखे ही स्वयंपाक करताना किंवा भांडी घासताना तुटतात. त्यानंतर ही नखे वाढवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागते. स्त्रियांना नखे वाढवून त्याच्यावर नेल आर्ट काढायला आवडते. त्यामुळे ते आपली नखे वाढवतात.

हाताची नखांची वाढ होत नाही याची कारणे :-

नखं न वाढण्याचे कारणे म्हणजे नखात कॅल्शियम कमतरता असते आणि असे वेगवेगळ्याकारणामुळे नखांची वाढ होत नाही. शरीरात काही पोषक तत्वे कमी प्रमाणात असतील, तर त्याचा परिणाम आपल्या नखांमध्ये दिसून येतो.

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नखे का वाढत नाही याची कारणे कोणती ? आणि त्याचबरोबर यावर घरगुती उपयोग साठी उपाय कोणकोणते करावे? चला तर मग बघूया !

इन्फेक्शन :-

जर तुमचे नखे वाढत नसेल तर त्याचे महत्वाचे कारण हे इन्फेक्शन असू शकते. कोणत्याही प्रकारचे झालेल्या नखांना इन्फेक्शन मुळे सुद्धा नखांची वाढ खालावते. नखांची वाढ नीट होत नाही. त्यामुळे नखांची वाढ न होण्याचे इन्फेक्शन हे कारण असू शकते.

नखे कमकुवत असणे :-

बरेचदा नखांची वाढ न होण्याचे मुख्य कारण म्हणजे नखं कमकुवत असणे. अनेकदा नखांमध्ये आवश्यक असणाऱ्या कॅल्शियमच्या कमतरते मुळे नखांमध्ये आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे नखे कमकुवत होतात आणि नखे कमकुवत असल्यामुळे ते वारंवार तुटतात आणि त्यांची वाढ होत नाही.

नखांवर दबाव आल्यामुळे :-

अनेक वेळा नखांवर दाब आल्यामुळे सुद्धा नखे तुटतात आणि त्यांची वाढ होत नाही. स्वयंपाक करताना किंवा भांडी घासताना महिलांची नखे तुटत असतात. त्यांचे मुख्य कारण म्हणजे नखांवर पडलेल्या दबावामुळे. यामुळे नखांची वाढ नीट होत नाही आणि नखे कमकुवत होऊ लागतात.

हाताची नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय :-

वरील भागात आपण बघितले हाताचे नखे न वाढण्याची कारणे कोणती आहेत ? आता आपण बघणार आहोत हाताची नखे झटपट कशी वाढवावी आणि त्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात?

नारळाचे तेल वापरा :-

नारळाचे तेल जसे केस वाढविण्यासाठी यासाठी उपयुक्त ठरते, तसेच नारळाचे तेल नख वाढवण्यासाठी साठी सुद्धा मदतगार ठरते. यासाठी-

  1. थोडेसे नारळाचे तेल घेऊन ते थोडे कोमट गरम करावे.
  2. नंतर दहा ते पंधरा मिनिटात या तेलामध्ये हाताची नखे बुडवून ठेवावे.
  3. असे आठवड्यातून तीन वेळा करावे यामुळे तुमच्या नखांची वाढ होण्यासाठी मदत होईल.

विटामिन सी चा वापर करा :-

नखांच्या वाढीसाठी लागणारे पोषक तत्व म्हणजे विटामिन सी. विटामिन सी च्या कमतरतेमुळे सुद्धा आपली नखांची वाढ थांबते. जर तुम्हाला तुमचे नख वाढवायचे असतील तर विटामिन सी चा वापर करा. विटामिन सी हे संत्र या फळांमध्ये असते. संत्र्याचा रस काढून त्यात दहा ते पंधरा मिनिटं आपले नखे बुडवून ठेवा असे केल्यामुळे तुमची नखे लवकरच वाढू शकतात.

मोहरीच्या तेलाने मालिश करा :-

हाताची नखे वाढवण्यासाठी मोहरीचे तेल उपयोगी ठरू शकते. रोज रात्री झोपायच्या आधी मोहरीच्या तेलाने आपल्या नखांची मालिश करा, असे केल्याने तुमची नखे वाढण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

लसुन ची पेस्ट लावा :-

नखे वाढवण्यासाठी लसुन हा सुद्धा एक फायदेशीर उपाय ठरू शकतो. रोज रात्री झोपायच्या आधी नखांना लसणाची पेस्ट लावा. पाच ते दहा मिनिटं नंतर हात स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. असे दहा ते पंधरा दिवस केल्यामुळे तुमची नखे बळकट होतील आणि त्याची वाढ होण्यास सुद्धा मदत होईल.

ऑलिव्ह ऑइल वापरावे :-

रोज रात्री झोपण्याआधी थोडेसे ऑलिव्ह ऑइल कोमट गरम करून दहा ते पंधरा मिनिटात आपली नखे त्या तेलामध्ये बुडवून ठेवा. यामुळे तुमची नखे नीट व्यवस्थित वाढतील.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले हातांच्या नखांची वाढ न होण्याची कारणे कोणती ? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Leave a comment