हाताची नखे काळी का पडतात ? जाणून घ्या घरगुती उपाय

हाताची नखे काळी का पडतात

बऱ्याच वेळा आपण असे बघतो की लोकांची हाताची नखे काळी पडू लागतात. जसे वय वाढत जाते तसे त्यांचे नख अजून काही होत जातात पूर्वीच्या काळामध्ये नख बघून लोकांचे उपचार केले जायचे कारण तुमच्या नखावरून समजते की तुम्ही किती निरोगी आहात तुमचे शरीर किती चांगले आहे. याचप्रकारे तुम्हाला कोणता आजार आहे.

आपण अनेकदा कोणतेही केमिकल नखांवर लावतो. याच प्रकारे आज-काल आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे ही आपले नख काळे पडण्याची शक्यता असते. मुळात नख काळे पडणे हे आपल्या शरीरातील काही संकेत आहेत म्हणजेच तुमचे नख काळे पडत असतील तर समजावे की तुमची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. याच प्रकारे नख जर काळे पडत असतील तर त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त पुरवठा नीट होत नाही. आपल्या शरीरात रक्त पुरवठा नीट होत नसेल तर आपली त्वचा काळी पडते तसेच आपली बोटाची नखे देखील काळी पडायला सुरुवात होते. तसेच आपल्या शरीरातील पाणी कमी झाल्याने देखील आपली हाताची नखे काळी पडू शकतात.

हाताची नखे काळी पडण्याची कारणे :

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जर नख काळे पडली तर त्याचे कारणे कोणती याच बरोबर नख जर काळे पडत असेल तर त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते. चला तर मग जाणून घेऊया या वरचे कारणे व उपाय.

1. असुरळीत रक्तपुरवठा
2. इम्युनिटी कमी होणे
3. वेगळ्या केमिकल्स वापर
4. पिंढ्यानुसार (जेनेटिक)
5. शरीराकडे दुर्लक्ष
6. प्रखर सूर्यप्रकाशामुळ
7. पाण्याची कामकरता

हाताची नखे काळी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये नीट रक्त पुरवठा न होणे. कारण आपल्या शरीरामध्ये सुरळीत रक्त पुरवठा न झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला नखावर दिसून येतो. याच प्रमाणे जर आपली इम्युनिटी म्हणजेच प्रतिकारक शक्ती जर कमी असेल तर त्याचा परिणाम नखावर दिसून येतो त्याचे रंग बदलतात तसेच नख अलवार होता.

याचप्रमाणे आपण खूप प्रकारचे केमिकल्स वापरतो त्यामुळे देखील आपल्या नखांचे रंग बदलू शकतात. याच प्रकारे आपण प्रकार सूर्यप्रकाशामध्ये गेल्यावर आपल्या त्वचेवर काही साईड इफेक्ट होतात व आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे देखील त्याचा परिणाम आपल्या नखांवर दिसून येतो म्हणजेच नख काळे पडणे.

नखं काळे पडले असेल तर कोणते उपाय करावे :

आता आपण बघणार आहोत नख जर काळी पडत असेल तर त्यावर कोणते घरगुती प्रभावशाली उपाय करावे जेणेकरून आपली नखे पूर्वीसारखे होण्यास मदत होईल चला तर मग जाणून घेऊया.

सोडा व लिंबू लावून बघा :

आपली नख जर काही पडू लागली असतील तर आपण त्यावर सोडा व लिंबू लावावा. त्याने तुमचे नखाचा रंग पूर्वीसारखा होण्यास मदत होईल. तर आपण थोडासा सोडा घ्यावा त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू टाकावा. तयार झालेले मिश्रण आपल्या नखांवर लावावे साधरण पाच ते दहा मिनिटं लावून ठेवावे. त्यानंतर आपली नख स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

बीट खा :

आपली नख काळी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरामधील रक्तपुरवठा नीट न होणे. म्हणून आपण सुरुवातीस आपण आपल्या शरीरातील रक्त वाढवले पाहिजेत. त्यासाठी आपण जास्तीत जास्त पालेभाज्या तसेच जास्तीत जास्त फळे खाल्ली पाहिजे. त्याचप्रमाणे फळांमध्ये मुख्यताहा बीट खावे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयन आसते. ते तुमचे रक्त व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फार मदतीची ठरते. तुम्ही रोज एक बिट खावा. असे केल्याने तुमच्या शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल तुमची नखाची समस्या ही नाहीस होईल.

हायड्रोजन टाकू शकता :

आपली नखे जर जन्मता काळी असेल तसेच अति खोल असेल तर आपण हा उपाय करू नये. पण जर आपली नखे तरुण वयामध्ये काळी झाली असेल तसेच त्यामध्ये जर आपण कोणती ही केमिकल्स लावले असू किंवा काही इतर सामान्य समस्या असेल तर आपण आपल्या नखांवर दोन थेंब हायड्रोजन टाकावे. हायड्रोजन हे तुम्हाला तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर भेटेल. पण हे हायड्रोजन तुमच्या नखावर जास्त वेळ ठेवू नये दोन ते तीन मिनिटांनी पूसून टाकावे.

शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढवा :

आपल्या नखांवर पांढरे डाग निर्माण होणे तसेच काळे होणे हे सर्व आपल्या शरीरातील कॅल्शियम कमतरतेमुळे होऊ शकते. म्हणून तुम्ही तुमच्या शरीरामधील कॅल्शियम वाढवणे कडे लक्ष दिले पाहिजे. तसेच दुधयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आपण दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. कारण दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. तसेच हे कॅल्शिअम तुमचे शरीर लवकर शोषून घेते. उदा. दूध दही ताक अशा पदार्थांचे सेवा न ती प्रमाणामध्ये करावे.

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवा :

आपण आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. कारण जेव्हा आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा त्याचा परिणाम दिसून येतो. म्हणून रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी विटामिन्स तसेच जीवनसत्व असणारे पदार्थ खाल्ले पाहिजे. आपली रोगप्रतिकारशक्ती जर वाढली तर आपली नखे आपोआपच सामान्य होण्यास मदत होईल.

तुरटीच्या पाण्यामध्ये बोट ठेवा :

आपण रोज रात्री तुरटीच्या पाण्यामध्ये नखे बुडवावी. आपण सुरुवातीस एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे. त्यामध्ये थोडीशी तुरटी फिरवावी त्यानंतर रोज रात्री झोपण्याच्या आधी त्या पाण्यामध्ये नखे भिजवून ठेवावी. तुमची नख सर्व तुरटी चा अर्क शोषून घेतील. साधारणता दहा ते वीस मिनिटं पाण्यामध्ये नख ठेवावी. त्यानंतर हातमोजे घालून झोपावे असे केल्याने रात्रभरामध्ये तुमच्या नखाचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल हा उपाय दहा ते पंधरा दिवस करावे.

भरपूर पाणी प्यावे :

बरेच आजार पाणी पिल्याने दूर होतात. आपल्या शरीरामध्ये पाण्याचे कमतरतेमुळे देखील नख कोरडे तसेच काळे पडतात. म्हणून दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. आपण जर मुबलक प्रमाणामध्ये पाणी पिले तर आपली हाताची नखे काळी पडणार नाहीत. तसेच काळी पडली असेल तर ती पूर्वीसारखी होण्यास मदत होते.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही घरी करून बघा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले हाताची नखे काळी पडण्याची कारणे कोणती त्याचबरोबर त्याचे घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हि घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


One response to “हाताची नखे काळी का पडतात ? जाणून घ्या घरगुती उपाय”

  1. 1 वर्षा पासून माझे नख बुरशी आल्या सारखे झाले आहेत खूप डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी सांगितले हा फंगस चा प्रकार आहे खूप दिवसा पासून औषध गोळ्या घेत आहे पण कमी झाले नाही वाढत जात आहे हे कशा मुळे होईले नेमके माहीत नाही …. हे काय प्रकार आहे सहकार्य करावे ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *